Monthly Archives: May 2020

पॅरा ऍथलिट दीपा मलिक निवृत्त

भारतीय पॅरा ऍथलिट दीपा मलिक हिने सोमवारी निवृत्ती जाहीर केली. राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तिने ही निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय पॅरालिंपिक समितीचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी दीपाने निवृत्ती स्वीकारली. खेळाने मला खूप काही दिले आता खेळासाठी योगदान देण्याची वेळ आली असल्याचे ४९ वर्षीय दीपाने सांगितले. २०२२ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्याची इच्छा असून त्यावेळची परिस्थिती पाहून पुढील पावले उचलेन, ... Read More »

कठीण काळात संघसाथींकडून दुर्लक्ष

>> श्रीशांतने केला आरोप भारताचा माजी तेज गोलंदाज एस. श्रीशांतने भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे. त्याच्या कठीण काळात त्याचे संघसाथी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते. ते त्याच्याकडे पाहत देखील नव्हते, असा आरोप त्याने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. श्रीशांतला पाहिल्यावर काही खेळाडू दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. केवळ विरेंद्र सेहवाग व व्हीव्हीएस लक्ष्मणसह एक-दोन खेळाडू असे आहेत जे श्रीशांतबरोबर संपर्कात ... Read More »

उन्हाळ्यातील दिनचर्या कशी असावी?

–  डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) आत्ताचे तप्त वातावरण पाहता किंवा उन्हाळ्याचा ताप पाहता, आत्ताच्या ऋतुचर्येप्रमाणेच सगळ्यांनी दिनचर्येचे पालन करणे गरजेचे आहे. आता क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींनी तसेच कोरोना व्हायरस बाधित रुग्णांनी तसेच इतर जनसमुदायानी या उन्हाळ्यात आहार-विहाराचे खालीलप्रमाणे आचरण करावे… जगभरात कोरोना व्हायरसने थैमान माजवले असले तरी भारतात इतर देशांच्या अपेक्षेने या कोरोनावर बर्‍यापैकी मात केली आहे. सरकारने या कोरोना ... Read More »

मृत्योर्मा अमृतं गमय…

 प्रा. रमेश सप्रे ‘हे परमशक्तिमान परमेश्‍वरा, जीवनातील सत्याचं दर्शन होण्याच्या आड येणार्‍या सर्व दिखावटी, चमकदार वस्तूंचं खरं ज्ञान करून दे. प्रलोभनं, आकर्षणं, पतनाचे क्षण यापासून माझं रक्षण कर. जिवंत असतानाच मला शांत, तृप्त, समाधानी, आनंदी अशा ‘अमृत अवस्थेचा’ अनुभव दे’. सध्याच्या मृत्यूचं तांडव चालू असलेल्या काळात तर या प्रार्थनेचं महत्त्व अधिकच आहे. ‘चकाकतं ते सर्व सोनं नसतं’ (ऑल् दॅट् ग्लिटर्स ... Read More »

पावसाळ्यात होणारे रोग

– डॉ. भिकाजी घाणेकर एप्रिल- मे महिन्यात डास न होण्यासाठी उपाय केले नाहीत तर अतिसार, कॉलरा, विषमज्वरासारखे रोग होतात. जूनच्या नंतर काहीच करता येत नाही कारण सगळीकडे पाणीच पाणी झालेले असते. लहान मुले, गरोदर स्त्री, स्तनपान करणारी स्त्री आणि ६० वर्षे वयावरील वृद्ध ह्यांची जास्त काळजी घ्यावी. पावसाळा सुरु झाला की अनेक रोग होण्याची शक्यता वाढते. पावसाळा हा गोव्यातील जास्त ... Read More »

जरा कठोर व्हा!

कोरोनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाचव्यांदा विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. तिसर्‍या टप्प्यातील देशव्यापी लॉकडाऊन उठवायचे की त्याची मुदत काही राज्यांत आणखी वाढवायची यासंदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीने पंतप्रधान आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांदरम्यानचा हा संवाद महत्त्वाचा असणार आहे. देशातील बहुतेक महानगरे अजूनही लाल विभागात आहेत. दिवसागणिक देशात तीन हजारांवर नव्या रुग्णांची भर पडते आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठविण्याच्या मनःस्थितीत ... Read More »

निवडक १५ मार्गांवर उद्यापासून विशेष ट्रेन्स

>> मडगाव स्थानकाचाही समावेश भारतीय रेल्वे येत्या दि. १२ मेपासून टप्प्याटप्प्याने देशातील निवडक अशा १५ मार्गांवरील रेलसेवा सुरू करणार आहे. या अंतर्गतच्या ट्रेन्स विशेष ट्रेन्स स्वरुपात नवी दिल्ली येथून धावणार आहेत. गोव्यातील मडगाव रेल स्थानकावरूनही ही विशेष ट्रेन जोडली जाणार असल्याचे वृत्त आहे. नवी दिल्लीहून या विशेष ट्रेन्स दि ब्रुगड, अगरताळा, हावडा, पाटणा, विलासपूर, रांची, भुवनेश्‍वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतपूरम, ... Read More »

पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्यात आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

देशाला टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनच्या स्थितीतून बाहेर आणत असतानाच देशाची अर्थ व्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी विविध मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. देशात कोरोनाची आपत्ती कोसळल्यापासून अशा पध्दतीने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची पंतप्रधानांची ही पाचवी वेळ आहे. देशात दि. २५ मार्चपासून लॉकडाऊन आहे. त्यावरही यावेळी चर्चा होईल. केंद्रातील सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत प्रामुख्याने अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर भर ... Read More »

पत्रादेवी नाक्यावर साधनसुविधा वाढविण्याची बैठकीत सूचना

  पत्रादेवी येथील मुख्य वाहन तपासणी नाक्यावर वाहनांच्या तपासणीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधन सुविधा उभारण्याची सूचना राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत काल करण्यात आली. मुख्य सचिव परिमल राय यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी अतिरिक्त काउंटरची सोय करून बांधकाम व इतर सामान घेऊन राज्यात येणार्‍या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू करावे. पत्रादेवी वाहन तपासणी नाक्यावर वाहनांच्या वाढत्या ... Read More »

राज्यातील बाजारपेठांत लॉकडाऊन नियमभंगाचे वाढते प्रकार

लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात सामाजिक अंतर व इतर नियमांचा राज्यभरात फज्जा उडत आहे. राज्यभरातील विविध बाजारपेठांत सामाजिक अंतर नियमांचे पालन करण्यात येत नाही. गोव्याच्या शेजारील सिंधुदुर्ग, बेळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत अचानक झालेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात नियम पालनाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गोवा राज्याचा हरित विभागात समावेश झाल्यानंतर उद्योग, व्यापार सुरू करण्यासाठी नियमांमध्ये जास्त शिथिलता देण्यात ... Read More »