Monthly Archives: June 2020

कोणाला फसवताय?

क्षुल्लक, क्षुल्लक म्हणत राज्य सरकार निकालात काढू पाहात असलेला कोरोना आता गोमंतकीयांच्या गळ्याला फास बनू लागला आहे. काल खुद्द मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या गावी – साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडले. मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य असलेल्या सरकारी गृहनिर्माण वसाहतीपर्यंत हे लोण पोहोचले आहे. एकीकडे कोरोनासंदर्भात आपली तथाकथित ‘कर्तबगारी’ सांगणार्‍या नेत्यांच्या सरकार पुरस्कृत मुलाखतींची जाहिरातबाजी चालली असली तरी या ‘पेड न्यूज’ मुळे गावोगावचे कोरोनाचे ... Read More »

साखळीतील रुग्णसंख्या २६ वर

>> मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांच्या गावी कोरोनाचा वाढता प्रसार >> दिवसभरात सापडले १३ रुग्ण साखळीत करोनाचा प्रसार वाढत असून काल सोमवारी एकाच दिवशी १३ रुग्ण सापडल्याने साखळीतील एकूण रुग्णसंख्या २६ झाली आहे. दरम्यान, रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. साखळी इस्पितळाचे अधिकारी डॉ. उत्तम देसाई यांनी, देसाईनगर येथे काल ८, भंडारवाडा येथे ३, गृहनिर्माण परिसर १ व गावठण परिसरात १ ... Read More »

राज्यात कोरोनाचे नवीन ५३ रुग्ण

>> मोतीडोंगर निर्बंधित क्षेत्र जाहीर >> एकूण संख्या १२५१ वर राज्यात काल नवीन ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह सध्याच्या रुग्णांची संख्या ७२४ झाली आहे. तर, कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२५१ एवढी झाली असून त्यातील ५२४ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, मडगावमधील मोतीडोंगर परिसर निर्बंधित क्षेत्र म्हणून जाहीर ... Read More »

मडगावातच अंत्यसंस्कार करावेत ः दिगंबर कामत

मडगाव येथील कोविड-१९ इस्पितळात उपचार घेणार्‍या एखाद्या कोविड रुग्णाचे जर उपचाराच्या दरम्यान निधन झाले तर त्या मयत रुग्णाचे अंत्यसंस्कार मडगाव येथील हिंदू स्मशानभूमीत केले जावेत. यासाठी जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्याबरोबर आपली व मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष भाई नायक यांची बैठक झाली. मयत कोविड रुग्णांवर आपल्या गावात अंत्यसंस्कार करण्यास स्थानिक लोकांकडून विरोध होऊ लागल्याप्रकरणी तोडगा काढल्याचे कामत म्हणाले. Read More »

म्हापसा, मडगावात कॉंग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात धरणे

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाचे दर सतत खाली येत असताना केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोलचे दर सतत वाढवून जनतेचे कंबरडे मोडल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काल म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केलेल्या धरणे धरणाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. मडगाव व म्हापसा अशा दोन ठिकाणी सकाळी १० ते दुपारी १२ या दरम्यान धरणे ... Read More »

गोमेकॉतील ओपीडी उद्यापासून नियमित

  बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) उद्या १ जुलैपासून नियमितपणे सुरू करण्यात येणार असून तपासणीसाठी आगाऊ नोंदणी करण्याची सुविधा बंद होणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गोमेकॉतील विविध विभागातील बाह्यरुग्ण विभागातील तपासणी बंद करण्यात आली होती. राज्यात एका बाजूने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ओपीडीसाठी पूर्वनोंदणीची अट काढून टाकल्याने तिथे गर्दी होण्याची शक्यता आहे. Read More »

५९ चिनी ऍपवर भारताकडून बंदी

भारत आणि चीनमध्ये लडाखमधील झटापटीनंतर तणाव निर्माण झाला आहे. यातूनच चिनी मालावर बहिष्कार घालण्यासाठी समाजात आवाहन केले जात आहे. चिनी ऍपद्वारे भारतीयांची माहिती दुसर्‍या देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करत काल सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर ... Read More »

भाजी उत्पादन १०० टनांवर नेणार : कृषिमंत्री

चालू वर्षी राज्यातील दैनंदिन भाजी उत्पादन ५ टनावरून १०० टनांवर नेण्याचे उद्दिष्ट कृषिखात्याने ठेवल्याची माहिती कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली. गोव्याला रोज ४०० टन एवढी भाजी लागते. मात्र, गोव्यात केवळ ५ टन एवढीच भाजी पिकत असते. त्यामुळे आम्ही भाजीसाठी पूर्णपणे परराज्यांवर अवलंबून आहोत, मात्र, राज्यात कृषिक्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट असून भाजी उत्पादन रोज ५ टनांवरून ... Read More »

नितीन मेनन आयसीसी एलिट पॅनलमध्ये

>> स्थान मिळवणारे केवळ तिसरे व सर्वांत युवा भारतीय पंच भारताचे युवा पंच नितीन मेनन यांना २०२०-२१ या मोसमासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एलिट पॅनलमध्ये स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडच्या नायजेल लॉंग यांच्या जागी मेनन यांना निवडण्यात आले आहे. ३६ वर्षीय मेनन यांना तीन कसोटी, २४ एकदिवसीय आणि १६ टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. २०१८ व २०२० ... Read More »

चोप्राच्या संघाचा धोनी कर्णधार

  भारताचा माजी कसोटी सलामीवीर व समालोचक आकाश चोप्रा याने आपल्या सार्वकालीक आयपीएल एकादश संघाचे नेतृत्व टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडे सोपविले आहे. धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने सातवेळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना तीन वेळा विजेतेपद मिळविले आहे. चोप्रा याने आपला यूट्यूब चॅनेल ‘आकाशवाणी’वर संघ जाहीर करताना मुंबई इंडियन्सचा ... Read More »