Daily Archives: June 6, 2020

शंभरी पार

गोव्याने बघता बघता कोरोना रुग्णांची शंभरी पार केली. मांगूरहिल परिसरामध्ये स्थानिक संक्रमणाचा जो संशय होता तो तर खरा ठरला आहेच, परंतु तेथे गेलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांवरही कोरोनाने घाला घातल्याचे दिसते आहे. मांगूरहिलचे हे प्रकरण कुठवर जाईल सांगता येत नाही. राज्याच्या कोविड उपचार व्यवस्थेचा बोजवारा उडवण्याइतपत अवघ्या दोन दिवसांत स्थिती गंभीर बनली हे लक्षात घेणे जरूरी आहे. गोव्यात सापडू लागलेले रुग्ण, दिवसागणिक ... Read More »

राज्यात सध्या कोरोनाचे १३१ रुग्ण

>> मांगूर हिलमध्ये एकूण १०० पॉझिटिव्ह >> एकूण रुग्णसंख्या १९६ मांगूर हिल वास्को येथे आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून मांगूर हिलमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०० झाली आहे. दुबईतून आलेले आणखी ४ खलाशी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणीत आढळून आले आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३१ झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार ... Read More »

बंदी असतानाही कोरोना रुग्णांची नावे व्हायरल

  कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची नावे उघड करण्यावर बंदी असतानाच काल कथित संसर्ग झालेल्या दोघा रुग्णांची नावे समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती. त्यात सांगे येथील आरोग्य केंद्रात काम करणारा एक कर्मचारी व मडगांव येथे राहणारा एक कर्मचारी यांचा समावेश होता. सांगे येथील आरोग्य केंद्रात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली असल्याच्या वृत्तला सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनीही समाजमाध्यमावरुन दुजोरा दिलेला ... Read More »

गोवा वेल्हा अपघातात महिला जागीच ठार

  गोवा वेल्हा येथे बगलमार्गाजवळ रुग्णवाहिका आणि स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात स्कूटरस्वार महिला नीलिमा रायकर (५३, मालभाट) हिचे जागीच निधन झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. मयत नीलिमा रायकर ह्या ऑल इंडिया रेडिओच्या कर्मचारी होत. आगशी पोलिसांनी या प्रकरणी रुग्णवाहिका चालकाला अटक केली. Read More »

इटलीहून २६९ खलाशी गोव्यात दाखल

  इटलीहून २६९ दर्यावर्दींना घेऊन आलेले विशेष विमान काल सकाळी ७ वाजता दाबोळी विमानतळावर उतरले. विदेशात असलेल्या गोमंतकीयांना कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घेऊन येणार हे सातवे विमान होते. विमानतळावर उतरल्यानंतर खलाशांची कोरोना तपासणीची चाचणी करून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यासाठी हलवण्यात आले. गेल्या २९ मे रोजीही इटलीहून २७९ दर्यावर्दी (खलाशी) गोव्यात आले होते. त्यात २०६ गोमंतकीय तर ६३ महाराष्ट्रातील दर्यावर्दींचा समावेश ... Read More »

हत्तीणीच्या मृत्युप्रकरणी केरळमध्ये एकास अटक

  केरळमध्ये गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी केरळमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. केरळ वनविभागाने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली. दरम्यान हत्तीणीच्या मृत्यूचा देशभरातून विविध माध्यमांद्वारे निषेध करण्यात येत आहे. हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी तीन संशयितांची चौकशी केली जात असून अन्य दोन संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याचे वनविभागाने सांगितले होते. ही हत्तीण १५ वर्षांची होती व ती गर्भवती होती. भुकेने व्याकूळ होऊन ती अन्नाच्या ... Read More »

२०२२ महिला आशिया चषक भारतात

>> एएफसीने केले यजमानपद बहाल; १९७९नंतर प्रथमच मिळाला मान भारतात २०२२साली महिला आशिया चषकाचे आयोजन होणार आहे. एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनने काल १९७९नंतर प्रथमच भारताला हे महिला आशिया चषकाचे यजमानपद बहाल केले आहे. १९७९साली झालेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपविजेतेपद प्राप्त केले होते. एएफसी महिला फुटबॉल समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारीमध्ये एएफसी महिला फुटबॉल समितीने भारताला यजमानपद देण्याची शिफारस ... Read More »

मोटरस्पोर्टस् महासंघाकडून जेहानची शिफारस नाही

  भारतीय मोटरस्पोर्टस् महासंघाने अर्जुन पुरस्कारासाठी प्रतिभावान खेळाडू जेहान दारुवाला याचे नाव न पाठवल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. महासंघाने मात्र ‘त्याचा योग्य वेळी सन्मान होईल’ असे सांगत आपल्या निर्णयाचे केविलवाणे समर्थन केेले आहे. महासंघाने ऑफ रोड रेसर ऐश्‍वर्या पिसे, बायकर सीएस संतोष व २०१६ सालचा आशिया मॅक्स कार्टिंग चँपियन शहान अली मोहसीन यांची नावे देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वोच्च ... Read More »

‘काव्यमाला काव्यहोत्र’ सातासमुद्रापार…

 कालिका बापट ‘सुरक्षित राहा, घरात राहा, संपर्कात राहा’ या संदेशाद्वारे चालू करण्यात आलेला मनसा क्रिएशन्स निर्मित उपक्रम म्हणजे ‘काव्यमाला काव्यहोत्र’. या ग्लोबल वेब-कविसंमेलनात सहभागी होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गोवा, महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र, बृहन्भारत आणि विदेशातील हजारो प्रथितयश कवी-कवयित्री या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. त्याविषयी थोडेसे…. पुस्तक दिनादिवशी अर्थात २३ एप्रिल रोजी माझ्या मनसा क्रिएशन्सतर्फे गोव्यातून एक संकल्प आखला गेला. ... Read More »

निर्भय हो मना रे …

 माधुरी रं. शे. उसगावकर (फोंडा) आकाश- धरित्री आहे. फुलाफळांनी निसर्ग बहरला आहे. कुहू कुहू कोकीळ साद देत आहे. पण त्यात कुठेतरी स्मशान शांतता दडल्याचे जाणवते. कदाचित् वादळापूर्वीची तर नसेल ना? माणसे माणसांना पारखी होत आहेत. एकमेकांना भेटणे नाही. संवाद नाही. या कोरोना महामारीमुळे मनात जीवन-मरणाचे भय निर्माण होऊन जगण्याचा आत्मविश्‍वास हरवत तर नाही ना? संध्याकाळचे साडेपाच वाजले; उन्हें कलून सूर्यास्ताचा ... Read More »