Daily Archives: June 16, 2020

कोविड केंद्रांना विरोध नको

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर सरकार सर्वत्र कोविड केअर सेंटरांच्या उभारणीसाठी धावपळ करू लागले आहे. मात्र, ठिकठिकाणी या केंद्रांना जो काही विरोध चालला आहे तो मुळीच समर्थनीय नाही. कोरोनाशी लढायचे असेल तर उपचारसुविधा जेवढ्या प्रमाणात वाढतील तेवढ्या हव्याच आहेत या भूमिकेतून जनतेने त्याकडे पाहिले पाहिजे. कोविड केअर सेंटर आपल्या शेजारी उभे राहिले म्हणजे कोरोना आपल्या घरी येईल असे नव्हे, उलट घरात ... Read More »

कोरोनाबाधितांची संख्या पाचशे पार

>> नवीन २८ रुग्णांमुळे राज्यात ५०७ पॉझिटिव्ह >> ११ जण कोरोनामुक्त राज्यात नवीन २८ कोरोना पॉझिटिव्ह काल आढळून आल्या असून राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ५०७ वर पोहोचली आहे. मांगूर हिलशी संबंधित आणखी नवीन १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, राय आणि कुडतरी येथे प्रत्येकी १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह ११ रुग्ण ... Read More »

प्रसंगी चाळीसही मतदारसंघात एकेक कोविड केंद्र ः मुख्यमंत्री

>> तीन इनडोअर स्टेडियममध्ये केंद्र राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून कोरोना पॉझिटिव्ह सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गरज भासल्यास ४० मतदारसंघात प्रत्येकी एक कोविड केअर सेंटर सुरू करण्यास सरकार मागे राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल दिली. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कार्य करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांचा सन्मान करण्याची गरज आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी एकजुटीने ... Read More »

केपे कोविड केंद्र रद्द ः कवळेकर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्तक्षेपानंतर केपे येथील सरकारी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री, केपेचे आमदार चंद्रकांत कवळेकर यांनी काल दिली. केपे येथील सरकारी महाविद्यालय कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी जारी केला होता. केपेतील सरकारी महाविद्यालयात कोविड केंद्र सुरू करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. ... Read More »

लॉकडाऊन करण्याचा अधिकार पंचायतींना नाही : मुख्यमंत्री

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी पंचायती आपल्या क्षेत्रात लॉकडाऊन करू शकत नाहीत. पंचायतींना तसे अधिकार दिलेले नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनधिकृतरित्या पत्रकारांशी बोलताना दिली. काल पत्रकारांनी त्यांना त्यासंबंधी छेडले असता ते बोलत होते. सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल येथे कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर चिंबल पंचायतीने सोमवारी पंचायत क्षेत्रात ७ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे ... Read More »

आजपासून मासेमारी बंदी

राज्यात आज १६ जूनपासून मासेमारी बंदी लागू करण्यात येत असून राज्यातील सर्व जेटींना व जेटीवरील डिझेल पंपांना सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती मच्छिमारी खात्याच्या संचालक डॉ. शर्मिला मोंतेरो यांनी काल दिली. ही बंदी ३१ जुलैपर्यंत राहणार आहे. दरवर्षी १ जून ते ३१ जुलै असे ६१ दिवस राज्यात मच्छिमारी बंदी लागू करण्यात येत असे. पश्‍चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांना ती बंदी लागू ... Read More »

चिंबल लॉकडाऊन मागे

चिंबल ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह ११ रुग्ण आढळून आल्याने चिंबल ग्रामपंचायतीने जाहीर केलेली सात दिवस लॉकडाऊनची घोषणा अखेर मागे घेण्यात आली. स्थानिक आमदार आन्तोनियो फर्नांडिस यांच्या उपस्थितीत चिंबलचे सरपंच चंद्रकांत कुंकळ्येकर यांनी १७ ते २३ जूनपर्यंत पंचायत क्षेत्रात लॉकडाऊन पाळण्याची घोषणा पत्रकार परिषदेत काल केली होती. आमदार फर्नांडिस यांनी चिंबल पंचायतीच्या लॉकडाऊनचे समर्थन केले होते. गावात स्वयंस्फूर्तीने बंद पाळणार्‍यांना कुणीही ... Read More »

बांधकाम खात्यातील १११५ कामगारांचा सोसायटीत समावेश

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटदारांच्या हाताखाली अनेक वर्षे काम करणार्‍या १११५ कामगारांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामगार सोसायटीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या १११५ कामगारांना सोसायटीमध्ये समावेशाबाबतची नियुक्ती पत्रे एका कार्यक्रमात काल देण्यात आली. कंत्राटदारांच्या हाताखाली काम करणार्‍या कामगारांचा पीडब्ल्यूडीच्या कामगार सोसायटीमध्ये समावेशामुळे वार्षिक सात कोटी रुपयांची बचत होणार आहे. या कामगारांना आता वेळेवर ... Read More »

हजारे, देवधर, दुलीप ट्रॉफी रद्द करा

>> वसीम जाफर याची मागणी देशांतर्गत क्रिकेटमधील भारताचा सर्वांत यशस्वी खेळाडू व भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने विजय हजारे, दुलीप ट्रॉफी व देवधर ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याची मागणी काल सोमवारी केली. देशांतर्गत क्रिकेट मोसम ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता धुसर असल्यामुळे बीसीसीआयने केवळ रणजी करंडक व सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटीवर लक्ष केंद्रीत करावे, असे जाफरला वाटते. जाफर म्हणाला की, कोरोनाचा ... Read More »

धावपटू हिमाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

भारताची सध्याची अव्वल धावपटू हिमा दास हिची आसाम सरकारने या वर्षीच्या प्रतिष्ठेच्या ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’साठी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. आसामचे क्रीडा सचिव दुलाल चंद्र दास यांनी हिमाच्या नावाची शिफारस करणारे पत्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला पाठवले आहे. आसामच्या धिंग गावात जन्मलेली २० वर्षीय युवा हिमा दास ही यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झालेली सर्वांत तरुण उमेदवार ठरली आहे. ... Read More »