Daily Archives: June 15, 2020

कोरोना, शेतकरी आणि शेती

डॉ. श्रीरंग जांभळे शेती व शेतकर्‍यांबद्दल समाजामध्ये सहानुभूती वाढत आहे. शेती उत्पादनासाठी शेतकरी घेत असलेले कष्ट व त्याला भेडसावणारे प्रश्‍न, येणार्‍या अडचणी यांबाबत समाज दखल घेताना दिसतो. नवीन पिढीतील उच्च विद्याविभूषित व कष्टकरी युवक शेतीकडे एक आव्हानात्मक व्यवसाय म्हणून पाहत त्याकडे आकर्षित होत आहेत. नवीन पिढी शेतीकडे परत येण्यासाठी संबंधित शिक्षणाच्या योग्य संधी उभ्या करून सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणा बळकट करणे ... Read More »

समुद्र, समुद्राची रूपे…

डॉ. सोमनाथ कोमरपंत समुद्राची अथांगता आणि भव्यता पाहून त्याचे धीरगांभीर्य आणि धीरोदात्तता जाणवते. त्याच्या लाटांचे लास्य आणि तरंगांचे विभ्रम अनुभवताना त्याच्या अंतरंगातील धीरलालित्य प्रत्ययास येते. असा हा अभिजात समुद्र आणि त्याची अभिजात रूपं… समुद्र मला आवडतो. बालपणापासून मी समुद्र पाहत आलेलो आहे. समुद्रानुभूती ही आगळी-वेगळी अनुभूती आहे. समुद्र पाहता पाहता समुद्ररूपात एकरूप होणे ही एक प्रक्रिया आहे. आपण सारे बिंदू ... Read More »

हॉंगकॉंगच्या जनतेचे निर्णायक युद्ध

–  दत्ता भि. नाईक तैवानवर हक्क गाजवण्याच्या तयारीत असलेल्या चीनला हॉंगकॉंगची जनता नाकीनऊ आणत आहे. साध्या नागरी हक्कांच्या मागणीसाठी सुरू झालेले हे आंदोलन चीनच्या तकलादू ऐक्यात सुरुंग लावील की काय अशी परिस्थिती उद्भवलेली आहे.   आर्थिक महासत्ता बनण्यासाठी चीनची जशी धडपड चालू आहे, त्याचप्रमाणे जगातील एक सामरिक सत्ता म्हणूनही नाव कमावण्याची हौस चिनी राज्यकर्त्यांमध्ये दिसून येते. मूलतः चीन हा फार ... Read More »

अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आठ कलमे

शशांक मो. गुळगुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षी जीडीपी वाढ ५ टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने पुढील आठ निर्णय राबवावेत. हे राबविण्यासाठी जास्त पैशांची गरज नसून राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. कोरोनामुळे देशाची आणि जागतिकसुद्धा अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणावर अडचणीत आली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षी जीडीपी वाढ ५ टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज ... Read More »

प्राणी-जंगल-माणूस

 पौर्णिमा केरकर माणसा तू कधी विचारच करीत नाहीस का? तुझा जन्म कशासाठी आहे… लाचारीने जगण्यासाठी? धनदौलत जमविण्यासाठी, स्वतःला आणि जगाला फसविण्यासाठी? कायमस्वरूपी द्वेष, मत्सराने कुढण्यासाठीच…? जगण्यातला आनंद कधी शोधशील? केरळमध्ये गर्भवती हत्तिणीची क्रूरतेने हत्या करण्यात आली. अननसामध्ये स्फोटके भरून ती तिला खायला देऊन त्याद्वारे तिच्या तोंडात विस्फोट घडवून आणला. हे कृत्य कोणी केलेले आहे ती स्वतःला माणसे समजतात, ही मोठीच ... Read More »

वृक्षवल्ली

 मीना समुद्र त्यासाठी धीर हवा, संयम हवा. असा धीर, असा संयम झाडे धरतात त्यामुळे विलक्षण सौंदर्याची खाण आपल्याला गवसते. फुलाफुलांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आरोग्याचा वरही! झाडांची मोठी गंमत असते, मग ती मोठी असोत की छोटी. बागेत त्यांची देखभाल करण्यासाठी कुणी असल्याने ती जरा शिस्तीत रोपलेली, राखलेली, वाढवलेली आणि काळजीपूर्वक जतन केलेली असतात. रानावनात मात्र ती उंच उंच वाढलेली, तर ... Read More »

म्हापसा नागरी सहकारी बँक व ऋणशोधनाधिकार्‍याची नेमणूक

प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट ‘विना सहकार नाही उद्धार’ या ब्रिदवाक्याला धक्का देणार्‍या सहकार चळवळीचा पायाच ‘दि म्हापसा नागरी सहकारी बँक ऑफ गोवा मर्यादित’ बँकेसारख्या बँकांनी ढासळून टाकला आहे अशी जहरी टीका सहकारी चळवळीतील कार्यकर्ते उघडपणे करताना दिसतात. इ.स. २०१५ साली ज्यावेळी या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली त्यावेळी अवघ्याच काही भागधारकांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. बँकेच्या आमसभेत याला ... Read More »

पदार्पणातील शतकवीर

– सुधाकर नाईक कसोटी पदार्पणात तब्ब्ल पंधरा फलंदाजांनी तीन अंकी जादुई आकडा पार करण्याची मर्दुमकी गाजविली पण यातील सात भारतीय दिग्गजांना मात्र कसोटी पदार्पणातील शतकानंतर कारकिर्दीत पुन्हा तीन अंकी जादुई आकडा पार करण्यात यश आले नाही. भारतीय क्रिकेटचा इतिहास अत्यंत रोमांचक असून अनेक भारतीय दिग्गजांनी आपल्या अजोड कामगिरीने तो संस्मरणीय बनविला आहे. कसोटी पदार्पणात शतक हा उमद्या क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीतील सर्वोच्च ... Read More »