Daily Archives: June 25, 2020

विस्ताराचे वास्तव काय?

राज्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या येत्या दोन दिवसांत हजाराचा टप्पा पार करील. इतर राज्यांप्रमाणे कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवत नेण्याऐवजी राज्य सरकारने ते खाली आणले, तरीही कोरोनाचा चढता आलेख काही खाली येऊ शकलेला नाही. दिल्ली आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांनी आता संपूर्ण जनतेच्या कोविड चाचण्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अवघ्या चौदा लाख लोकसंख्येचे आपण मात्र रुग्णसंख्या जरा वाढताच हात वर करून बसलो. दिल्लीमध्ये ... Read More »

‘संजीवनी’ कायमचा बंद करणार नाही

>> प्रशासकांच्या इशार्‍यावर सरकारचे स्पष्टीकरण संजीवनी साखर कारखाना बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असा खुलासा सरकारने केला आहे. तर दुसरीकडे दयानंदनगर – धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना नुकसानीत चालत असल्याने हा कारखाना या वर्षापासून बंद करण्याचा निर्णय कारखान्याचे प्रशासक तारीक थॉमस यांनी ऊस उत्पादकांच्या बैठकीत घेतला. बुधवारी ऊस उत्पादक शेतकर्‍यांची संजीवनीच्या प्रशासकांसमवेत प्रकल्पाच्या परिषद सभागृहात बैठक झाली, त्यात ... Read More »

अपात्रता याचिका प्रश्‍नी आमदारांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता याचिका प्रकरणी सभापतींना नोटीस जारी केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांची बैठक घेऊन पुढील रणनीतीवर विचार विनिमय काल केला आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आमदार अपात्रता प्रकरणी याचिकेला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने गोवा विधानसभेचे सभापती व इतरांना नोटीस जारी करून ... Read More »

आठवडाभरात पर्यटन उद्योगाविषयी निर्णय घेणार मुख्यमंत्र्यांची माहिती

Read More »

सहकारी बँकांतील ठेवी आता ‘आरबीआय’च्या नियंत्रणाखाली

नागरी सहकारी बँका, शासकीय बँका तसेच मल्टी स्टेट को-ऑप बँकांना आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. त्यानंतर मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. जावडेकर यांनी सांगितले, शासकीय, नागरी सहकारी बँकांसह १४८४ बँका, ५८ मल्टी स्टेट को-ऑप बँका आता रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. शेड्यूल बँकांप्रमाणेच आरबीआय ... Read More »

राज्यात ४२ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण

राज्यात नवीन ४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह सध्याच्या रुग्णांची संख्या ६६० झाली आहे. राज्यातील ८४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. साळ – डिचोली, कुंडई, केपे येथे प्रत्येकी १ आयसोलेटेड रुग्ण आढळून आले आहेत. साखळी, मोर्ले – सत्तरी येथे नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ९५१ झाली आहे. ... Read More »

बारावीचा निकाल २६ जून रोजी

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार २६ जून रोजी संध्याकाळी ५ वा. जाहीर केला जाणार असून ७ जुलैपासून विद्यालयात गुणपत्रिका उपलब्ध असतील, अशी माहिती मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये यांनी काल दिली. येत्या २९ जून २०२० रोजी विद्यार्थ्यांची निकालपत्रे संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात ईमेलच्या माध्यमातून पाठविण्यात येणार आहेत. ७ जुलै पासून गुणपत्रिका ... Read More »

आशिया चषक क्रिकेट नियोजित वेळेतच

>> पाकचे सीईओ खान यांना विश्वास; श्रीलंका वा यूएईही पर्याय आयपीएलसाठी आशिया चषकाचा बळी जाणार असल्याची चर्चा क्रिकेट जगतात सध्या चालू आहे. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसिम खान यांनी आयपीएलसाठी आशिया चषकाचा बळी देणार नसल्याचे स्पष्ट करतानाच कुठल्याही परिस्थितीत ही स्पर्धा नियोजित वेळेतच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. कोरोना महामारीमुळे मोठ्या क्रिकेट स्पर्धा सध्या स्थगित आहेत. ... Read More »

पाकपेक्षा इंग्लंड अधिक सुरक्षित ः होल्डिंग

वेस्ट इंडीजचे माजी जलदगती गोलंदाज व प्रसिद्ध समालोचक मायकल होल्डिंग यांनी पाकिस्तानी संघ मायदेशापेक्षा इंग्लंडमध्ये अधिक सुरक्षित असेल, असे विधान काल बुधवारी केले. पाकिस्तानमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. दुसरीकडे इंग्लंडने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बर्‍यापैकी यश प्राप्त केले असून पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडूंनी इंग्लंडमध्ये सुरक्षेची चिंता करू नये, असे होल्डिंग म्हणाले. इंग्लंड दौर्‍यावर येण्यास सज्ज झालेले पाकिस्तानचे २९ पैकी १० खेळाडू ... Read More »

लतिफचे पीसीबीवर ताशेरे

पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज राशिद लतिफ याने काल बुधवारी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अव्यावसायिक आणि बेजबाबदार कारभारावर ताशेरे ओढले. पाकिस्तान संघातील जे खेळाडू सरावासाठी मैदानात आले होते, ते सारे एकत्रच सराव करत होते. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो हे समजले पाहिजे होते. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा बेजबाबदार कारभार आणि खेळाडूंनी न राखलेले सोशल डिस्टन्सिंग यामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघात कोरोनाचा फैलाव ... Read More »