Monthly Archives: May 2020

रोहित टी-२०त द्विशतक नोंदवू शकतो ः ब्राव्हो

  भारताचा विस्फोटक सलामीवर रोहित शर्मा टी-२०मध्ये द्विशतक नोंदवू शकतो अशी शक्यता वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्‌वेन ब्राव्होने व्यक्त केली. टी-२०मध्ये आत्तापर्यंत एकाही खेळाडूला शतकी कामगिरी करता आलेली नाही आहे. परंतु अशी कामगिरी होऊ शकते आणि ती करण्याची क्षमता भारताच्या रोहितकडे असल्याचे ब्राव्होने ईएसपीएन क्रिकइन्फोच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. खरे पहिल्यास टीम इंडियाचा विस्फोटक सलामीवर असलेला रोहित शर्मा हा मर्यादित ... Read More »

सकारात्मकतेने योगसाधना करा

– डॉ. सिताकांत घाणेकर वरचेवर वाचणे, ऐकणे, बघणे नाही तर त्यातील वक्तव्ये लक्षपूर्वक ऐकली पाहिजेत. आणि गीता कशी विसरू शकू? ते गीत तर जीवनाचे तत्त्वज्ञानच आहे. मानवी जीवनाचे सर्व पैलूंनी यथार्थ दर्शन तिथे आहे. गरज आहे ती अभ्यास करण्याची इच्छा, श्रद्धा, निष्ठा…. जवळजवळ दोन महिने झाले, कोरोनाचा धुमाकूळ विश्‍वांत चालूच आहे. काही ठिकाणी रोगी कमी झाले तर काही ठिकाणी वाढले. ... Read More »

व्यसनांपासून रहा दूर…

– डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय) जसे वडीलधार्‍या माणसांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे तसेच मुलांनीसुद्धा मोठ्या माणसांचे ऐकले पाहिजे व त्यांचा, त्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. स्वतःची जवाबदारी दोन्हीही बाजुने पार पाडली पाहिजे. आई-वडील-आजोबा-आजी-मुले यामध्ये व्यवस्थित संवाद होणे गरजेचे आहे. व्यसन हे मानसिक व शारीरिक अस्थिरतेचे स्वरूप आहे. हे व्यसन एखाद्या रसायनाचे, अमली पदार्थ, अन्नाचे, ... Read More »

कारवाई व्हावीच!

  पोर्तुगीज गोवा सोडून निघून गेले त्याला जवळजवळ सहा दशके लोटली, तरी देखील अजूनही त्यांच्या नावाने गळा काढणारी प्रवृत्ती गोव्यामध्ये आहे. अधूनमधून संधी मिळाली की जमिनीत स्वतःला पुरून घेतलेल्या गांडुळाने काढावे तशी ती डोके वर काढीत असते. कधी गोव्यात आलेले सांग्रीस जहाज, कधी लुसोफोनिया स्पर्धा, कधी विश्वचषक फुटबॉल, कधी फौंतेइन्यश महोत्सव असे एखादे निमित्त साधून ही मंडळी हळूच डोके वर ... Read More »

विदेशातून येणार्‍यांच्या क्वॉरंटाईन कालावधीत घट

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार (एसओपी) विदेशातून येणारे खलाशी आणि अडकलेल्या प्रवाशांच्या क्वारंटाईऩ नियमांमध्ये बदल करण्यात आला असून सरकारी क्वारंटाईऩ आणि होम क्वारंटाईनचा कालावधी प्रत्येकी १४ दिवसांवरून प्रत्येकी ७ दिवसांवर आणण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. राज्यात रस्ता मार्गाने प्रवेश करणार्‍या प्रवाशांसाठी नवीन नियमावलीची अंमलबजावणी मंगळवारपासून केली जाणार आहे. नवीन नियमावलीची ... Read More »

एका नवीन रुग्णामुळे गोव्यातील कोरोना रुग्णसंख्या ४८ वर

राज्यात कोरोना विषाणू बाधित आणखी १ रुग्ण काल आढळून आला. राज्यातील कोरोना बाधित (ऍक्टीव्ह) रुग्णांची संख्या ४८ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान काल विमानाने गोव्यात आलेल्या २६ जणांनी कोविड चाचणी केली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. राज्यात रस्ता मार्गाने आलेल्या एकाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे चाचणीत आढळून आले आहे. नव्याने ... Read More »

दाबोळीवर उतरले ९९ प्रवासी

>> १५ पैकी १३ विमाने झाली रद्द दाबोळी विमानतळ सेवा कालपासून तीन विमानानी सुरुवात झाली. मुंबई, हैदराबाद, म्हैसूर विमानतळ सेवा सुरू न झाल्याने काल यावयाची १५ पैकी १३ विमाने रद्द करण्यात आली. काल बेंगलोर – दिल्ली – बंगलोर येथून तीन विमानातून एकूण ९९ प्रवासी आले तर त्याच प्रत्येक विमानातून १०० हून अधिक प्रवासी गोव्यातून रवाना झाले. दुपारी १.३० वाजता बेंगलोर, ... Read More »

‘त्या’ प्रश्‍नी लवकरच कारवाई शक्य

>> शालांत मंडळाध्यक्ष सामंत यांची स्पष्टोक्ती दहावी इयत्तेच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेतील वादग्रस्त ठरलेल्या प्रश्‍नासंबंधी सखोल चौकशी केली जाणार असल्याचे काल गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी स्पष्ट केेले. कुणावरही एका दिवसात कारवाई होऊ शकत नाही. आम्हाला चौकशी करण्यास वेळ हवा आहे. शालांत मंडळाच्या अधिकार्‍यांशी मी सध्या याप्रकरणी चर्चा सुरु केलेली आहे. त्यांचे यासंबंधी काय म्हणणे आहे ते मी ... Read More »

देशांतर्गत विमान सेवेस प्रारंभ; मात्र अनेक उड्डाणे झाली रद्द

तब्बल दोन महिन्यांच्या खंडानंतर देशांतर्गत प्रवासी विमानसेवेस काल प्रारंभ झाला. मात्र देशाच्या विविध भागातील विमानांची उड्डाणे रद्द झाल्याने संबंधित विमानसेवेसाठी तिकिटांचे आरक्षण केलेल्या शेकडो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विमानतळ अधिकार्‍यांच्या माहितीनुसार दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ८० विमानांची उड्डाणे रद्द झाली त्याआधी प. बंगाल, महाराष्ट्र व चेन्नईसह सर्व विमानतळांवरील उड्डाणांचे वेळापत्रक प्रसिध्द झाले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक उड्डाणे रद्द करण्यात ... Read More »

यूएईहून पहिले आंतरराष्ट्रीय

विमान ‘दाबोळी’वर १ जूनला१ जूनपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत असून या दिवशी संयुक्त अरब अमिरातहून (युएई) पहिले आंतरराष्ट्रीय विमान दाबोळी विमानतळावर उतरणार असल्याचे अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. ज्या देशांत लॉकडाऊनमुळे गोमंतकीय नागरिक अडकून पडलेले आहेत त्यांना राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वीच दर्यावर्दींसह विविध देशांत काम करणार्‍या कित्येक गोमंतकीयांना सुखरुप राज्यात परत ... Read More »