Daily Archives: June 1, 2020

संकल्पशक्ती जागवा

  आजपासून देशामध्ये लॉकडाऊनची पाचवी आवृत्ती सुरू होते आहे. अर्थातच, देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करून यावेळी बहुतेक सर्व बंधने खुली करण्यात आलेली आहेत. रेस्तरॉं, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स आदी पूर्ववत सुरू करण्यास सरकारने परवानगी देऊन टाकली आहे आणि राज्यांची हरकत नसेल तर राज्यांतर्गत मुक्तपणे ये-जा करण्याचीही मुभा दिलेली आहे. अर्थात, कोरोनाचा प्रसार दुसरीकडे शिगेला पोहोचलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार एकामागोमाग एक निर्बंध ... Read More »

आजपासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

  दक्षिण अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे आज सोमवार १ ते ३ जून दरम्यान गोव्यातील विविध भागात मान्सूनपूर्व वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने काल वर्तविली. येथील हवामान विभागाने राज्यात केशरी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, राज्यभरात रविवारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. केरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालेे आहे. लक्षद्विप ... Read More »

मडगावातून २८०० मजूर श्रमिक रेल्वेने बिहारला रवाना

  काल रविवारी मडगाव रेल्वे स्थानकावरून बिहार येथील मजुरांना घेऊन दोन श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या. त्यातून २८०० मजूर आपल्या गावी रवाना झाले. काल रविवारी दुपारी २ वाजता एक गाडी मडगाव रेल्वे स्थानकावरून सुटली. त्यात १४७४ मजूर होते व सायंकाळी उशीरा दुसरी गाडी सोडण्यात आली. शनिवारी बिहारला दोन गाड्या सोडण्यात आल्या. त्या रेल्वेतून तीन हजार मजूर निघाले. काल सकाळी ७ वाजता ... Read More »

पावसाळी हवामानामुळे विशेष श्रमिक रेल्वे दोन दिवस बंद

  पावसाळी वातावरणामुळे काल रविवारी व आज सोमवारी असे दोन दिवस स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणार्‍या विशेष श्रमिक रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे वरील दोन्ही दिवशी गोव्यातून आपल्या गावी जाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या कामगारांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. उद्या मंगळवारी हवामानात बदल घडून आला तर रेल्वेगाड्या सुरू करण्यात येतील असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. श्रमिक रेल्वेगाड्यांतून ... Read More »

वीज दरवाढ स्थगितीचा प्रस्ताव : वीजमंत्री

कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर संयुक्त वीज नियमन आयोगाने सूचित केलेल्या वीज दरवाढीची अंमलबजावणी स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत ह्या प्रस्तावाबाबत सकारात्मक असून वीज दरवाढीबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत, अशी माहिती काल वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. संयुक्त वीज नियमन आयोगाने जून २०२० पासून वीज बिल दरामध्ये वाढ करण्याची सूचना केली आहे. विजेच्या ... Read More »

राज्यात ८ पासून नवीन निर्देश लागू

>> सध्या रात्रीच्या संचारबंदीत कपात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने लॉकडाऊन ५.० साठी नवीन निर्देश जारी केल्यानंतर गोवा सरकारकडून आवश्यक नवीन निर्देश ८ जूनपासून जारी केले जाणार आहे. तूर्त, राज्यातील रात्रीच्या संचारबंदीमध्ये कपात करण्यात आली असून रात्री ९ ते सकाळी ५ यावेळेत संचारबंदी लागू राहणार आहे, अशी माहिती महसूल सचिव संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाने ... Read More »

आणखी दोघे कोरोनामुक्त

>> एक नवीन बाधित, रुग्णसंख्या २७ राज्यात कोरोना विषाणू बाधित नवीन १ रुग्ण आढळून आला आहे. तर, २ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने बाधित रुग्णांची संख्या २७ झाली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. महाराष्ट्रातून आलेल्या एक प्रवाशाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे तपासणीमध्ये आढळून आले. त्याला मडगाव इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ... Read More »

आता अधिक काळजी घेण्याची गरज

>> पंतप्रधानांचे ‘मन की बात’मधून जनतेला आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी काल रविवारी ‘मन की बात’च्या १२ व्या भागातून संवाद साधताना आता लॉकडाउन शिथिल होत असून आता अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन केले. मन की बातमध्ये पंतप्रधांनी काल विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले. कोरोनासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, देशाने कोरोनाविरोधात एकजुटीने लढा दिला आहे. त्यापासून बचावासाठी आपण सावधानता ... Read More »

सचिन, विराट, कॅलिसचा खेळ भावतो

>> माजी पंच इयान गौल्ड यांनी निवडले आपले आवडते खेळाडू जॅक कॅलिस, सचिन तेंडुलकर व विराट कोहली हे आपले तीन आवडते खेळाडू आहेत, असे ७४ कसोटी, १४० वनडे व ३७ टी-ट्वेंटी सामन्यांत पंचगिरी केलेले आयसीसीचे निवृत्त पंच इयान गौल्ड यांनी काल रविवारी ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’ या संकेतस्थळाशी बोलताना सांगितले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग खेळताना पंचगिरी करण्याची फारशी संधी न मिळाल्याची खंतदेखील ... Read More »

ड्युमिनीच्या आयपीएल संघात केवळ दोन भारतीय

  दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जेपी ड्युमिनी याने आपला सर्वोत्तम ‘आयपीएल ऑल टाईम इलेव्हन’ संघ निवडला आहे. विशेष म्हणजे या संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आयपीएलमधील सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विंडीजचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो व स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत सातत्यपूर्ण खेळाडू म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुरेश रैनाला स्थान दिलेले नाही. आयपीएलमध्ये असलेला ७ भारतीय व ४ विदेशी हा नियमही त्याने ... Read More »