Daily Archives: June 20, 2020

छुप्या प्रसाराची चिन्हे

गोव्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सुरवातीला गोव्याबाहेरून येणार्‍या प्रवाशांपुरती ती सीमित राहिली. नंतर मांगूरहिल प्रकरण घडले. तेथून तो गोव्याच्या इतर भागांत पोहोचला. मात्र, आता मडगाव, बेती, केपे, कुडतरी, राय, पर्वरी, चिंचिणी आदी अनेक नवनव्या ठिकाणी कोणतीही पार्श्वभूमी नसलेले नवे रुग्ण आढळून येत आहेत ही निश्‍चितच चिंतेची बाब आहे. गोवा आता कोरोनाच्या स्थानिक संक्रमणाकडून सामाजिक संक्रमणाकडे वाटचाल तर करीत ... Read More »

गरजेनुसार मर्यादित भाग निर्बंधित ः मुख्यमंत्री

राज्यातील ज्या ज्या भागात कोरोनो पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढते त्या भागात गरजेनुसार लहान – लहान भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येणार्‍या भागातील नागरिकांच्या स्वॅब चाचण्या केल्या जात आहेत. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढणार्‍या ... Read More »

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६०७

>> नवीन २० पॉझिटिव्ह, एकूण ११८ जण कोरोनामुक्त राज्यात काल नवीन २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ६०७ वर पोहोचली आहे. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ७२५ झाली असून आत्तापर्यंत ११८ रुग्ण बरे झाले आहेत. चिंबलमध्ये नवीन २ रुग्ण इंदिरानगर चिंबलमध्ये ... Read More »

लडाखमध्ये घुसखोरी नाही

>> सर्वपक्षीय बैठकीत मोदींची ग्वाही लडाखमध्ये चीनकडून कोणत्याही प्रकारची घुसखोरी केलेली नाही. सीमेवर आपले जवान पर्वताप्रमाणे ठाम उभे आहेत अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिली. काल चीनद्वारे लडाखमध्ये झालेल्या चकमकीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्यावेळी त्या बैठकीनंतर ते बोलत होते. आपले लष्कर, जवान हे देशाची रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पुढच्या रणनीतीसाठी सगळ्या पक्षांनी दिलेल्या सूचना या ... Read More »

काजू बागायतीखाली ८०० हेक्टर जमीन आणणार

>> कृषिमत्री चंद्रकांत कवळेकर यांची माहिती >> शेतकर्‍यांची कृषी कार्डाची अट शिथिल राज्यातील जास्तीत जास्त लोकांनी शेती व्यवसायाकडे आकर्षित व्हावे यासाठी सरकारचे प्रयत्न असून राज्यात ७०० ते ८०० हेक्टर अतिरिक्त जमीन काजू बागायतीखाली आणण्याची योजना असल्याचे कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितेल. कृषी खात्याच्या काल झालेल्या बैठकीत ही योजना आखण्यात आल्याचे काल पर्वरीतील पत्रकार परिषदेत कृषिमंत्री कवळेकर यांनी सांगितले. सरकारच्या काजू ... Read More »

चार दिवसांनंतर पावसाची उसंत

राज्यात मागील चार दिवस संततधार सुरू असलेल्या पावसाने काल थोडी उसंत घेतली. मागील चोवीस तासात २.५९ इंच पावसाची नोंद झाली असून राज्यत आत्तापर्यंत ३४.६८ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ७१ टक्के जास्त आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. गतवर्षी २० जूनला मोसमी पावसाचे आगमन झाले होते. या वर्षी मोसमी पावसाचे आगमन निर्धारित वेळेपेक्षा पाच – सहा ... Read More »

जुने गोवे चर्च आणि परिसराचे सौंदर्यीकरण करणार ः मुख्यमंत्री

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या योजनेतून अंदाजे ४७ कोटी रूपये खर्चून ओल्ड गोवा येथील पुरातन बासिलिका ऑफ बॉम जीजस चर्च आणि सभोवतालच्या परिसराचे सौदर्यीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सौंदर्यीकरणाच्या आराखड्याला अंतिम मंजुरी घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दयानंद सोपटे, कुंभारजुवेचे ... Read More »

श्रीकांतची शिफारस; प्रणॉयला ‘कारणे दाखवा’

भारतीय बॅडमिंटन महासंघाने शुक्रवारी किदांबी श्रीकांत याची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली. स्पर्धेच्या मध्यावर अंग काढून घेतल्याप्रकरणी जाहीर माफी मागितल्यानंतर महासंघाने श्रीकांतचे नाव पाठवले असून अर्जुन पुरस्कारासाठी नाव न सुचवल्यानंतर महासंघावर टीका केल्याप्रकरणी एचएस प्रणॉयला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. श्रीकांत व प्रणॉय या दोघांनी मनिला येथे फेब्रुवारी येथे झालेल्या आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून माघार घेतली होती व बार्सिलोना ... Read More »

कोहलीच योग्य कर्णधार ः मांजरेकर

  भारतीय क्रिकेट संघाला वेगवेगळ्या प्रकारांसाठी वेगळ्या कर्णधारांची आवश्यकता नसल्याचे भारताचा माजी खेळाडू व समालोचक संजय मांजरेकर याने काल शुक्रवारी ‘आस्क संजय’ या आपल्या यूट्यूबवरील कार्यक्रमात सांगितले. जगातील आघाडीच्या क्रिकेट संघांचा विचार केल्यास वेगळ्या प्रकारासाठी वेगळा कर्णधार असा ट्रेंड दिसून येतो. परंतु, भारतीय संघाचे तिन्ही प्रकारात कोहलीच नेतृत्व करत आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे कसोटीत टिम पेन तर वनडे व टी-ट्वेंटीत ऍरोन ... Read More »

सुशांतची ‘अनटोल्ड स्टोरी’

 बबन भगत गेल्या रविवारी म्हणजेच १४ जून रोजी जेव्हा सुशांतसिंह राजपूत या उमद्या अभिनेत्याने मुंबई येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली तेव्हा संपूर्ण भारतभरातल्या लोकांना धक्का बसणे हे साहजिकच होते. सुशांतचं जाणं हे खूप क्लेशकारक व दुःख देणारं आहे. सुशांतसिंह राजपूत याच्याएवढ्या लोकप्रिय व आघाडीच्या अन्य एखाद्या अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे उदाहरण हिंदी चित्रपटसृष्टीत दुसरे नाही. याच्या मृत्यूची ‘अनटोल्ड ... Read More »