Daily Archives: June 15, 2020

कसोटीची वेळ

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा झाकोळ काल रविवारच्या दिवसावर राहिला. एक उभरता गुणी अभिनेता असा एकाएकी कधीही परत न येण्याच्या काळोख्या मार्गाने स्वतःहूनच का गेला असावा हे कोडे आता त्याच्या लक्षावधी चाहत्यांसाठी मागे उरले आहे. कोरोनाने सध्या संपूर्ण जगावर नकारात्मकतेच्या कृष्णछाया आणलेल्या आहेत. सततच्या लॉकडाऊनमधून मनामनांवर वाढलेला ताणतणाव, उणावलेला आत्मविश्वास, लांबणीवर ढकलल्या गेलेल्या व्यावसायिक संधी, त्यातून निर्माण झालेले आर्थिक, व्यावहारिक पेच ... Read More »

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या

>> बॉलिवूडला धक्का, धोनीवरील बायोपिकने खरी ओळख प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (३४) याने काल रविवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र या संबंधी पोलीस तपास करत आहेत. शनिवारी रात्री सुशांतचे काही मित्र त्याच्या घरी होते. रविवारी सकाळी बराचवेळ सुशांतने घराचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या घरी काम करणार्‍या नोकराने दरवाजा तोडला. ... Read More »

नवीन ४१ रुग्णांसह एकूण संख्या ४९०

 >> मांगूर हिलमध्ये आणखी २९ पॉझिटिव्ह, ४ रुग्ण कोरोनामुक्त राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत चालले असून नवीन ४१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ४९० वर पोहोचली आहे. मांगूर हिलमध्ये नवीन २९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मांगूर हिलाशी संबंधित आणखी नवीन ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना ... Read More »

आगरवाडा लॉकडाऊन मागे

आगरवाडा पंचायत मंडळ, व्हिलेज डेव्हलपमेंट समिती, नागरिक, व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने आज सोमवार रविवार दि. २१ पर्यंत आगरवाडा-चोपडे पंचायतक्षेत्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पेडणे पोलिसांच्या आणि सरकारी यंत्रणेच्या दबावाखाली हेलॉकडाऊन मागे घेण्यात आले आहे. आगरवाडा सरपंच प्रमोद गावकर यांनी याबाबत काल दि. १४ रोजी पंचायत मंडळाची तातडीची बैठक घेत लॉकडाऊन मागे घेतल्याचे नमूद केले. सरपंच श्री. गावकर यांना पेडणे ... Read More »

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

खोर्ली म्हापसा येथील प्रसाद भालचंद्र आरोलकर (२६) या युवकाला विजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.काल रविवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. प्रसाद हा काल रविवारी सकाळी घराच्या छपरावर प्लास्टिक घालण्यासाठी लोखंडी शिडी घेऊन जात असताना घराजवळच्या विजेच्या तारांना ती शिडी लागली व त्यामुळे धक्का बसून प्रसाद याचे निधन झाले. कुटुंबीयांनी त्याला पेडे जिल्हा इस्पितळात नेले असता तेथील ... Read More »

राज्यात तीन नवीन कोविड केअर सेंटर

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. मडगाव येथे कोविड इस्पितळामधील २२० खाटा कमी पडत असल्याने राज्यात कोविड केअर सेंटर सुरू केली जात आहेत. राज्यात शिरोड्यानंतर केपे, वास्को आणि कोलवा येथे नवीन तीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनानेकेपे सरकारी महाविद्यालयाची इमारत आणि सभागृह ताब्यात घेतले आहेत. तसेच, ... Read More »

एनआयसीचे सरकारला अनमोल साहाय्य

>> कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध ‘ई-सेवा’ राष्ट्रीय माहिती केंद्र गोवाने (एनआयसी) कोविड-१९ या महामारीच्या काळात राज्य सरकारच्या सर्व सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मोलाचे साहाय्य केले आहे. एनआयसी, गोवाने कोविड महामारीच्या काळात केंद्र व राज्य सरकारी कार्यालयांवर माहिती तंत्रज्ञानासंबंधी कोणत्याही गुंतागुंतींचा प्रभाव पडू नये म्हणून आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या. कोविड महामारीमुळे केंद्र आणि राज्य सरकारचा जास्तीत जास्त कारभार केवळ ’ई-सेवा’ पद्धतीने चालविला ... Read More »

चौदा दिवसांत राज्यात १९ इंच पावसाची नोंद

राज्यात मागील चौदा दिवसात सुमारे १८.९६ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाचे सामान्य प्रमाण अंदाजापेक्षा ५३ टक्के जास्त आहे. दरम्यान, रविवारी पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने नागरिकांना उष्णतेला तोंड द्यावे लागले. मागील चोवीस तासात उत्तर गोव्यात जोरदार पाऊस पडला. पेडणे येथे सर्वाधिक ४.७४ इंच, ओल्ड गोवा येथे ४.३५ इंच पावसाची नोंद झाली आहे. साखळी येथे ३.६२ इंच, पणजी येथे २.७४ ... Read More »

निलंबनानंतर बदलली विचार प्रक्रिया

>> लोकेश राहुलने सांगितले यशाचे रहस्य ‘कॉफी वुईथ करण’ या कार्यक्रमात महिलांसंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झाल्यानंतर मला खडबडून जाग आली व मी माझी खेळासंबंधीची विचार प्रकिया पूर्णपणे बदलून टाकली. या बदललेल्या प्रक्रियेमुळे मी सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलो, असे भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याने काल रविवारी सांगितले. राहुल व हार्दिक पंड्या यांना मागील वर्षी आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक ... Read More »

प्रेक्षकांच्या अनुपस्थितीचा फायदा

>> विंडीजचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांचे मत स्टेडियममधील पाठिराख्यांच्या अनुपस्थितीचा तसेच जवळपास दोन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर इंग्लंडचा संघ मैदानावर उतरण्याचा फायदा वेस्ट इंडीज संघाला होऊ शकतो, असे विंडीज संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांना वाटते. वेस्ट इंडीजचा संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. पुढील महिन्यात या मालिकेला सुरुवात होणार आहे. कॅलेंडर वर्षातील क्रिकेट मार्च महिन्याच्या मध्यावर स्थगित करण्यात आल्यानंतर ... Read More »