Daily Archives: June 19, 2020

शैक्षणिक आव्हान

सामान्य परिस्थितीत एव्हाना राज्यातील नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असते, परंतु यावेळी कोरोनाने सारे वेळापत्रक कोलमडलेले आहे. अजून दहावी – बारावीचे निकाल लागायचे आहेत. त्यानंतर उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षा व्हायच्या आहेत. महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण तर दूरची बात आहे. शालेय शिक्षणाला ऑनलाइन स्वरूपात काही शिक्षणसंस्थांनी प्रारंभ केलेला असला तरी राज्यातील इंटरनेट सुविधा अतिशय कमकुवत स्थितीत आहे. वेगवान ब्रॉडबँड सुविधांची शेखी ... Read More »

ऑनलाइन शिक्षणाची सक्ती नाही ः मुख्यमंत्री

>> सरकारला १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांची चिंता >> शैक्षणिक वर्षाबाबत अद्याप निर्णय नाही राज्यात ऑनलाइन शिक्षणाची सक्ती करण्यात आलेली नाही. सरकारला दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची चिंता आहे. काही शिक्षण संस्थांच्या ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण खात्याकडून योग्य पाऊल उचलण्यात येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील वर्ग सुरू करण्याबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. ... Read More »

राज्यात नवीन ४९ कोरोनाबाधित रुग्ण

>> १३ जण कोरोनामुक्त, ४ आयसोलेटेड रुग्ण राज्यात नवीन ४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले असून सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९६ वर पोहोचली आहे. मांगूर हिलमध्ये नवीन १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे कोरोना पॉझिटिव्ह १३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ७०५ झाली आहे. त्यातील कोरोना पॉझिटिव्ह ... Read More »

सार्वभौमत्वासाठी भारत वचनबद्ध

>> परराष्ट्र मंत्रालयाकडून चीनला इशारा लडाखमधील गलवान खोर्‍यातील हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता या तत्वांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा ठणकावून सांगताना चीनला एकप्रकारे इशारा दिला आहे. भारत हा नेहमीच मतभेद हे शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत या मताचा देश आहे. मात्र, परिस्थितीनुसार कोणत्याही कारवाईलाही आम्ही तयार आहोत. असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग ... Read More »

राज्यात आत्तापर्यंत ३२ इंच पाऊस

राज्यात जून महिन्यात आत्तापर्यंत अठरा दिवसात ३२.०८ इंच पावसाची नोंद झाली असून जून महिन्यातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ७१ टक्के जास्त आहे. राज्यभरात मागील चोवीस तासात ३.२९ इंच पावसाची नोंद झाली असून मुरगाव येथे सर्वाधिक ५.३४ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे मागील चोवीस तासांत ५.२१ इंच पावसाची नोंद झाली आहे. दाबोळी येथे ४.२४ इंच पावसाची नोंद झाली आहे. पणजीमध्ये ... Read More »

१४५० गोमंतकीय खलाशी दाखल

सायप्रस व ग्रीसमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे अडकलेल्या १४५० दर्यावर्दींचे काल गुरूवारी मुरगाव बंदरात ‘सेलेब्रिटी इन्फिनिटी’ या जहाजातून आगमन झाले. या सर्वांची स्वॅब चाचणी सुरू झाली असून चाचणी नमुने गोळा करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल येईपर्यंत सर्व दर्यावर्दींना याच जहाजात ठेवण्यात येणार आहे. अहवाल आल्यानंतर दर्यावर्दींना विलगीकरणासाठी घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोग्य चाचणी व स्वॅब नमुने ... Read More »

भाजपची उद्या होणारी रॅली निषेधार्ह ः कॉंग्रेस

चीन सीमेवर लढताना भारतीय सैनिकांना बलिदान द्यावे लागते. देशाच्या सीमेचे व आपल्या सैनिकांचे रक्षण करणे भाजपला जमत नाही, परंतु मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळाची वर्षपूर्ती करुन उत्सव साजरे करण्याची भाजपची कृती निषेधार्ह आहे. लोकांना व खास करुन विद्यार्थ्याना गोव्यात नेटवर्क मिळत नसताना, भाजपच्या रॅलीला नेटवर्क कसा मिळतोअसा सवाल कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल मडगावात केला. सरकारकडून आज प्रत्येक गोमंतकीय आर्थिक ... Read More »

हैदरसाठी रोहित ‘आदर्श’

पाकिस्तानचा युवा उभरता सलामीवीर हैदर अली याने त्याच्यासाठी टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज ‘हिटमॅन’ रोहित शर्मा हा आदर्श असल्याचे सांगितले. भारताच्या या धडाकेबाज सलामीवीराच्या फलंदाजीचे अनुकरण करण्याची आपली इच्छा असल्याचे हैदरने काल एका व्हिडीओ प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना सांगितले. हैदर हा पाकिस्तानचा उभरता युवा फलंदाज असून त्याची ऑगस्ट-सप्टेंबरमधील इंग्लंडच्या दौर्‍यासाठी पाकिस्तानी संघात पहिल्यांदाच निवड झालेली आहे. त्याचा २०२०-२१चा मोसम धकाकेदार राहिला होता. ... Read More »

२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना होता ‘फिक्स’

>> लंकेच्या तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी केला दावा >> यापूर्वी रणतुंगानेही केला होता खळबळजनक आरोप १९९६ विश्वचषक विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगानंतर आता श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमागे यांनीही भारत आणि श्रीलंका यांच्यात २०११ साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना ‘फिक्स’ होता असा मोठा आरोप केला आहे. लंकेतील ‘न्यूज फर्स्ट’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महिंदानंद यांनी सरळ सरळ ... Read More »