Daily Archives: June 23, 2020

कोरिक, दिमित्रोव कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग अजूनही स्तब्धच आहे. जगभरात कोरोना संक्रमितांची संख्या ९० लाखांच्या वर पोहोचली आहे. या महामारीचा मोठा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. बर्‍याच क्रीडापटूंना या महामारीचा संसर्ग झालेला आहे. त्यात आता बल्गेरियन टेनिस स्टार ग्रिगोर दिमित्रोव आणि क्रोएशियाचा बोर्ना कोरीक यांचाही समावेश झाला आहे. या दोघांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. नुकतीच क्रिकेट क्षेत्रातील शाहिद आफ्रिदी, मश्रफे मुर्तजा, ... Read More »

खेळाला बनवाअविभाज्य भाग

>> सिंधूने केले देसवासियांना आवाहन भारताची स्टार शटलर आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने ‘व्हर्च्युअल हेल्थकेअर अँड हायजीन एक्स्पो २०२० ’ चर्चासत्रात बोलताना देशवासियांना कोविड-१९वर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) च्या शिफारशींचे पालन करतानाच खेळाला जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले आहे. कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला बसलेला आहे. या विषाणूचा संसर्ग जगभरातील सुमारे ९० ... Read More »

कोरोनाची भीती मनातून काढून टाका ः डॉ. गोम्स

मुलाखत ः श्री. श्याम गावकर ‘कोरोना’च्या वाढत्या प्रसारानिशी जनमानस धास्तावले आहे. परंतु व्यक्तिगत खबरदारी घेऊन कोरोनाचा संसर्ग बर्‍याच अंशी रोखता येऊ शकतो हेही तितकेच खरे आहे. गोव्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील एक अग्रणी डॉ. एडविन गोम्स यांची ही विशेष मुलाखत… प्रश्‍न १ ः कोविड-१९ संसर्गाची भीती सर्वसामान्यांमध्ये आहे. ही भीती नाहीशी होण्यासाठी डॉक्टर काय करावं? उत्तर ः कोविड-१९ संबंधी सध्या भीतिचे वातावरण ... Read More »

॥ मनःशांती उपनिषदातून ॥ मनःप्रसादासाठी साधना

प्रा. रमेश सप्रे हे इतकं विस्तारानं सांगायचं एकच कारण म्हणजे या कटू सत्यस्थितीचा नि यातून निर्माण होणार्‍या, नव्हे होत असलेल्या अपराधांचा; अंतिम, टोकाच्या निर्णयांचा नि आत्मघातासारख्या कृतींचा योग्य विचार करून वेळीच सर्वांनी सावध व्हावं. पण याच्या पोटात एक दैवदुर्विलास दडलेला आहे, तो म्हणजे ज्यांना खरी गरज आहे ते वाचणार नाहीत… ‘कठोपनिषद’ हे महत्त्वाचं उपनिषद. सुमारे चारहजार वर्षांपूर्वी ते लिहिलं गेलं ... Read More »

योगसाधना – ४६३ अंतरंग योग – ४९ ‘पहाटेची अमर्याद शक्ती’

डॉ. सीताकांत घाणेकर आपण फुलपाखरासारखे करायला हवे. तो फुलावर बसून मध प्राशन करतो आणि माशी? ती घाणीवरच बसते. म्हणून बालपणापासूनच मनाला चांगल्या विचारांची सवय लावायला हवी. त्यामुळेच पूर्वी लहान मुलांना प्रत्येक दिवशी यशस्वी व्यक्तींच्या गोष्टी नियमित सांगत असत. आंतरराष्ट्रीय योग दिवस- २१ जून. अनेक राष्ट्रे, लाखो व्यक्ती, शेकडो संस्था… या दिवशी विविध कार्यक्रम उत्साहाने साजरा करतात. प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद ... Read More »

आला पावसाळा; आरोग्य सांभाळा

 डॉ. विजय नाईक (हेल्थ-वे हॉस्पिटल) मान्सूनच्या काळात आमच्या शरिरातील रोगाशी लढणार्‍या पांढर्‍या पेशी सतत हवामान बदलामुळे कमकुवत होतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो व आम्हाला अनेक प्रकारचे इन्फेक्शन होतात. त्यामुळे आम्ही आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन डास, पाणी, हवा व अन्न यांच्यातून होणार्‍या इन्फेक्शनपासून स्वत:चा बचाव केला पाहिजे. पसरलेला कोविड -१९ साथीचा रोग थांबविण्यासाठी हातांच्या स्वच्छतेवर जागरूकता ठेवा. कारण वारंवार ... Read More »