Daily Archives: June 8, 2020

धोक्याचे स्मरण ठेवा!

वास्कोच्या मांगूर हिल परिसरामध्ये झालेल्या कोरोनाच्या प्रचंड स्थानिक संक्रमणामुळे गोव्याची एकूण रुग्णसंख्या शनिवारपर्यंत २६७ वर जाऊन पोहोचली. यातले ६५ जण आतापर्यंत बरेही झाले, परंतु ऍक्टिव्ह रुग्णसंख्याच २०२ वर पोहोचल्याने गोव्याचे एकमेव कोविड इस्पितळ खचाखच भरले आणि मांगूर हिलमधील चाचण्या थांबवण्याची पाळी आरोग्य खात्यावर ओढवली. कोरोनाचे ऐंशी टक्के रुग्ण हे लक्षणविरहित असतात याचा फायदा घेऊन सरकारला हे करता आले. याचाच फायदा ... Read More »

आजपासून रेस्टॉरंट, मॉल्स सुरू

>> बार, स्पा, मसाज पार्लर, जलपर्यटन, मनोरंजन पार्क, कॅसिनो बंद केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीनुसार राज्यातील दोन्ही जिल्हाधिकार्‍यांनी १४४ कलमांमध्ये थोडी शिथिलता दिल्याने आज दि. ८ जूनपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, धार्मिक स्थळे सुरू केली जाणार आहेत. या संबंधीचा आदेश उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी काल जारी केला आहे. नवीन नियमावलीनुसार, रात्री ९ ते सकाळी ५ यावेळेत नागरिकांना फिरण्यास निर्बंध घालण्यात ... Read More »

देशातील कोरोना मृतांची संख्या सात हजारांनजीक

देशात कोरोनामुळे मरण पावणार्‍यांची संख्या काल सात हजारांच्या नजीक पोहचताना (६९२९) कालच्या दिवसभरात एकूण ९९७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. कालच्या २४ तासांत देशात एकूण २८७ कोरोना मृतांची नोंद झाली. यापैकी सर्वाधिक ५३ महाराष्ट्रातील, दिल्लीतील २९ व गुजरातमधील १९ असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. गेल्या शनिवारी जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसणार्‍या देशांमध्ये भारताचा क्रमांक पाचवा असल्याची नोंद झाली. स्पेनला पिछाडीवर ... Read More »

राज्यात ३३ नवे कोरोना रुग्ण; सध्याची रुग्णसंख्या २३५

>> लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी शिरोडा आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय : मोहनन राज्यात कोरोना पॉझिटिव्ह नवे ३३ रुग्ण काल आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २३५ एवढी झाली आहे. या नवीन ३३ पैकी निम्मे रुग्ण मांगूर हिल भागातील आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शिरोडा येथील प्राथमिक ... Read More »

आणखी कोविड इस्पितळाची गरज नाही : विश्‍वजित राणे

राज्यात आणखी एक कोविड इस्पितळ सुरू करण्याची गरज नसल्याचे काल आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी स्पष्ट केले. कोविडसाठीचे चाचणी किट्‌स तसेच रुग्णांसाठीच्या खाटा व अन्य साहित्य याबाबत चिंता करण्याची गरज नसून योग्य ती सोय उपलब्ध असल्याचे राणे म्हणाले. आम्हाला व्हेंटिलेटर्सची गरज असून आणीबाणीच्या प्रसंगी व्हेंटिलेट्‌र्सची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी २०० व्हेंटिलेटर्सची ऑर्डर दिलेली असून त्यापैकी १०० व्हेंटिलेटर्स येत्या २-४ दिवसात ... Read More »

ब्राझीलहून २५७ गोमंतकीय दाखल

ब्राझील देशात अडकलेले २५७ गोमंतकीय खलाशी शनिवारी रात्री ११.५० वाजता दाबोळी विमानतळावर कतार एअरवेज विमानातून दाखल झाले. या सर्व प्रवाशांना विलगीकरणासाठी कांदोळी, पणजी, मडगाव येथे विविध हॉटेलमध्ये पाठविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी श्रीलंकेत अडकलेल्या २९१ भारतीयांना घेऊन दाबोळी विमानतळावर विशेष चार्टर विमान उतरले होते. तर शनिवारी रात्री ११.५० वा. ब्राझीलमध्ये अडकलेल्या २५७ गोमंतकीयांना कतार एअरवेज या विमानातून दाबोळी विमानतळावर आणण्यात आले. ... Read More »

५ पाक दहशतवाद्यांचा जम्मू-काश्मीरात खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात काल सुरक्षा दलांनी एका कारवाईत ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर संरक्षण खात्याचे प्रवक्ते कर्नल राकेश कालिया यांनी ही माहिती दिली. शोपियॉं जिल्ह्याच्या रेबान या भागात दहशतवादी दडून राहिल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सदर परिसराला वेढा घालून ही कारवाई केली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्यानंतर जवानांनी त्याला चोख प्रत्त्युत्तर दिले. दरम्यान पाकिस्तानी सैन्याने काल ... Read More »

फिरकीपटूंची निवड भारतासाठी डोकेदुखी

>> इयान चॅपेलना हवा हार्दिक कसोटी संघात ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारताला फिरकीपटूंची निवड जपून करावी लागेल. तीनपैकी केवळ दोघांनाच पंधरा खेळाडूंच्या संघात स्थान मिळेल. तसेच या दौर्‍यात अष्टपैलूंची भूमिका महत्त्वाची ठरणार असून त्यासाठी भारताने हार्दिक पंड्याला कसोटी संघात निवडायला हवे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयान चॅपेल यांनी व्यक्त केले. हार्दिक कसोटीसाठी उपलब्ध असेल तर ते भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल. हार्दिकच्या ... Read More »

कोहलीसोबत खेळल्याने नशीबवान ः विल्यमसन

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत मला क्रिकेट खेळायची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो, असे न्यूझीलंडचा कर्णधार व दिग्गज खेळाडू केन विल्यमसन याने काल रविवारी म्हटले. कर्णधार विराटसोबत खेळताना मला सुरुवातीच्या दिवसांची आठवण होते, असे विल्यमसन म्हणाला. विल्यमसन आणि विराट कोहली मलेशियात २००८ साली झालेल्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्‍वचषक स्पर्धेत खेळले होते. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने हा विश्‍वचषक उंचावला होता. ... Read More »

अमेरिकेतील खदखदणारा असंतोष

 दत्ता भि. नाईक हे सारे विश्‍व आमचा वंश आणि आमचा धर्म यांच्याच मालकीचा आहे असे समजणार्‍या श्‍वेतवर्णीय समाजाने या व अशा घटना पुढे घडता कामा नयेत याची काळजी घेतली आहे. अमेरिका नावाच्या राष्ट्राचे ऐक्य राजकीय करारावर अवलंबून आहे व नीट काळजी घेतली नाही तर देशाच्या विघटनेला फार वेळ लागणार नाही. खदखदणारा हा असंतोष अमेरिकेच्या मुळावरच आला नाही म्हणजे मिळवली. २५ ... Read More »