Daily Archives: June 22, 2020

वेळीच नांगी ठेचा

आधीच कोरोनाच्या सावटाखाली असलेला गोवा सांताक्रुझमधील टोळीयुद्धाच्या वार्तेने हादरला आहे. सांताक्रुझ, मेरशी, कालापूर, ताळगाव गावे ही एकेकाळी गुंडगिरीची केंद्रे म्हणून कुख्यात होती. वेळोवेळी या टोळीयुद्धांना तोंड फुटत असे आणि भररस्त्यात रक्ताचे सडे पाडले जात. पुढे पुढे त्या गावांमध्ये अन्य ठिकाणांहून आलेल्या मध्यमवर्गीयांची वस्ती वाढत गेली आणि गावांचा चेहराही बदलू लागला. गेल्या काही वर्षांत या गुंडगिरीच्या प्रकारांनी डोके वर काढलेले नव्हते, ... Read More »

नवे ६४ कोरोना रुग्ण

>> राज्यात रुग्णसंख्या ८१८ वर : मांगूर हिलशी संबंधित ३८ नवे रुग्ण राज्यात नवीन ६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८३ झाली आहे. मांगूर हिल आणि मांगूर हिलशी संबंधित नवीन ३८ रुग्ण आढळून आले आहेत. तर, नावेली आणि वाडे येथे प्रत्येकी १ आयझोलेटेड रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह ६ रुग्ण बरे ... Read More »

सूर्यग्रहण पाहण्याचा ‘योगा’योग!

यावर्षीचे पहिले आणि अखेरचे सूर्यग्रहण पाहण्याची संधी गोव्यातील अनेकांनी घेतली. ग्रहण सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी सुरू झाले. भारतात ते १० वाजून १ मिनिटाने दिसले. उत्तर भारताच्या काही भागांमध्ये चंद्राने सूर्याला ९८ टक्के झाकून टाकले होते. तेथे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले. तर उर्वरित भारतात ते खंडग्रास दिसले. गोव्यात बहुतेक लोकांनी गच्ची तसेच बाल्कनीमधूनही हे ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. Read More »

राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर पेटले!

राज्यात पेट्रोल, डिझेल या इंधनाच्या दरात गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. १ जून ते २० जून या काळात पेट्रोलच्या दरात ७.३५ पैसे तर डिझेलच्या दरात ७.८१ पैसे एवढी वाढ झाली आहे. पणजी शहरात पेट्रोलचा दर ७६.२२ पैसे आणि डिझेलचा दर ७३.२७ पैसे एवढा झाला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. Read More »

रुग्ण वाढतील म्हणून चाचण्या थांबवल्या

>> विजय सरदेसाई यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी दाखवता यावा, यासाठीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोनासाठी जास्त लोकांची चाचणी न करण्याचे धोरण अवलंबिले असल्याचा आरोप काल गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला. जर मोठ्या प्रमाणात कोरोनासाठी लोकांच्या चाचण्या घेतल्या तर मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडतील. चाचण्याच कमी केल्या, की रुग्णही कमीच ... Read More »

सांताक्रुझ टोळीयुद्ध : आणखी तिघांना अटक

ओल्ड गोवा पोलिसांनी सांताक्रुझ येथील इम्रान बेपारी याच्या घरावर हल्ला आणि सोनूू यादव या युवकाच्या मृत्यू प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोघा अल्पवयीनांचा समावेश आहे. दरम्यान, ७ जणांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील न्यायालयाने काल दिला. ही घटना शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली असून पोलिसांनी त्याच दिवशी संध्याकाळी ९ जणांना ताब्यात घेतले. त्यात दोघा ... Read More »

संकटकाळात योग साधक धैर्य सोडत नाही : पंतप्रधान

योग साधक संकटकाळात धैर्य सोडत नाही. कोरोनाच्या सावटाखाली सुद्धा जगभरातील लोकांनी ‘माय लाइफ, माय योगा’ या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेत सहभाग घेतला. यावर्षीचा योग दिन हा घरातच साजरा होत असल्याने कुटुंबातील स्नेहभाव त्यामुळे वाढीस लागणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशाला संबोधित करताना ते बोलत होते. यावर्षी कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन सरकारने योग दिनाचे कुठलेही ... Read More »

हडफडेत दोडामार्गमधील युवकाचा खून

सांकवाडी -हडफडे येथील एका हॉटेलच्या परिसरात रविवारी रात्री तेथील कर्मचार्‍यांमध्ये दारूच्या नशेत झालेल्या भांडणात दोडामार्ग-सिंधुदुर्ग येथील विश्वनाथ सदाशिव गवस (२८ रा. पिकुळे) या तरुणाचा रामभरोसे निशाद (उ.प्र) याच्याकडून चाकूने भोसकून खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच हणजुण पोलीस पथकाकडून संशयितास ताब्यात घेण्यात यश आले. दरम्यान, संशयित आरोपी रामभरोसे निशाद याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला ... Read More »

कुंबळेच सर्वांत मोठा ‘मॅच विनर’

>> हरभजन सिंगने उधळली ‘जंबो’वर स्तुतिसुमने फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला तरी गोलंदाजांनी २० गडी बाद केले नाहीत तर कसोटी सामना जिंकता येत नाही, असे भारताचा माजी ऑफस्पिन गोलंदाज हरभजन सिंग याने सांगितले. क्रिकेट हा खेळ सुरुवातीपासून फलंदाजांच्या बाजूने झुकलेला आहे. त्यामुळे गोलंदाज खरे ‘मॅच विनर’ ठरतात. भज्जीने हाच निकष लावून सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड अशा ... Read More »

गोपीचंदने केली प्रणॉयची शिफारस

भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी ३ जून रोजी एचएस प्रणॉय याची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे समोर आले आहे. भारतीय बॅडमिंटन महासंघाने २ जून रोजी सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी तसेच समीर वर्मा यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी पाठवली होती. यावेळी प्रणॉय याने आपली भावना ट्विटरद्वारे व्यक्त केली होती. ‘तीच जुनी कहाणी, राष्ट्रकुल व आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेत्याचे नाव ... Read More »