Daily Archives: June 23, 2020

भरवसा कायम राहावा

गोव्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून जवळजवळ तीन महिन्यांनी गोव्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. मृत व्यक्तीचे वय ८५ आहे. त्यामुळे वृद्धापकाल आणि अन्य शारीरिक गुंतागुंत हेही तिच्या मृत्यूस कारणीभूत असू शकते. गोव्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला कालच्या या दोन मृत्यूमुळे अधिक सतर्कतेची दिशा मिळणे आवश्यक आहे. या लढ्याविषयीचा जनतेचा आजवरचा भरवसा तुटता कामा नये. देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य बनण्याचा मान गोव्याला मिळाला ... Read More »

शाळांबाबत १५ जुलै नंतर निर्णय

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती राज्यातील विद्यालयांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिक्षणाची सक्ती करण्यात आलेली नाही. सरकारी आणि अनुदानित शिक्षण संस्थांतील शिक्षकांना विद्यालयात उपस्थिती लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. विद्यालयांचे वर्ग सुरू करण्याबाबत १५ जुलैनंतर एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली. राज्यातील शिक्षण खात्याचे अधिकारी, मुख्याध्यापक संघटना, ... Read More »

गोव्यात कोरोनाचे दोन बळी

>> मोर्ले व वास्को येथील रुग्णांचे निधन >> दवसभरात ४६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण माजी आरोग्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह उत्तर गोव्यातील एक माजी मंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून त्यांना उपचारार्थ मडगाव येथील कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यात काल दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला असून मोर्ले, सत्तरी येथील प्रतिबंधित क्षेत्रातील एका ८५ वर्षीय वृद्धाचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये ... Read More »

पाटो- पणजी येथील ‘स्पेसिस’ इमारत सील

पाटो-पणजी येथील ‘स्पेसिस’ इमारतीत असलेल्या न्यायालयात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आल्यानंतर काल एकच धावपळ उडाली. नंतर संपूर्ण इमारतच सील करण्याचा निर्णय राज्य प्रशासनाने घेतला. सदर कर्मचारी हा गेल्या आठवडाभर रजेवर होता. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आल्याने काल तातडीने संपूर्ण इमारतच बंद करण्यात आली. जे-जे कोण वरील कर्मचार्‍याच्या संपर्कात आले होते त्या सर्वांना चाचणी करून घेण्याच्या ... Read More »

दहावी-बारावी निकालाबाबत आज वा उद्या घोषणा

बारावी इयत्तेचा निकाल आठवडाभरात होणार असून दहावी इयत्तेचा निकाल मात्र कधी होईल हे एवढ्यात सांगता येणार नसल्याचे गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. आज किवा उद्यापर्यंत दहावी व बारावी इयत्तेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले. यंदा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात येणार असून पत्रकार परिषद ... Read More »

आपले सैनिक मारले गेल्याची चिनची कबुली

लडाखच्या गलवान खोर्‍यात १५ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षात भारतीय जवानांच्या प्रत्युत्तरात चीनचा कमांडिंग ऑफिसरही मारला गेलाय. तसेच आपले सैनिक ठार झाल्याचे प्रथमच चीनने मान्य केले आहे. २० पेक्षा कमी सैनिक मारले गेल्याचेही चीनने म्हटले आहे. भारतीय जवानांनी १६ जवानांचे मृतदेह चीनकडे सुपूर्द केले, याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चीनने ही कबुली दिलीआहे. Read More »

सांताक्रुझ टोळीयुद्धातील संशयितांकडून शस्त्रे जप्त

  ओल्ड गोवा पोलिसांनी सांताक्रुझ येथील टोळीय्ुध्द आणि सोनू यादव या युवकाच्या मृत्युप्रकरणी आणखी चार जणांना अटक करण्यात आली असून संशयितांकडून २ रिव्हॉल्वर, १ पिस्तूल, ४ तलवारी आणि २ चॉपर जप्त केले आहेत. सांताक्रुझ टोळी य्ुध्द प्रकरणात सोनू यादव याच्यावर कुणी गोळी झाडली याबाबत अजून माहिती उजेडात आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणी संशयित गुंडाची धरपकड सुरू आहे. सुरज शेटये, विशाल ... Read More »

साळगावकर, पालयेकर यांनी भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळली

गोवा फॉरवर्डचे साळगावचे आमदार जयेश साळगावकर आणि शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याची जोरदार चर्चा काल सुरू होती. तथापि, गोवा फॉरवर्डच्या दोघाही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली आहे. भाजपकडून गोवा फॉरवर्डचे आमदार फुटणार असल्याची अफवा पसरविण्यात येत आहे, असा दावा दोघाही आमदारांनी केला आहे. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा पसरविण्यात आली असून गोवा फॉरवर्डचा त्याग करण्याचा ... Read More »

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २७ जुलै पासून

  गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २७ जुलैपासून सुरू होणार आहे, अशी माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी काल अनधिकृतरित्या पत्रकारांशी बोलताना दिली. हे अधिवेशन किती दिवसांचे असेल हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, ते तीन आठवड्यांचे असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यावेळच्या अधिवेशनात अर्थसंकल्पाला संमती देण्यात येणार आहे. Read More »

चिनी क्रीडा साहित्यावर बहिष्कार

>> भारतीय भारोत्तोलक महासंघाचा निर्णय भारतीय भारोत्तोलक (वेटलिफ्टिंग) महासंघाने चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या कोणत्याही साहित्याचा वापर न करण्याचे निश्‍चित केले आहे. चीनमधील साहित्य सदोष असते तसेच गलवानमध्ये चीनमुळे २० भारतीय जवानांना हौतात्म्य आल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचे महासंघाचे सरचिटणीस सहदेव यादव यांनी सांगितले. मागील वर्षी चीनमधील कंपनी झांग कॉंग बारबेल (झेडकेसी) यांच्याकडून आम्ही भारोत्तोलनाचे चार सेट खरेदी केले होते. ... Read More »