Daily Archives: June 2, 2020

जबाबदारीने वागूया!

वास्कोतील मांगूर हिल परिसरामध्ये एका मच्छिमाराचे संपूर्ण कुटुंब आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. गोव्याच्या जनतेची झोप उडवणारे हे वृत्त आहे यात शंका नाही, कारण प्रथमच राज्यामध्ये कोरोनाचे स्थानिक संक्रमण झालेले असण्याची दाट शक्यता येथे दिसते आहे. गेले दहा पंधरा दिवस हा मच्छिमार आणि त्याचे कुटुंबीय कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणे नसल्याने मुक्तपणे वावरत होते, स्थानिक जनतेमध्ये ... Read More »

मांगूर हिलमध्ये कोरोनाच्या स्थानिक संक्रमणाचा संशय

>> सहा रुग्ण सापडल्याने निर्बंधित क्षेत्र घोषित मांगूर हिल वास्को येथील एका कुटुंबातील दोघांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे कोविड चाचणीत स्पष्ट झाल्याने मांगूर हिलमध्ये कोरोनाच्या स्थानिक संक्रमणाचा संशय व्यक्त केला जात आहे. या कोरोनाबाधित रुग्णाचे पाच कुटुंबीय आणि एका डॉक्टरची कोविड चाचणी केली जात आहे. दरम्यान, मांगूर हिल वास्को भागात कोरोना विषाणूचे सामाजिक संक्रमण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय हाती ... Read More »

‘गोवा एक्सप्रेस’ दिल्लीला रवाना

वास्को हजरत निजामुद्दीन (गोवा एक्सप्रेस) या वास्कोतून काल सोमवारी दुपारी ३ वा. निघालेल्या विशेष रेल्वेने २२५ प्रवासी रवाना झाले. अनलॉक-१च्या माध्यमातून भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या २०० विशेष गाड्यांपैकी वास्कोतून गोवा एक्सप्रेस दुपारी सोडण्यात आली. लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी भारतीय रेल्वेतर्फे अनलॉक एकच्या दिशेने जाताना देशातील विविध मार्गांवर काल १ जूनपासून दोनशे विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ... Read More »

राज्याला आज चक्रीवादळाचा धोका

अरबी समुद्र व लक्ष्यद्वीप येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून आज मंगळवारपर्यंत त्याचे रूपांत्तर चक्रीवादळात होणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. आज २ जूनपर्यंत हे चक्रीवादळ पुढे पुढे सरकत उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात किनारपट्टी असे करीत हरिहरेश्वर (रायगड- महाराष्ट्र) व ३ जूनपर्यंत दमणपर्यंत सरकणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. या चक्रीवादळामुळे २ जून रोजी अरबी समुद्र व ... Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, उद्योगांना दिलासा

केंद्रीय मंत्रिमंडळाची काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, शेतकरी तसेच फूटपाथ दुकानदारांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. त्यात या घोषणांचा ६६ कोटी लोकांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले असून यातील ५५ कोटी लोक शेतीवर अवलंबून आहेत. ११ कोटी लोक हे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये (एमएसएमई) कार्यरत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश ... Read More »

पांघल, कृष्णनची खेलरत्नसाठी शिफारस

भारतीय बॉक्सिंग महासंघाने सोमवारी विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अमित पांघल व अनुभवी विकास कृष्णन यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेते त्रिकुट लवलिना बोर्गोहोईन (६९ किलो), सिमरनजीत कौर (६४ किलो) व मनीष कौशिक (६३ किलो) यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. महिला संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक मोहम्मद अली कमार व साहाय्यक प्रशिक्षक छोटेलाल यादव ... Read More »

रणजीचा दर्जा घसरलेला ः रैना

रणजी क्रिकेटचा दर्जा घसरल्यामुळेच बीसीसीआयने करारबद्ध नसलेल्या भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याचा परवानगी द्यावी, असे भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना याने काल सोमवारी म्हटले. मागील महिन्यात त्याने बीसीसीआयकडे विदेशात खेळण्यासाठी परवागनीची याचना केली होती. त्यावेळी बीसीसीआयने त्याला रणजी स्पर्धेत खेळून स्वतःला सिद्ध करण्यास सांगितले होते. आता त्याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत पुन्हा एकदा आपले म्हणणे मांडले ... Read More »