Daily Archives: June 24, 2020

विद्यार्थ्यांना दिलासा द्या

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात एक गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवते आहे, ती म्हणजे कोणताही निर्णय घ्यायला राज्य सरकार एक तर खूप उशीर लावते आणि त्यानंतर त्यावर ठाम न राहता आपलेच निर्णय सतत फिरवत बसते. अगदी पहिल्या लॉकडाऊनपासून सध्याच्या ऑनलाइन शिक्षणापर्यंत प्रत्येक विषयामध्ये राज्य सरकारची ही धरसोड वृत्ती दिसून आलेली आहे आणि जनतेच्या कुचेष्टेचा विषय बनली आहे. मनोहर पर्रीकर यांचे सरकार ‘यू टर्न’ बाबत ... Read More »

शिक्षकांना आजपासून शाळेत हजर राहण्याचे आदेश

राज्यात सरकारी आणि अनुदानित विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना बुधवार २४ जून २०२० पासून शाळेत हजर राहण्याची सूचना करणारे परिपत्रक शिक्षण खात्याच्या संचालिका वंदना राव यांनी काल जारी केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सरकारी व अनुदानित विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना विद्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती करण्याची घोषणा केली होता. त्यानंतर शिक्षण संचालिका राव ... Read More »

राज्यात नवे ४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

>> कोरोना’चा विळखा गावागावांत : एकूण रुग्णसंख्या ९०९ वर राज्यात नवीन ४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७०२ आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ९०९ वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह ५३ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २०५ झाली आहे. राज्यात पहिल्यांदाच नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोना पॉझिटिव्ह या आजारातून बरे ... Read More »

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन दोन आठवडे

गोवा विद्यापीठाचे २७ जुलैपासून सुरू होणार असलेले पावसाळी अधिवेशन हे तीन नव्हे तर दोन आठवडे चालणार असल्याचा खुलासा काल सभापती राजेश पाटणेकर यांनी केला. सोमवारी अनधिकृतपणे पत्रकारांशी बोलताना राज्य विधानसभेचे होऊ घातलेले पावसाळी अधिवेशन हे तीन आठवड्यांचे असण्याची शक्यता पाटणेकर यांनी व्यक्त केली होती. मात्र, काल त्याबाबत खुलासा करताना हे अधिवेशन दोनच आठवडे घेण्याचे निश्‍चित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. ... Read More »

‘कोरोना’वर औषध शोधल्याचा रामदेवबाबांचा दावा

‘कोरोना’च्या महामारीमुळे संपूर्ण जग संकटात असताना बाबा रामदेव यांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. ‘कोरोनिल’ हे कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी बनवलेले औषध असून नुकतेच त्यांनी ते लॉन्च केले आहे. या विषाणूला हरविण्यासाठी आयुर्वेदिक औषधच प्रभावी ठरू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. या आयुर्वेदिक औषधावर पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे संशोधन केलेले आहे. ... Read More »

कोरोना : दर लाख लोकसंख्येमागील मृत्यूचे भारतातील प्रमाण अत्यल्प

कोरोनाचा फटका बसलेल्या जगातील अन्य देशांच्या तुलनेत दर एक लाख लोकसंख्येमागील कोरोना मृतांचे भारतातील प्रमाण सर्वात कमी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालात नमूद केले आहे. दर एक लोकसंख्येमागील कोरोना मृतांचे प्रमाण ६.०४ असे असून भारतातील हे प्रमाण १.०० असे आहे, अशी माहिती २२ जून २०२० रोजीच्या अहवालात देण्यात आली आहे. डब्ल्युएचओच्या या अहवालानुसार इंग्लंडमध्ये प्रती एक लाख लोकसंख्येमागे ६१.१३ ... Read More »

रिचर्डस्‌सारखा खेळतो विराट

>> सुनील गावसकर यांनी केले कोहलीचे कौतुक लिट्ल मास्टर सुनील गावसकर यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची तुलना माजी कॅरेबियन फलंदाज सर व्हिवियन रिचर्डस् यांच्याशी केली आहे. गावसकर म्हणाले की, विराट कोहली हा अव्वल क्रमांकाचा फलंदाज मानला जातो कारण तो व्हिव रिचर्डस् यांच्यासारखा फलंदाजी करतो. स्टार स्पोर्टस् वाहिनीवरील ‘विनिंग दी कप १९८३’ या कार्यक्रमात त्यांनी कोहली व रिचर्डस् यांच्यातील ... Read More »

सोसिएदादला नमवून रेयाल माद्रिद अव्वल

सर्जियो रोमोस व करीम बेंझेमा यांनी केलेल्या शानदार गोलांच्या बळावर रेयाल माद्रिदने रेयाल सोसिएदाद संघाचा २-१ असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लिगा स्पर्धेतील आगेकूच कायम राखली आहे. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटले. दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर सर्जियो रोमोसने ५० मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करत रेयालला आघाडी मिळवून दिली. यावेळी माद्रिदने रेयाल सोसिएदाद संघाचा ... Read More »

जोकोविचला कोरोनाची लागण

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मदतनिधी स्पर्धा खेळल्यानंतर काही कार्यक्रमांना उपस्थित राहताना पुरेशी खबरदारी न घेतल्याचा फटका त्याला बसल्याचे मानले जाते. आपल्याला झालेल्या कोरोनाविषयी माहिती देताना जोकोविच म्हणाला की, जेव्हा मी बेलग्रेड येथे आलो होतो तेव्हा माझी करोनाची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीनंतर मी करोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर माझ्या पत्नीलाही ... Read More »