Daily Archives: June 4, 2020

स्थानिक उद्रेक

मांगूर हिलमध्ये जे घडल्याची भीती होती, ते कोरोनाचे स्थानिक संक्रमण झाल्याचे आजवर झालेल्या चाचण्यांच्या निष्कर्षांतून समोर आलेले आहे. जसजशा चाचण्या वाढतील, तशी कोरोनाबाधितांची ही संख्या वाढू शकते. हे केवळ मांगूरहिल परिसरापुरते हे स्थानिक संक्रमण किंवा ‘लोकल ट्रान्समिशन’ आहे की आतापर्यंत ते बाहेरील भागांमध्ये सामाजिक संक्रमणाच्या म्हणजे ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’च्या रूपात पसरले आहे हे अजून स्पष्ट नाही. ज्या मच्छिमारी कुटुंबातील व्यक्तीमध्ये सर्वप्रथम ... Read More »

राज्यात एकाच दिवशी ४७ पॉझिटिव्ह

>> मांगूर हिलमध्ये कोरोनाबाधित ४२ रुग्ण राज्यात एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह ४७ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून मांगूर हिल वास्को भागात कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४२ रुग्ण काल आढळून आले असून मांगूर हिल भागातून आत्तापर्यंत ५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मडगावच्या कोरोना इस्पितळात ६९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुबईतून आलेले दोन प्रवासी, महाराष्ट्रातून आलेले दोन आणि बंगलोर येथून ... Read More »

मुसळधार पावसाने झोडपल

>> वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी पडझड, वीजपुरवठा खंडित अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रूपांतर झाल्याने मंगळवारपासून राज्यात जोरदार पावसाबरोबरच वादळी वारा सुटला. परिणामी उत्तर गोव्यापासून दक्षिण गोव्यापर्यंत मंगळवारी रात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंत मोठी पडझड झाली. ‘निसर्ग’ वादळामुळे राजधानी पणजीसह सर्व शहरे तसेच ग्रामीण भागात मिळून राज्यभर शेकडो वृक्ष व झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होण्याबरोबरच ... Read More »

हेदोडे-सत्तरीत तरुण बुडाला

  हेदोडे सत्तरीतील वाळवंटी नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दीपक विठो खरवत (२३) या कोपार्डे धनगरवाडा येथ राहणार्‍या तरुणाचा काल बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. काल संध्याकाळी तो आणि त्यांची भांवडे आंघोळीसाठी हेदोडेतील वाळवंटी नदीवर पुलापासून थोड्या दूर अंतरावर आंघोळीसाठी गेले होते. त्याठिकाणी पाण्याची पातळी खोल होती. आंघोळ करता करता दीपक हा खोलवर पाण्यात गेला व बुडाला. या घटनेची माहिती ... Read More »

इंग्लंड दौर्‍यासाठी विंडीज संघाची घोषणा

>> डॅरेन ब्राव्हो, किमो पॉल, शिमरॉन हेटमायरची माघार इंग्लंडविरुद्धच्या प्रस्तावित तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विंडीजने काल बुधवारी आपला १४ सदस्यीय संघ जाहीर केला. ही मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये जाण्यास विंडीजच्या तीन खेळाडूंनी मात्र नकार दिला आहे. यात नवोदित शिमरॉन हेटमायर, कसोटी स्पेशलिस्ट डॅरेन ब्राव्हो व अष्टपैलू किमो पॉल यांचा समावेश आहे. माघार घेतलेल्या खेळाडूंवर कोणतीही कारवाई केली जाणार नसून आम्ही त्यांच्या ... Read More »

प्रतीक, राल्टे बंगळुरू एफसी संघात

इंडियन सुपर लीगमधील फ्रेंचायझी असलेल्या बंगळुरू एफसीने आगामी २०२०-२१ मोसमासाठी अनुभवी बचावपटू प्रतीक चौधरी व गोलरक्षक लालथुआमाविया राल्टे यांना करारबद्ध केले आहे. चौधरी मागील मोसमात मुंबई सिटी एफसी संघाकडून खेळला होता. राल्टे हा २०१४ ते २०१८ या कालावधीत बंगळुरू संघासोबत होता. यानंतर त्याने क्लबला सोडचिठ्ठी दिली होती. वैविध्यपूर्ण खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या चौधरी याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात २०११ साली एअर इंडिया ... Read More »