Daily Archives: June 1, 2020

कामगारांची कथा अन् व्यथा

 शरत्चंद्र देशप्रभू प्रादेशिकता, विविधता, मानसिकता, वातावरण, सामाजिक-आर्थिक संदर्भ तपासून कामगारांचे प्रेरणास्रोत निश्‍चित करायला हवेत. या प्रेरणास्रोतांची सांगड उत्पादनाशी बेमालुमपणे घातली जावी. यातून निर्माण होणारी ऊर्जा भारताच्या औद्योगिक व कामगार धोरणाला एक नवी दिशा दाखवेल. परंतु याला अभ्यासाची, संशोधनाची गरज आहे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली अन् कारखानदारीचा जन्म झाला. या रक्तविहिन क्रांतीमुळे मूळ जन्मदेशातच नव्हे तर सार्‍या जगतातील राजकीय, आर्थिक समीकरणे ... Read More »

बिथरलेला चीन आणि बिघडलेला नेपाळ

–  दत्ता भि. नाईक भारत सरकारने काही वर्षे प्रयत्न करून उत्तराखंड राज्यातून कैलास-मानसरोवरकडे जाणार्‍या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे नेले. हा रस्ता पूर्णपणे भारतीय हद्दीतून जातो. परंतु चिनी सरकारच्या आक्रस्ताळेपणाला बट्टा लागेल म्हणून की काय हा रस्ता नेपाळच्या हद्दीतून जात असल्याचा मुद्दा चीनने उपस्थित केलेला आहे. कैलास-मानसरोवर ही हिंदूंची पवित्र तीर्थक्षेत्रे असल्यामुळे या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी जाणार्‍या यात्रेकरूंची संख्या फार मोठी असते. ... Read More »

-ः अर्थवेध ः- स्वातंत्र्यानंतरची सर्वात भीषण मंदी

 शशांक गुळगुळे गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक व्यवहारांचे काय होणार याची भीती जनतेला सतावत आहे. या लॉकडाऊनमुळे पर्यटकांवर अवलंबून असलेल्या ट्रॅव्हल आणि टुरिझम कंपन्यांवर मोठा परिणाम झाला आहे. पुढील तीन ते सहा महिन्यांत या क्षेत्रातील ४० टक्के कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये आतापर्यंत चार वेळा मंदी आली आहे. आता निर्माण होणारी मंदी ‘खाजाऊ’ (खाजगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरण) धोरणानंतर म्हणजे ... Read More »

माणसांचं जग- ५४ मातृभाषेवर प्रेम करणारा कायतान तिवो

 डॉ. जयंती नायक एकदा कायतान एका कामानिमित्त मुंबईला गेला अन् कातारीनमांय तापानं आजारी पडली. तिच्या तिन्ही पोरांना आईच्या आजाराचं काही गांभीर्य नव्हतं. ते दिवसभर इथं-तिथं हुंदडण्यात दंग. मला कळताच आईच्या परवानगीने मी तिच्या घरी गेले. दोन दिवस तिची सेवा केली. कायतान आमच्याच गावचा. आमच्या घरापासून एक फर्लांगाच्या अंतरावर त्याचं घर. माझे वडील अन् तो एकाच वयाचे. त्यांच्या लहानपणी जात-पात, सोवळं-ओवळं ... Read More »

म्हापसा नागरी सहकारी बँकेवरील निर्बंध व पुढील वाटचाल

 प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट ही बँक दिवाळखोर बनली आहे. खातेदार, ठेवीदार, छोटे व्यापारी बँकेबाबतीत चिंतातूर आहेत. पगारदार, विविध संस्था, निवृृत्ती वेतनधारक यांचे पैसे बँकेत अडकले आहेत. याचा विपरित परिणाम त्यांच्या जीवनमानावर झालेला असून सारेजण या बँकेच्या संचालक मंडळावर नाराज आहेत. इ.स. २००३ सालच्या दरम्यान तत्कालीन माननीय मुख्यमंत्री कै. श्री. मनोहर प्रभू पर्रीकर यांनी म्हापसा नागरी सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि ... Read More »

देणे शब्दांचे

 मीना समुद्र मृदुमुलायम अशी पिसं गोळा करावीत तसे शब्द आपण हळूहळू गोळा करत असतो. ते बघण्यात, त्यांना निरखण्यात, त्यांचे गुण पारखण्यात आपण हळूहळू तरबेज होत जातो. त्यासाठी कान, मन, दृष्टी जागी हवी. ते आपल्याला अनाहूत असा आनंद देतात. ज्यांची पुस्तकं केव्हाही घेऊन वाचावीत अशा लेखकांपैकी एक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर. कोणताही अभिनिवेष नसलेली त्यांची साधी-सोपी-सरळ पण अनुभवसंपन्न भाषा आणि ‘जे जे ... Read More »

व्यवस्थापन

 दत्ताराम साळगावकर व्यवस्थापनाकडे कौशल्य लागतं. हाताखालच्या लोकांचा विश्‍वास, जवळीक व आदर प्राप्त करणारी व्यक्ती चांगला व्यवस्थापक बनू शकते; ते ‘रिंगमास्टर’ होऊन शक्य नसतं. व्यवस्थापकावर जबाबदार्‍या असतात, त्याची कर्तव्यं असतात व त्याला अधिकारही असतात. पण ‘सौजन्याची ऐशीतैशी’ करायची नसते. ‘व्यवस्थापन’ हा शब्द पूर्वीही होता, आजही आहे. पूर्वीपेक्षा आज या शब्दाची धार, व्याप्ती थोडी वाढल्यासारखी वाटते. बदलणारा काळ आपल्यासोबत बदल घेऊन येतो. ... Read More »

-ः खुले मैदान ः- दिग्गज हॉकीपटू बलबीर सिंग कालवश

सुधाकर रामचंद्र नाईक भारतीय हॉकीला स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले धवल यश, ऑलिंफिक सुवर्ण देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बलबीरजीच्या निधनाने भारतीय हॉकीचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यापासून भारतीय हॉकीला सुवर्णयुग पुनर्प्राप्त करून देण्याची प्रेरणा युवा खेळाडूंनी घेतली तर तीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरावी!! भारताचे महान हॉकीपटू तथा तीन वेळचे ऑलिपिक सुवर्णपदक विजेते, दिग्गज स्ट्रायकर बलबीर सिंग, सीनियर (९६) यांचे नुकतेच वाधर्क्य तथा ... Read More »