Daily Archives: June 6, 2020

पावसाळा आणि जिभेचे लाड

 गौरी भालचंद्र बाहेर कोसळणारा पाऊस, अंगावर शहारे आणणारा हवेतला गारवा, हातातल्या कपातला वाफाळता चहा हे दृश्य जोडीला चमचमीत भजी, वडापाव किंवा तत्सम काहीतरी चटकदार खाऊ असल्याशिवाय पूर्णच होत नाही. हातगाडीवरती ठेवलेली कणसं, छोटी शेगडी आणि त्या निखार्‍यांना फुलवत कणसं भाजून देणारा मनुष्य… पावसाळ्याच्या सुमारास दृष्टीस पडणारं हमखास दृश्य. आताशा तर साधी कणसं मिळतच नाहीत, सगळीकडे स्वीटकॉर्नच मिळतात. मग ही कणसं ... Read More »

चूक कोणाची?

सौ. अस्मिता पांगम तिथे गेटवर सुमारे दोनशे लोकं सकाळी सातच्या अगोदर हजर होती आणि ती सगळी गेटच्या त्या बाजूला जाण्यासाठी धडपडत होती. ओरडत होती. काही बायकांना बघून तर अक्षरशः रडू आलं. कारण त्या घोळक्यात कुणी गरोदर होती तर कुणाचं तान्हं बाळ भुकेनं कळवळत होतं. ‘लॉकडाऊन’ हा शब्द आता आपल्या रोजच्या वापरातला शब्द झालेला आहे किंवा लॉकडाऊनची आता आपल्याला सवयच झालेली ... Read More »

शब्दांतून कळे भावना

चित्रा क्षीरसागर त्या ङ्गांदीवर चार- पाच पांढरी शुभ्र ङ्गुलं मला दिसली, माझं मन मला खायला लागलं, आपण या बिचार्‍या वेलीला वांझोटी म्हटले ही गोष्ट माझ्यासारखी मोगरीच्या मनालाही लागली असेल का..? शब्द हे शस्त्र असते ते जपून वापरा, असे आमच्या पूर्वसूरींनी सांगून ठेवलंय. शब्द माणसं जोडतात. चार माणसांत बसवतात व चार माणसांतून उठवतातही. शब्दांचे आपल्यावर खूप ऋण असते. आपण आपल्या भावना ... Read More »

शिक्षण ः गुरुकुल ते ऑनलाईन

 अनुराधा गानू (आल्त-सांताक्रूझ, बांबोळी) शाळेचे दिवस कमी होतील. पण त्यासाठी विषयांचा फापट पसारा कमी करता येईल. नको असलेले धडे कमी करता येतील. अभ्यासक्रम कमी करता येईल. या संकटाचा फायदा घेऊन शिक्षण पद्धतीच बदलण्याचा विचार, जो अनेक वर्षांपासून मागे पडलाय, तो पुन्हा करता आला तर…!! काल-परवा मोबाईलवर एक व्हिडिओ बघितला. एक लहान मुलगा शाळेची बॅग पाठीवर आणि म्हणतोय, ‘नो मोबाईल इन ... Read More »

लॉकडाऊन आणि कुटुंबातील उपक्रम

 नेहा नि. खानविलकर कोरोनामुळे सर्वच भारतीयांना देशकार्य करण्याची संधी मिळाली आहे. आता भारतीयांच्या अंगी देशप्रेम व देशसेवा मुरली आहे. सर्व देशवासियांनी एकत्र होऊन कोरोनाविरुद्ध लढा देऊया आणि याच बळावर कोरोनाला हरवू या… देशाला जिंकवूया!! सर्व जगभर ‘कोरोना विषाणू’ने धुमाकुळ घालून अनेक निष्पाप जिवांचा बळी घेतला आहे. याचा प्रसार वेगवेगळ्या देशात वाढतच चालला आहे. त्यातच भारतात संक्रमण झालेल्यांच्या बातम्या कानावर येऊ ... Read More »

कोरोनापासून बचाव कसा कराल? भाग – २

 डॉ. स्वाती हे. अणवेकर, (म्हापसा ) कोरोनामुळे लॉकडाऊन असले तरी पोलीस, नर्सेस, डॉक्टर्स, सैनिक, सफाई कर्मचारी इ.ना कायमच आपली सेवा द्यावी लागते आहे. सध्या ह्या आणीबाणीच्या काळात त्यांना मात्र विश्रांती नाहीच उलट अधिक कामाचा ताण त्यांच्यावर आहे. त्यांचा थेट संपर्क कोरोनाबाधित व्यक्तींशी येतच असतो. त्यासाठी……. सध्या तरी कोविड-१९च्या आजारावर कोणतेच औषध उपलब्ध नसल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविणे व सोशियल वळीींरपलळपस पाळणे ... Read More »

उन्हाळ्यातले त्रास

–  डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) या लॉकडाऊनच्या काळात बरीचशी शारीरिक कामे कमी झालीत. एसीमध्ये वावर वाढला त्यामुळे तहान कमी लागते. घामही येत नाही. पाणी पिण्याचे प्रमाण बर्‍यापैकी कमी झाल्याने मूत्रवह संस्थानच्या आजारांना बळ आलेले आहे. दिवसेंदिवस उन्हाळ्याच्या झळा वाढत चालल्या आहेत. मूत्रवह संस्थानाचे आजारही तसेच वाढीला आलेले दिसत आहे. या लॉकडाऊनच्या काळात बरीचशी शारीरिक कामे कमी झालीत. एसीमध्ये वावर ... Read More »

मानवाने चिंतन करण्याची गरज

 डॉ. सीताकांत घाणेकर पण एक सत्य नाकारता येणार नाही- कोरोनामुळे स्वतःला फार हुशार व बुद्धिमान मानणारा मानवच आपल्या घरात, गावात बंदिस्त झालेला आहे. इतर सर्व पक्षी, प्राणी, जीव-जंतू मुक्तपणे फिरताहेत. आज कुठेही जा एकच विषय- कोरोना. लहान मुले सोडून सर्वजण चिंतेत आहेत. विषय अनेक आहेत- मुलांचे शिक्षण, नोकरी, काम, पगार, पैसे, भविष्यकाळ…. ‘चिंता करत बसण्यापेक्षा चिंतन करून अशा परिस्थितीवर उत्तम ... Read More »