Daily Archives: June 18, 2020

व्यर्थ न हो बलिदान

पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यामध्ये चीनच्या कुरापतखोरीचा विरोध करण्यासाठी गेलेल्या आपल्या वीस जवानांना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी शून्याखालील तापमानामध्ये लोखंडी सळ्या आणि दगडांनी ज्या निर्दयपणे मारले, त्या घटनेने संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. गेली अनेक वर्षे चीनकडून भारताच्या पूर्व सीमेवर सातत्याने वाद उकरून काढून कुरापत काढली जाते आहे. कधी देमचोक, कधी दोकलाम, कधी दौलतबेग ओल्डी अशी ठिकाणे वेगळी असतील, परंतु ... Read More »

बायणातील तीन इमारती निर्बंधित घोषित

>> वास्कोत तीन पोलीस पॉझिटिव्ह >> आरोग्य सचिव नीला मोहनन यांची माहिती बायणा वास्को येथील एका बर्फ उत्पादक कंपनीजवळील तीन इमारतींच्या भागाचा मायक्रो कटेंन्मेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. वास्कोतील तीन पोलीस कोरोनाबाधित आढळले असून बायणामध्ये कोरोना पॉझिटिव्ह २९ रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती आरोग्य सचिवा नीला मोहनन यांनी काल दिली. वास्कोतील तीन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ... Read More »

अधिवेशनाबाबत अद्याप निर्णय नाही

>> उपसभापतींची माहिती येऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट असून हे अधिवेशन कधी घ्यावे याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती काल उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली. पावसाळी अधिवेशनाबाबत १५ जूनपर्यंत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सभापती राजेश पाटणेकर यांनी अनधिकृतरित्या काही पत्रकारांशी बोलताना काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. मात्र, अधिवेशनाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे ... Read More »

आमदार अपात्रता प्रकरणावर सभापती निर्णय घेतील ः मुख्यमंत्री

गोवा विधानसभेचे सभापती आमदार अपात्रता प्रकरणी योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप कोअर ग्रुपच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केली. गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्यायालयाने प्रतिवादींना बाजू मांडण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी ... Read More »

भाजपची २० रोजी ‘व्हर्च्युअल रॅली’

>> प्रदेशाध्यक्ष तानावडे यांची माहिती मोदी सरकारने गेल्या एक वर्षाच्या काळात केलेल्या कामाविषयी भाजप कार्यकर्त्यांबरोबरच जनतेला माहिती देण्यासाठी भाजपने २० जून रोजी ‘व्हर्च्युअल रॅली’चे आयोजन केले आहे, अशी माहिती काल भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे व सरचिटणीस दामू नाईक यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे या रॅलीद्वारे नवी दिल्लीहून राज्यातील सुमारे १ लाख लोकांना ... Read More »

तर चीनला जशास तसे प्रत्युत्तर ः मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोर्‍यात झालेल्या घटनेबाबत बोलताना चीनला आम्हाला डिवचले तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ अशा इशारा दिला आहे. शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली देताना पंतप्रधानांनी वरील इशारा दिला. भारताला शांतता हवी आहे पण वेळ आल्यास भारत उत्तर देण्यात सक्षम असल्याचे मोदी म्हणाले. भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असा विश्वास मला देशवासीयांना द्यायचा आहे. आपल्यासाठी भारताची अखंडता ... Read More »

राज्यात मुसळधार पाऊस सुरूच

>> चोवीस तासांत ५.४० इंच वृष्टी राज्यात दमदार पाऊस सुरूच असून मागील चोवीस तासात ५.४० इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मागील सतरा दिवसांत २८.९७ इंच पावसाची नोंद झाली असून १७ पैकी ११ दिवस सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाचे आत्ताचे प्रमाण सरासरीपेक्षा ६६ टक्के जास्त आहे. येथील हवामान विभागाने राज्यभरात गुरुवारपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ... Read More »

आयसीसीचे वेळकाढू धोरण ः बीसीसीआय

ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने यंदाची टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धा भरवणे कठीण असल्याचे सांगूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मावळते अध्यक्ष शशांक मनोहर स्पर्धेच्या भवितव्याबाबत ठोस निर्णय घेण्याबाबत वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काल बुधवारी केला. आयसीसीचे आडमुठे धोरण इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीला खिळ घालण्यासाठी आहे, असे बीसीसीआयला वाटते. आयसीसीने या महिन्याच्या सुरुवातीला बैठक घेतली होती. परंतु, निर्णय मात्र पुढील महिन्यापर्यंत ... Read More »

आयसीसीचे वेळकाढू धोरण ः बीसीसीआय

ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने यंदाची टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धा भरवणे कठीण असल्याचे सांगूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मावळते अध्यक्ष शशांक मनोहर स्पर्धेच्या भवितव्याबाबत ठोस निर्णय घेण्याबाबत वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काल बुधवारी केला. आयसीसीचे आडमुठे धोरण इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीला खिळ घालण्यासाठी आहे, असे बीसीसीआयला वाटते. आयसीसीने या महिन्याच्या सुरुवातीला बैठक घेतली होती. परंतु, निर्णय मात्र पुढील महिन्यापर्यंत ... Read More »

अक्रमने दिला आठवणींना उजाळा

भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील सामन्यांदरम्यान दिसून येणारी खेळाडूंमधील खुन्नस सर्वांनाच माहीत आहे. या दोन्ही संघातील सामने बरेच चुरशीचे आणि रोमहर्षक झालेले दिसून येतात. दोन्ही संघादरम्यानच्या अनेक मालिका बर्‍याच अविस्मरणीय ठरलेल्या आहेत. पाकिस्तानचा माजी डावखुरा दिग्गज गोलंदाज वसिम अक्रमने भारत-पाक यांच्यात १९९९ साली रंगलेल्या कसोटी मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अक्रमने १९९९साली केलेला भारत दौरा हा त्याचा आवडता ... Read More »