Daily Archives: June 13, 2020

मन झाले ओलेचिंब…

 अंजली आमोणकर पाऊस हा निसर्गाचा सर्वांत सर्जनशील अवतार. जणुं सृष्टीच्या कर्त्याला सुचलेली कविता; निसर्गातील उत्कट संगीत. ‘मन उधाण वार्‍याचे…’- करत घरातून शाळेत, शाळेतून कॉलेजात, कॉलेजातून रस्ताभर व रस्त्यावरून परत विविध गावात- शहरात- घरात असा भेटत जाणारा पाऊस….. खरंतर पाऊस म्हणजे एकीकडे स्वतःच एक कविता, एक संगीत रचना आणि म्हटलं तर सार्‍या स्वरशब्दांपलीकडे उभा असतो. डोळ्यांत पाणी येईपर्यंत वाट पहायला लावणारा ... Read More »

उरल्या सगळ्या त्या आठवणी…

अनुराधा गानू (आल्त-सांताक्रूझ, बांबोळी) या लिखाणाची सुरुवात एकेकाळी झालीय दगडी पाटी आणि लेखण यांनी झालीय. त्यानंतर दौत म्हणजे शाई भरलेली एका विशिष्ट आकाराची बाटली आणि त्यात टाक बुडवून लिहायचं. मग थोडीफार शाई हाताला आणि कपड्यांना लागायची. मग आईचं रागावणं. पण ती दगडी पाटी, पेन्सिल, दौत, टाक, आईचं रागावणं सगळंच आता उरलंय आठवणींच्या रूपात. टीव्हीवर क्रिकेटची मॅच चालू होती. ती बघता ... Read More »

‘त्या’ प्रेमळ आठवणी

 दीप्ती रायकर (मळा-पणजी) आमची आजी तापट व फटकळ जरी होती अन् त्या गोष्टीची भीती जरी होती तरीदेखील ती आमची आजी होती, आमच्यावर जरी ओरडली तरी तिचं आमच्यावर प्रेम होतंच, हे नक्की! आजी-आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करुन घ्यायला नशीब लागतं. कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती घरात वावरणारी ज्येष्ठ मंडळी, म्हणजेच आपले आजी-आजोबा. प्रत्येक घरात कुणाचातरी धाक अथवा दरारा ... Read More »

स्मृतींचे पापुद्रे उलगडताना…

– सौ. माधुरी र. शे. उसगावकर (फोंडा) माझ्या जीवनात आलेल्या व्यक्तींपासून हेच शिकायला मिळाले. वाटतं तेवढं जीवन सोपं नाही. तसंच ते कठीणही नाही. निखळ प्रेमाने बर्‍याच गोष्टीतील गुंता सुटतो. यासाठी नम्रता ही अत्यंत आवश्यक असते. नम्र मनच लवचिक होऊ शकतं. अलीकडेच दूरदर्शनवर श्री. भिंगीचा नकलांचा कार्यक्रम पाहिला. विविध राजकीय नेते, सिनेनटांच्या वेगवेगळ्या नकला करून दाखविल्या. त्यात माजी मुख्यमंत्र्यांची नक्कल एकदम ... Read More »