Daily Archives: June 3, 2020

गोंधळ कशासाठी?

गोव्यात दाबोळी विमानतळावर दुबईहून दाखल झालेल्या पहिल्याच वंदे भारत मोहिमेखालील विमानातील प्रवाशांनी संस्थात्मक विलगीकरणाला विरोध दर्शवीत विमानतळावर पाच – सहा तास जो काही गोंधळ घातला, तो पूर्णपणे अस्थानी आणि असमर्थनीय आहे. भारतात परत येत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने या विदेशस्थ भारतीयांसाठी जी काही एसओपी तयार केलेली आहे, त्यानुसार, विमानतळावर लाळेचे नमुने घेतल्यानंतर सात दिवस त्यांनी स्वतः निवडलेल्या हॉटेलमध्ये संस्थात्मक विलगीकरणाखाली स्वखर्चाने ... Read More »

मांगूर हिलमध्ये एकूण ६ जण बाधित

>> ‘त्या’ कुटुंबातील चार तर दोन शेजारी पॉझिटिव मांगूर हिल वास्को येथील कोरोनाबाधित त्या कुटुंबातील आणखी चार सदस्य आणि दोन शेजार्‍यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे कोविड चाचणीत स्पष्ट झाले आहे. तर, ट्रूनेट चाचणी पॉझिटीव आढळून आलेल्या स्थानिक डॉक्टरचा कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव आला आहे. मांगूर हिल परिसरातील नागरिकांच्या कोविड चाचणीला प्रारंभ करण्यात आला असून सुमारे २०० जणांचे स्वॅब घेण्यात आले ... Read More »

राज्याला चक्रीवादळाचा तडाखा

>> ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पूर्व मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘निसर्ग’ या चक्रीवादळामुळे गोव्यातील विविध भागात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीपासून २७० ते २८० किमी उत्तरेच्या दिशेने सरकत असून ३ जूनला अलिबाग – रायगड भागात धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने काल दिली. राजधानी पणजी शहरामध्ये सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० ... Read More »

दुबईहून आलेल्या गोमंतकीयांचा विलगीकरण शुल्क भरण्यास नकार

सोमवारी रात्रौ दुबईहून हवाई मार्गाने गोव्यात आलेल्या ११० गोमंतकीयांनी संस्थात्मक विलगीकरणात राहण्यासाठीचे शुल्क भरण्याच्या प्रश्‍नावरून विमानतळावर तब्बल चार तास वाद घालत पैसे भरण्यास नकार दिला. त्यामुळे विमानतळावर मोठी समस्या निर्माण झाली. सोमवारी रात्रौ १२.१५ वाजण्याच्या सुमारास हे विमान दाबोळी विमानतळावर उतरले होते. त्यात दुबईत नोकरी करणार्‍या ११० गोमंतकीयांचा समावेश होता. कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या मायदेशात परतण्यास इच्छुक असलेल्या गोमंतकीयांना दुबईहून ... Read More »

भारत पुन्हा विकासाचा मार्ग गाठेल ः मोदी

>> सीआयआयला १२५ वर्षे पूर्ण भारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नोलॉजी, आपत्ती व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणार्‍यांवर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे भारत निश्चित पुन्हा विकासाचा मार्ग गाठेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. सीआयआयला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. कोरोनामुळे विकासाचा वेग जरी ... Read More »

कोरोनासंदर्भात निराधार वृत्त प्रसिद्ध केल्याने गुन्हा दाखल

  गोव्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग झाला असल्यासंबंधीचे खोटे व निराधार वृत्त समाजमाध्यमावरून व्हायरल केल्याने सरकारने आपत्ती कायद्याखाली गुन्हा नोंदवला आहे. यासंबंधी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले की, वरील खोट्या माहितीसंबंधी जिल्हाधिकारी व पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. आपल्या छायाचित्रासह वॉट्‌सऍपवरून हे वृत्त पसरविण्यात आले असल्याचे विश्‍वजीत राणे यांनी तक्रारीतून नमूद केले आहे. त्या संदेशात राज्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग झाला असल्याचे म्हटले ... Read More »

मणिका बत्राची खेलरत्नसाठी शिफारस

  भारताची सर्वोत्तम स्थानावरील महिला खेळाडू मणिका बत्रा हिच्या नावाची मंगळवारी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. अखिल भारतीय टेबल टेनिस महासंघाने भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी बत्राचे नाव काल पाठवले. मागील वर्षीदेखील बत्राचे नाव पाठवण्यात आले होते. परंतु, तिला पुरस्कार लाभला नव्हता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकलेली मणिका ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने दोन ... Read More »

श्रीसंतने निवडला सर्वकालीन वनडे संघ

टीम इंडियाचा माजी द्रुतगती गोलंदाज एस. श्रीसंतने आपल्या सर्वकालीन वनडे संघाची निवड केली आहे. संघाचे नेतृत्व भारताचा माजी यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीकडे सोपविले आहे. श्रीसंतने आपल्या संघात स्वतःसह एकूण ६ भारतीयांना स्थान दिले आहे. त्याने स्वतःची निवड संघाचा १२वा खेळाडू म्हणून केली आहे. अंतिम अकरा संघात श्रीसंतने एकाही भारतीय गोलंदाजाला स्थान दिले नाही. श्रीसंतने निवडलेल्या या संघात मास्टर ब्लास्टर सचिन ... Read More »

हॉकी इंडियाकडून ‘खेलरत्न’साठी राणी

  राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी हॉकी इंडियाने भारतीय महिला संघाची कर्णधार राणी रामपाल हिच्या नावाची शिफारस केली आहे. तर वंदना कटारिया, मोनिका आणि हरमनप्रीत सिंह यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आली आहेत. मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी माजी खेळाडू आरपी सिंह आणि तुषार खांडेकर यांची नावे महासंघाने मंत्रालयाला सुचविली आहेत. तसेच प्रशिक्षक बी.जे. करिअप्पा आणि रोमेश पठानिया या द्वयीची नावे हॉकी ... Read More »