Daily Archives: June 17, 2020

जनता साथ देईल

गोव्यातील कोरोना रुग्णसंख्या बघता बघता पाचशे पार जाऊन पोहोचली आहे. यापैकी सुरवातीच्या बहुतेक रुग्णांची चाचणी सीमेवरच होत होती. त्यामुळे ती वेळीच झाल्याने त्यांच्यावर तत्पर उपचार होऊ शकले. सोमवारपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार एकूण ५९२ रुग्णांपैकी ८५ रुग्ण बरे झाले आहेत, म्हणजे एकूण रुग्णांपैकी चौदा टक्के रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण येणार्‍या दिवसांत वाढेल, कारण यापैकी बहुतेक रुग्ण हे गेल्या काही दिवसांत ... Read More »

लडाखमध्ये २० भारतीय सैनिक शहीद

>> चिनी सैन्यासोबत चकमक, चीनचे ४३ जवान ठार लडाखच्या गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताचे कमीत कमी २० सैनिक हुतात्मा झाले आहेत. दरम्यान, या चकमकीत चीनचे ४३ सैनिक मारले गेले असून अनेक सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्रत्यक्ष सीमारेषेवर दोन महिन्यांपासून असणारा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून माघार घेतली जात असतानाच ... Read More »

बायणातील काही भाग निर्बंधित करणार

>> मुख्यमंत्री; इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक चाचण्या गोव्यात राज्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, नावेली स्टेडियम आणि पेडणे स्टेडियम या प्रमुख तीन स्टेडियममध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्कोतील मांगोर हिलनंतर कोविड पॉझिटिव्ह जास्त रुग्ण आढळून आलेल्या बायणातील काही भागात कटेंन्मेंट झोन जाहीर करण्यावर विचार केला जात असून बुधवारपर्यंत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद ... Read More »

नवीन ३७ कोरोना पॉझिटिव्ह

>> मांगूर हिलमध्ये नवे १७ बाधित, रुग्णसंख्या ५४४ राज्यात कोरोना पॉझिटिव्ह ३७ नवीन रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह सध्याच्या रुग्णांची संख्या ५४४ वर पोहोचली आहे. मांगूर हिलमध्ये आणखी १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून मांगूर हिलाशी संबंधित आणखी ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कुडतरी, राय, चिंबल, बायणा, सडा – वास्को येथे नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून ... Read More »

डेकसामेथासॉन’ औषध कोरोना रुग्णांचे जीव वाचवू शकते

>> इंग्लंडच्या शास्त्रज्ञांचा दावा इंग्लंडमधील कोविड-१९ विषयक शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, कोविड-१९ चे जे रुग्ण इस्पितळात उपचार घेत असतात त्यांना कमी मात्रेत डेक्सामेथासॉन हे जेनरिक स्टेरॉईड औषध दिल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होते. या जीवघेण्या साथीचा तीव्र संसर्ग झालेल्या तीन रुग्णांपैकी किमान एक रुग्ण वाचू शकतो. या शास्त्रज्ञांनी ‘रिकव्हरी’ नामक चाचण्या घेतल्यानंतर वरील दावा केला आहे. या भयंकर साथीचा संसर्ग ... Read More »

माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन

भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखालील मुक्तीनंतरच्या पहिल्या गोवा, दमण व दीव विधानसभेतील (१९६३-६६) आमदार व माजी मंत्री अच्युत काशिनाथ सिनाय उसगांवकर (९२) यांचे काल सकाळी ७.३० वाजता गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात वृद्धापकाळाने निधन झाले. गोव्याच्या पहिल्या विधानसभेतील हयात असलेल्या तिघा आमदारांपैकी ते एक होते. तियोतिनो पेरेरा व कविवर्य गजानन रायकर हे हयात असलेले अन्य दोन आमदार होत. अच्युत उसगांवकर हे मगो ... Read More »

जोरदार पावसाने राज्याला झोडपले

राज्याला जोरदार पावसाने काल झोडपून काढले. राजधानी पणजीसह सर्वच भागात जोरदार पाऊस पडला. पणजी शहरातील अनेक रस्ते पहिल्या पावसात पाण्याखाली गेले. मागील चोवीस तासांत ३.५५ इंच पावसाची नोंद झाली आहे. मुरगाव येथे सर्वाधिक ६ इंच आणि दाबोळी येथे ४.७७ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत २३.५७ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त आहे. राज्यभरात ... Read More »

‘स्ट्राईक’ बदलण्यात विराट पारंगत

>> गौतम गंभीरने सांगितले कोहलीचे वेगळेपण वेस्ट इंडीजचा गेल, सलामीवीर रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा ‘मि. ३६०’ एबी डीव्हिलियर्स यांच्यापेक्षा टीम इंडिया कर्णधार विराट कोहली सरस असल्याचे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने काल मंगळवारी सांगितले. ‘स्ट्राईक रोटेट’ करण्यात विराटचा हात धरणारा दुसरा कोणी नाही. मर्यादित षटकांच्या लढतींत सातत्यपूर्ण कामगिरी करणे आणि सतत धावा करणे हाच निकष लावला तर त्यात ... Read More »

थोयबा सिंग ओडिशा संघात

ओडिशा एफसीने मंगळवारी मध्यरक्षक थोयबा सिंग मोयरांगथेम याला आपल्या संघात सामावून घेतले. इंडियन सुपर लीगच्या सातव्या मोसमापूर्वी त्यांनी मणिपूरच्या या युवा खेळाडूला तीन वर्षांसाठी करारबद्ध केले. भुवनेश्‍वरस्थित या फ्रेंचायझीने सध्या नवीन खेळाडूंना आपल्या संघात घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी जॉर्ज डिसोझा, कमलप्रीत सिंग, कमलजीत सिंग, हेंड्रे अँथनी, व सौरभ मेहर यांना यापूर्वीच आपल्या संघात घेतले आहे. ‘ओडिशा एफसीकडून खेळताना आयएसएलमध्ये ... Read More »

फुटबॉल स्टेडियमचे उद्घाटन

एज्युकेशन सिटी स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. २०२२ साली कतारमध्ये होणार्‍या फिफा विश्‍वचषक स्पर्धेसाठी या स्टेडियमचा वापर केला जाणार आहे. पूर्ण झालेले हे तिसरे स्टेडियम आहे. सुप्रीम कमिटी फॉर डिलिव्हरी अँड लेगसी (एससी) आणि कतार फाऊंडेशन यांनी या स्टेडियमची उभारणी केली आहे. कोरोना योद्ध्यांना ते समर्पित करण्यात आले असून या स्टेडियमची क्षमता ४०,००० आहे. अद्याप पाच स्टेडियमचे काम सुरु आहे. ४०,००० ... Read More »