Daily Archives: June 12, 2020

गावोगावी कोरोना

सरकारच्या कोरोनासंदर्भातील नव्या रणनीतीमुळे जे घडण्याची भीती आम्ही व्यक्त केली होती, तेच आता घडू लागलेले दिसते आहे. कोरोना आता दर दिवसागणिक गोव्याच्या गावोगावी, खेडोपाडी जाऊन पोहोचू लागला आहे. मुरगावातील मांगूर हिलपासून थेट पेडण्यातील पालये, सत्तरीतील, गुळेली, शिरोली, मोर्ले, मलपण, धारबांदोड्यातील उसगाव, तिसवाडीतील चिंबल, ताळगाव, काणकोणमधील सावंतवाडा, सांग्यातील मुगोळी आणि फणसामळ असे सर्वदूर कोरोनाबाधित सापडू लागले आहेत. यापैकी बहुतेक जण हे ... Read More »

विविध तालुक्यांत कोरोना रुग्णांमुळे नागरिकांत भीती

>> अनेक भागांमध्ये स्वयंस्फूर्त लॉकडाऊन ः गुरुवारी सापडले ३० नवीन कोरोना रुग्ण मुरगाव तालक्यातील वास्कोमधील मांगूर हिल हा मोठ्या संख्येतील कोरोना रुग्णांमुळे गोव्यातील हॉटस्पॉट ठरला असला तरी या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग आता राज्याच्या अन्य काही तालुक्यांमध्येही पसरल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांगूर हिल पाठोपाठ आता सत्तरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या १४ वर गेली आहे. तर काणकोण ... Read More »

पणजी मार्केट आजपासून राहणार चार दिवस बंद

पणजी महानगरपालिकेच्या मार्केटमधील एका दारूच्या दुकानात काम करणारी व्यक्ती काल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने राजधानीत खळबळ उडाली आहे. तसेच चिंबल गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने पणजी महानगरपालिकेने चार दिवस मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी १५ जूनला मार्केट पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. चिंबलमध्ये सापडलेली ... Read More »

सत्तरीत दोन नवे कोरोना रुग्ण

सत्तरीत कोरोनाचे काल दोन रुग्ण सापडले असून सत्तरीत कोरोनाचे एकूण १४ रुग्ण झाले आहेत. यापूर्वी मोर्ले सत्तरीत आठ, शिरोली दोन व गुळेलीत एक रुग्ण, मलपण येथे एक रुग्ण सापडले होते. काल मोर्ले येथे त्यात एका रुग्णाची भर पडली असून मलपण येथे एक रुग्ण सापडला आहे. मलपण येथे सापडलेला नवीन रुग्ण ही आधीच्या रुग्णाची पत्नी आहे. सत्तरीत वातावरण भयभीत सत्तरीत कोरोनाचे ... Read More »

गावडोंगरीत सापडला एक कोरोना रुग्ण

कोविड १९ च्या महामारीबाबतीत इतके दिवस ग्रीन झोनमध्ये असलेला काणकोण तालुका आता धोक्याची सीमा पार करायला लागला आहे. कोळंब येथील एकाच वाड्यावरील ३ पॉझिटिव्ह रूग्ण शिरोडा येथील कोविड इस्पितळात उपचार घेत असतानाच कर्वे – गावडोंगरी येथे नवीन १ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण काल आढळला आहे. Read More »

व्हीपीके अर्बन सोसायटीवर सहा महिने निर्बंध

राज्य सहकार निबंधकांनी राज्यातील सहकारी क्षेत्रातील आघाडीवरील व्हीपीके अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. या सोसायटीला नवीन ठेवी स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली असून पिग्मी घेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. केवळ कर्जाशी संबंधित पिग्मी गोळा करण्यास मान्यता दिली आहे. या के्रेडिट सोसायटीची कर्ज देण्याची मर्यादा ५ लाखांवर आणण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश सहकार निबंधक विकास गावणेकर यांनी जारी ... Read More »

कोरगावात दोन महिला ठरल्या कोरोना पॉजिटिव्ह

>> मुंबईहून ७ जूनला आल्या होत्या; तिसर्‍याचा अहवाल निगेटीव्ह पेठेचावाडा-कोरगाव येथे मुंबईहून आलेल्या दोन महिला कोरोना रुग्ण सापडल्याने कोरगाव गावात आणि पेडणे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. तुये सामुदायिक केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. विद्या परब यांनी कोरगाव येथे मुंबईहून आलेल्या दोन महिला कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह मिळाल्याची माहिती दिली. कोरगाव येथे दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर तुये येथील आरोग्य अधिकारी ... Read More »

राज्यात मोसमी पाऊस दाखल

राज्यात मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने काल जाहीर केले असून शुक्रवार १२ आणि शनिवार १३ जूनला राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. हवामान विभागाने ५ जूनला मोसमी पावसाचे आगमन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ जूनला झाले होते. तथापि, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरणाच्या अभावामुळे मोसमी पाऊस पुढे सरकण्यात ... Read More »

चार हजार कि. मी.च्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत चिनी सैनिकांची जमवाजमव

भारत-चीन दरम्यान पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव चर्चेच्या माध्यमातून कमी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच चीनी लष्कराने सुमारे ४००० कि. मी.च्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत आपल्या सैनिकांना तैनात केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतानेही तातडीने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम व अरुणाचल प्रदेश या भागांमध्ये आपल्या सैनिकांची जमवाजमव केली आहे. भारत-चीन यांच्यात सीमेलगतच्या भूप्रदेशावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. अशातच गेल्या मे ... Read More »

आयपीएलचा बिगुल वाजणार !

>> बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या वर्षीची इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये खेळविण्याचे संकेत दिले आहेत. कोरोनाविषाणूंच्या धोक्यामुळे पुढे ढकलण्यात आलेली ही स्पर्धा खेळविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांची चाचपणी सुरू असल्याचे गांगुली यांनी सांगितले आहे. आयसीसीच्या बैठकीनंतर बीसीसीआयशी संलग्न असलेल्या संस्थांना गांगुली यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ... Read More »