Daily Archives: June 13, 2020

भिवपाची गरज आसा

गोव्यातील मांगूर हिलच्या कोरोना संक्रमणाची व्याप्ती वाढत वाढत आता जवळजवळ संपूर्ण गोवाभर पसरली आहे. गोवा हा असे संक्रमण फैलावण्यासाठी किती छोटा प्रदेश आहे ते यातून कळून चुकते. चिंतेची बाब म्हणजे राज्यामध्ये पुन्हा नवे ‘मांगूर हिल’ निर्माण होतील की काय असे वाटायला लावणारी परिस्थिती मोर्ले किंवा चिंबलसारख्या ठिकाणी झालेल्या कोरोना संक्रमणांनी निर्माण केलेली आहे. आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांमार्फत मोर्ले भागात कोरोनाचे संक्रमण ... Read More »

घोडेमळ-मोर्ले कंटेनमेंट झोन जाहीर

>> शिरेन-चिंबललाही कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची मागणी कोरोना पॉझिटिव्ह वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे सत्तरी तालुक्यातील मोर्ले पंचायत क्षेत्रातील घोडेमळ हा भाग राज्यातील दुसरा कन्टेनमेंट झोन (प्रतिबंधित) म्हणून जाहीर करण्यात आला असून कांसारवाडो आणि देऊळवाडा हे दोन भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. मांगूरहिल पाठोपाठ घोडेमळ हा गोव्यातील दुसरा कंटेनमेंट झोन ठरला आहे. दरम्यान, चिंबलमध्ये काल ८ पॉजिटिव्ह कोरोना रुग्ण ... Read More »

सकाळी ७ ते १२ दरम्यान पणजी मार्केट राहील खुले

पणजी महानगरपालिकेने मुख्य मार्केट सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी काल दिली. मार्केटमधील एका तावेर्नमधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तसेच चिंबल येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने सोमवारपर्यंत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मार्केटमधील व्यापार्‍यांची भाजी, फळे व इतर नाशवंत सामान अचानक जाहीर ... Read More »

राशोलमध्ये वटवृक्ष स्कूटरवर कोसळून स्कूटरस्वार ठार

राशोल येथे काल स्कूटरस्वारावर वटवृक्ष पडल्याने ८१ वर्षीय वृद्ध स्कूटरस्वार ठार झाला. राशोल सेमिनारीजवल हा अपघात झाला. राय येथील रोझारियो कामिल फर्नांडिस हा वृद्ध आपल्या स्कूटरने जात असता त्याच्यावर वडाचे झाड पडले. जोरदार वारे व पावसामुळे या भागात अनेक झाडांची पडझड झाली. Read More »

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांचा १६, १७ रोजी सुसंवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता येत्या दि. १६ व १७ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील कोरोना महामारीसंदर्भात विविध राज्ये व संघ प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांवर पोचली असल्याच्या पार्श्‍वभूमीवर याबाबत घोषणा करण्यात आली आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांशी सुसंवाद साधण्याची १६ रोजी संधी मिळणार आहे. या संदर्भातील अधिसूचनेनुसार या सुसंवाद कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांची दोन गटांत विभागणी करण्यात ... Read More »

‘गुलमोहर’कार जयराम कामत निवर्तले

>> ज्येष्ठ गोमंतकीय ललित लेखक व कथाकार दै. ‘नवप्रभा’चे स्तंभलेखक (‘गुलमोहर’कार) म्हणून एकेकाळी संपूर्ण गोवाभर सुपरिचित असलेले ज्येष्ठ ललित लेखक व कथाकार जयराम पांडुरंग कामत (८७) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पकालीन आजाराने अस्नोडा येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाला दान केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. प्रतिभावान असे ललित साहित्यिक असलेल्या जयराम पांडुरंग कामत यांनी ... Read More »

मडगावहून श्रमिक रेल्वेतून २५०० स्थलांतरित रवाना

गेल्या चार दिवसांपासून फातोर्डा नेहरू स्टेडियमवर व विविध ठिकाणी अडकून पडलेल्या अंदाजे २५०० स्थलांतरितांना दोन श्रमिक रेल्वेतून पाठविण्यात आले. काल दुपारी पश्‍चिम बंगाल व ओरिसा येथील १२७९ मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे मडगाव स्टेशनवरून सोडण्यात आली. दुसरी गाडी संध्या. ७ वाजता सोडण्यात आली. ती गाडी झारखंड व बिहार येथील स्थलांतरितांना घेऊन गेली. तरीही शेकडो कामगार रेल्वे स्टेशनवर होते. गेले चार दिवस ... Read More »

इंग्लंड दौर्‍यासाठी पाक संघाची घोषणा

>> नवोदित फलंदाज हैदर अली, अष्टपैलू काशिफ भट्टीला संधी इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी व तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या माालिकेसाठी पाकिस्तानने काल आपला २९ सदस्यीय संघ जाहीर केला. अष्टपैलू काशिफ भट्टी व २०१६ साली आपला शेवटचा कसोटी सामना खेळलेला जलदगती गोलंदाज सोहेल खान यांना या संघात स्थान देण्यात आले आहे. १९ वर्षांखालील संघातील स्टार खेळाडू हैदर अली याला निवडून पीसीबीने त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची ... Read More »

बाबरला मोठा पल्ला गाठायचाय ः युनिस

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व पाकिस्तानचा नवोदित कर्णधार बाबर आझम यांची तुलना योग्य नसल्याचे पाकिस्तानचा माजी कसोटीपटू व विद्यमान फलंदाजी प्रशिक्षक युनिस खान याने सांगितले आहे. बाबरला विराटच्या जवळपास जाण्यासाठी किमान पाच वर्षे लागतील असे युनिसला वाटते. विराट आता चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि जगातील टॉप फलंदाज आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात चांगला खेळत आहे. आझमही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही ... Read More »

साहित्य सृष्टीतील गुलमोहर

 सोमनाथ कोमरपंत गोमंतकातील ज्येष्ठ कथाकार आणि दोन तपे ‘नवप्रभा’ दैनिकात सातत्याने ‘गुलमोहर’ या लोकप्रिय सदरात लिहिणारे ललितनिबंधकार जयराम पांडुरंग कामत यांचे आज पहाटे अल्प आजाराने निधन झाल्याची वार्ता माझे स्नेही अनिल लाड यांनी कळवली. ऐकून काळजाचा ठोका चुकला. ही बातमी ऐकल्यानंतर कैक वर्षांचा कालपट डोळ्यांसमोरून तरळून गेला. त्यांच्या वाङ्‌मयीन प्रवासाचा हा आलेख….. गोमंतकातील ज्येष्ठ कथाकार आणि दोन तपे ‘नवप्रभा’ दैनिकात ... Read More »