Daily Archives: June 9, 2020

ही तर शरणागती!

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर राज्य सरकारच्या आरोग्यविषयक सज्जतेचा फुगा फुटला. आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी आता सरकार मुख्यत्वे केवळ कोरोनाची बाह्य लक्षणे दिसणार्‍यांचीच कोविड चाचणी करण्याच्या एका अत्यंत बेजबाबदार आणि घातकी निर्णयापर्यंत आलेले दिसते. काल जो नवा एसओपी जाहीर केला गेला आहे, त्यानुसार बाहेरून येणार्‍यांना हवे असेल तर कोविड चाचणी करून संस्थात्मक विलगीकरणात राहायचा किंवा चाचणीला थेट बगल देत चौदा दिवसांच्या होम ... Read More »

लक्षणे असलेल्यांचीच यापुढे कोरोना चाचणी

>> बाहेरून येणार्‍यांना पुन्हा होम क्वारंटाईनचा पर्याय राज्य सरकारने राज्यात विमान, रस्ता, रेल्वे मार्गाने प्रवेश करणार्‍या नागरिकांसाठीच्या प्रमाण कार्यवाही पद्धतीत (एसओपी) बदल केला असून नागरिकांना तीन पर्याय उपलब्ध केले आहेत. कोरोना विषाणूची थर्मल स्क्रिनिंगमध्ये प्राथमिक लक्षणे आढळून येणार्‍यांची कोविड चाचणी केली जाणार आहे. कोविड चाचणी विना १४ दिवस होम क्वारंटाईन, दोन हजार रुपये शुल्क भरून कोविड चाचणी व चाचणी अहवाल ... Read More »

दोन कोरोना रुग्ण सापडल्याने मडगावात भीतीचे वातावरण

पाजीफोंड-मडगाव येथे रविवारी रात्री जुन्ता क्वार्टर्समध्ये दोन कोरोना रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले. ते दोघे वास्को आरोग्य खात्यात कामाला होते. रविवारी जुन्ता क्वार्टस मधील सरकारी कर्मचारी व इतर नागरिकांनी स्थानिक नगरसेवक आंजेलीन फर्नांडिस यांना भेटून याप्रकरणी संताप व्यक्त केला. या अगोदर तेथील लोकांना याविषयी माहिती द्यायला हवी होती असे त्यांचे म्हणणे होते. काल सोमवारी त्या भागांत सर्व लोक घरातच राहिले. ... Read More »

नव्या ३० कोरोना रुग्णांपैकी २८ रुग्ण मांगूर हिलमधील

कोरोनाचा संसर्ग झालेले नवीन ३० रुग्ण सोमवारी सापडले असून त्यापैकी २८ जण हे मांगूर हिल येथील आहेत. तर दोघे रुग्ण हे परराज्यातून आलेले असल्याची माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. काल दोन कोरोना रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यात सध्या सक्रिय असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २६३ एवढी झाली असल्याचे त्या म्हणाल्या. सोमवारी सापडलेल्या ३० रुग्णांपूर्वी राज्यात सक्रिय ... Read More »

रेस्टॉरंटस् पूर्ण क्षमतेने सुरू होणे अशक्य

>> संघटनाध्यक्षांचे मत ः कामगार गावी गेल्याने वाढली डोकेदुखी सोमवारपासून राज्यातील रेस्टॉरंटस् व चहाची हॉटेल्स तसेच मॉल्स व धार्मिक स्थळे उघडण्यास सरकारने मान्यता दिलेली असली तरी सुमारे ८० टक्के हॉटेल्स व रेस्टॉरंटस् काल बंदच राहिल्याचे चित्र पणजीत पहावयास मिळाले. राज्यातील हॉटेल व रेस्टॉरंट संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी काल हॉटेल्स व रेस्टॉरंट खुली करण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ नसल्याने २५ टक्क्यांपेक्षा ... Read More »

वारंवार लॉकडाऊन करणे परवडण्याजोगे नाही ः विश्‍वजित

पुन्हा पुन्हा लॉकडाऊन करता येत नसल्याचे व तसे करणे परवडण्याजोगे नसल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल सांगितले. कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकत्रित लढा देणे हाच आता त्यावरील उपाय असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी आपसात न लढता सर्वांनी एकत्रित लढा दिल्यास विजय आमचाच आहे. विरोधकांनी ही बाब समजून घेण्याची गरज आहे असे ते म्हणाले. ज्या भागांत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला आहे त्या भागांत ... Read More »

धावपटू गोमतीवर चार वर्षांची बंदी

>> प्रतिबंधित पदार्थसेवनप्रकरणी दोषी >> गमवावे लागले आशियाई ऍथलेटिक्स सुवर्णपदक भारताची ३१ वर्षीय स्टार ऍथलिट गोमती मरीमुथू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने वर्ल्ड ऍथलेटिक्स ट्रिब्युनालनेे तिच्यावर ४ वर्षांची बंदी घातली आहे. बंदीमुळे मरीमुथूला तिने गेल्या वर्षी मिळविलेले एशियन ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक गमवावे लागले आहे. डोपिंगविरोधी नियमांच्या उल्लंघनाबाबत अण्णा बोर्दीगुवा यांच्या अध्यक्षतेखाली वर्ल्ड ऍथलेटिक्स ट्रिब्युनालने हा निर्णय घेतला आहे. तिच्यावर लादलेली ... Read More »

‘सचिनच्या विकेटमुळे ठार मारण्याची धमकी’

ओव्हल येथे २०११ साली सचिन तेंडुलकरला वैयक्तिक ९१ धावांवर बाद केल्यामुळे मला व पंच रॉड टकर यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले, असे इंग्लंडचा माजी मध्यमगती गोलंदाज टिम ब्रेस्नन याने सांगितले आहे. सचिनचे ‘ते’ शतक पूर्ण झाले असते तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांची सेंच्युरी त्याने पूर्ण केली असती. ‘सचिन बाद झालेला चेंडू लेगस्टंप सोडून बाहेरच्या दिशेने जात होता. परंतु, ऑस्ट्रेलियन पंच ... Read More »

कबूतर नको, राजहंस बनू या

 प्रा. रमेश सप्रे ‘विवाहानंतर चतुर्भुज (दोन हात पतीचे, दोन हात पत्नीचे) होऊन देवासारखं वागण्याची श्रेयस्कर संधी असूनही बहुसंख्य पती-पत्नी ही चतुष्पाद(चार पाय- दोन नवर्‍याचे नि दोन बायकोचे) झाल्यासारखी म्हणजे जनावरांसारखी किंवा केवळ प्रेयाला कवटाळणार्‍या भोगी दानवांसारखी वागतात.’ स्वामी विवेकानंद युवावर्गाला उद्देशून अनेकदा म्हणत – ‘तीन गोष्टी जीवनाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत’ असं म्हटल्यावर सर्वांच्या मनात हवा- पाणी- अन्न किंवा रोटी- कपडा- ... Read More »

ऋतुबदलाच्या काळात घ्यावयाची काळजी

 डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) कोरोनाचे संकट अजूनही वाढले असल्याकारणाने हलका सुपाच्य आहार घ्यावा. नेहमी गरम पाणी प्यावे. आंघोळीसाठी गरम पाण्याचाच वापर करावा. गुडुचीचूर्णाचा काढा प्यावा किंवा तुळस, दालचिनी, मिरे, सुंठ यांचा काढा प्यावा, जेणेकरून आपली व्याधी प्रतिकारशक्ती वाढेल व या ऋतूसंधीच्या काळातसुद्धा आपण आपले आरोग्य टिकवू शकू. सद्य परिस्थितीत आरोग्याच्या रक्षणार्थ हेतू आयुर्वेद शास्त्राच्या आचरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण ... Read More »