Daily Archives: June 11, 2020

संक्रमणाची भीती

गोव्यातील कालपर्यंतच्या २९२ कोरोना रुग्णांपैकी तब्बल २५१ हे केवळ वास्कोच्या मांगूर हिलमधील स्थानिक संक्रमणाशी संबंधित आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वर्गवारीनुसार जरी त्याला स्थानिक संक्रमण संबोधण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात काही आरोग्य कर्मचार्‍यांच्या द्वारे हे संक्रमण एव्हाना गोव्याच्या वेेगवेगळ्या तालुक्यांत पोहोचलेले आहे. मांगूर हिलमधील संक्रमणातून संसर्ग झालेले असे ५७ लोक आहेत, जे राज्याच्या इतर भागांतील आहेत. त्यात आरोग्य कर्मचारी, त्यांचे नातलग, ... Read More »

राज्यात कोरोनाची लक्षणे फक्त २१ जणांत ः मुख्यमंत्री

राज्यात ९ जूनपर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेले ३५९ रुग्ण सापडले होते व त्यापैकी ६७ रुग्ण रोगमुक्त झाले असून सध्या राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २९२ असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. २९२ ऍक्टिव्ह रुग्णांपैकी केवळ २१ जणांमध्ये रोगाची बाह्य लक्षणे दिसत असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत एकही रुग्ण अत्यवस्थ झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ३५९ रुग्णांपैकी ... Read More »

बाहेरून येणार्‍यांसाठी नवे नियम आजपासून

परराज्यातून गोव्यात येणार्‍या लोकांसाठी आज गुरुवारपासून नवी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (एसओपी) लागू करण्यात येणार असून ज्या लोकांमध्ये कोरोनाची कसलीच लक्षणे दिसून येणार नाहीत व ज्यांच्याकडे आपण कोरोना मुक्त असल्याचे ४८ तासांपूर्वीचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल व ज्यांची गोव्यात आल्यानंतरही चाचणी करून घ्यायची तयारी नसेल अशा लोकांना त्यांच्या कुटुंबियांसह १४ दिवस त्यांच्या घरी सामाजिक विलगीकरणात रहावे लागेल. त्यांच्या हातांवर ‘होम क्वारंटाईनचा’ शिक्का ... Read More »

नवीन २८ कोरोना रुग्णांमुळे सध्याची कोरोना रुग्णसंख्या ३२०

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह नवीन २८ रुग्ण काल आढळून आले आहेत. त्यात २४ पॉझिटिव्ह रुग्ण मांगूर हिलशी संबंधित आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या सध्याच्या रुग्णांची संख्या ३२० झाली आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ३८७ झाली असून त्यातील ६७ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. जीएमसीच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित १० रुग्णांना काल दाखल करण्यात आले. कोरोना आयझोलेशन वॉर्डात ... Read More »

सहा महिन्यांसाठी नोकर भरतीवर बंदी

>> मंत्री, आमदारांच्या सरकारी विदेश दौर्‍यांवर बंदी कोरोना आपत्तीमुळे मोठे आर्थिक संकट राज्यावर घोंगावू लागले असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी तिजोरीत खडखडाट होणार आहे. त्यामुळे सरकारी खर्चाला कात्री लावण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पुढील सहा महिने (डिसेंबर २०२० पर्यंत) सरकारी नोकर भरती न करण्याचा तसेच मंत्री, आमदारांच्या विदेश दौर्‍यांवर बंदी आणण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ... Read More »

नोकर भरती बंदी निर्णयावर सरदेसाईंची टीका

राज्यातील नोकरभरती वर्षअखेरपर्यंत बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयावर आमदार विजय सरदेसाई यांनी टीका केली आहे. राज्य मंत्रिमंडळाने मुख्य सचिवांच्या दडपणाखाली हा निर्णय घेतला असून मंत्री आणि आमदारांना पुढच्या १४ महिन्यांसाठी थेट होम क्वारंटाईन होण्यासाठी पाठविले आहे, असा दावा सरदेसाई यांनी केला आहे. कुचकामी मंत्रिमंडळ सत्तेवर ठेवण्याऐवजी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि मंत्री, आमदारांना कायमचे होम क्वारंटाईन करावे, अशी ... Read More »

टीम इंडिया जाणार श्रीलंका दौर्‍यावर

>> केंद्र सरकारची संमती आवश्यक >> खेळाडूंची सुरक्षादेखील प्राथमिकता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑगस्टमध्ये श्रीलंका दौरा करण्यास सहमती दर्शविली असून दोन्ही सरकारांच्या मंजुरीनंतर अंतिम निर्णय अपेक्षित आहे, असे वृत्त श्रीलंकेतील आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या ‘द आयलंड’ने दिले आहे. न्यूझीलंड दौर्‍यावरून परतल्यानंतर टीम इंडियाने कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिकाही कोरोना विषाणूंमुळे स्थगित करण्यात आली. आणि आता ऑगस्ट ... Read More »

आझमच्या टी-२० संघात सहा भारतीय

पाकिस्तानचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील विद्यमान कर्णधार बाबर आझमने भारत आणि पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश असलेला संयुक्त टी-२० संघ निवडला आहे. त्याने निवडलेल्या आपल्या संघात ६ भारतीय खेळाडूंचा समवेश केला आहे. क्रिकबझसाठी हर्षा भोगले याच्याशी बोलताना बाबरने हा संघ निवडला आहे. बाबरने स्वतःच्या साथीत सलामीवीर म्हणून भारताचा विस्फोटक फलंदाज हिटमॅन रोहित शर्माला पसंती दिली आहे. तिसर्‍या स्थानासाठी कोणताही संकोच न करता बाबरने ... Read More »