Monthly Archives: May 2020

धाडसी व्यक्तिमत्त्व : जॉन आगियार

 गोकुळदास मुळवी जॉन आणि माझी जोडी चांगलीच जमली होती. त्या काळात आम्ही दोघांनी अनेक प्रकरणांना वाचा फोडली. सामाजिक प्रश्न हाताळले. गोवा- मराठी पत्रकार संघाचे आम्हीही सदस्य झालो. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभाग दाखवत होतो. कवळेची श्रीशांतादुर्गा आईला न विसरता त्यांनी असेच पुढे जावे आणि खूप मोठे व्हावे. आज त्यांच्या ६०व्या वाढदिवशी माझ्या त्यांना खूप खूप शुभेछा! रामनाथी येथे श्रीरामनाथ सभागृहात एका ... Read More »

पारंपरिक उद्योग पुन्हा सुरू व्हावेत!

 प्रा. नागेश म. सरदेसाई या ३४व्या गोवा घटक राज्य दिवसाच्या शुभमुहूर्तावर गोवेकर बांधवांनी आपले पारंपरिक उद्योग पुन्हा सुरू करून एका नव्या युगाची नांदी आरंभ करणे हिताचे ठरेल. याशिवाय सरकार आणि प्रशासकीय स्तरावर काही कठोर बदल करणे आवश्यक आहे. आजचा घटक राज्याचा मुहूर्त आपण नव्या उमेदीने काम करून आर्थिक स्थान बळकट करण्यास योग्य ठरावा! गोवा- दमण- दीव हे तीन प्रदेश १९ ... Read More »

सक्तीच्या सुट्टीचे नियोजन

 पौर्णिमा केरकर सक्तीची सुट्टी कधी संपणार सांगता येत नाही, मात्र आपल्या मनात अभंग जिद्द असेल आणि जीवनाकडे पाहण्याचा कलात्मक दृष्टिकोन असेल तर ‘हेही दिवस सहज जातील’ ही अशी सकारात्मकता आपल्याला या परिस्थितीतून तावून सुलाखून ताजेतवाने होत बाहेर पडण्याचे बळ निश्चितच देईल! बघता बघता सक्तीच्या सुट्टीचे दोन महिने उलटून गेले. फक्त देशातच नव्हे तर जगात असे काहीतरी घडेल आणि अचानक एक ... Read More »

उदरभरण नोहे….

 माधुरी रं. शे. उसगावकर थोडी कार्यकुशलता आणि आरोग्यविषयक टीप्स यांची सांगड उत्तम जमली की आरोग्याची काळजीही घेतली जाते आणि नवीन पदार्थ बनवून खाऊ घालण्याचे दुहेरी समाधान प्राप्त होते. संचारबंदीच्या काळात गृहिणींच्या प्रतिभांना फुटलेले धुमारे आणि खवय्यांचा रुचिपालट… आहे की नाही तरणोपाय? जपा आरोग्य आपले.. मंत्र आहाराचा. आपली प्राचीन संस्कृती ही शास्त्रोक्तरीत्या पूर्वापार परिपूर्ण होती. छान जीवनाबद्दलची उद्दिष्टे, चालिरीती या व ... Read More »

गांधीजींची तीन माकडं

 अनुराधा गानू (आल्त-सांताक्रूझ, बांबोळी) गांधीजींच्या शिकवणीचा अर्थ आम्ही असा आमच्या फायद्याप्रमाणे लावलाय. खरं म्हणजे आमच्या डोळ्यांवर, तोंडावर आणि कानांवर हात दुसर्‍याच कोणीतरी ठेवलेत. शिवाय आम्ही आमच्या तोंडावरचा हात काढला तर दुसर्‍या कुणाचातरी हात आमच्या गळ्याभोवती आवळला जाईल ही भीती आहेच. लहानपणापासून ऐकत आलोय. म. गांधीजींची तीन माकडं फार प्रसिद्ध आहेत. एकाचे हात कानांवर – वाईट ऐकू नये म्हणून; एकाचे हात ... Read More »

दुसरे ‘पुलवामा’ फसले

काश्मीर खोर्‍यातील पुलवामा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा फार मोठा कार बॉम्बस्फोट घडवून सुरक्षा दलांच्या काफिल्यावर हल्ला चढवण्याचा बेत जवानांच्या जागरूकतेमुळे काल फसला. मात्र, आत्मघाती हल्ल्याच्या प्रयत्नात असलेले दहशतवादी नाकाबंदीच्या ठिकाणी सुरक्षा दलांनी गोळीबार करताच रात्रीच्या अंधारात पलायन करण्यात यशस्वी ठरले. सुरक्षादलांवर अशा प्रकारचा आत्मघाती हल्ला होणार आहे याची चाहुल काश्मीरमधील गुप्तचर यंत्रणांना आधीच लागलेली होती, त्यामुळे हा हल्ला यशस्वीपणे विफल करणे ... Read More »

मडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना

मडगाव रेल्वे स्टेशनवरून काल उत्तर भारतातील मजुरांना घेऊन दोन श्रमिक गाड्या रवाना झाल्या. दुपारी साडेबारा वाजता सोनभद्र-उत्तर प्रदेशात जाण्यासाठी सुमारे १ हजार मजुरांना घेऊन ट्रेन रवाना झाली. तर सायंकाळी ६ वाजता दिनापूर-नागालँडच्या मजुरांना घेऊन दुसरी गाडी सुटली. त्यात दिड हजारपेक्षा जास्ती मजूर होते. नेहमीप्रमाणे सकाळपासून रेल्वे स्टेशनवर उत्तर प्रदेशातील मजूरांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती. त्यामुळे अधिकार्‍यांची धावपळ झाली. पोलिसांना ... Read More »

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे

  राज्यात कोरोना विषाणूबाधित १ नवीन रुग्ण काल आढळून आला. तर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारा एक रुग्ण बरा झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३१ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत कोरोना बाधा झालेले ३८ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याने काल दिली. महाराष्ट्रातून रस्ता मार्गाने आलेल्या एका प्रवाशाची कोविड चाचणी पॉझिटीव आली आहे. त्याला उपचारार्थ मडगाव येथील कोविड ... Read More »

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीने कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील नियोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय काल घेतला. येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आयोजन समितीची बैठक घेऊन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनावर निर्णय घेतला जाणार आहे. आत्ताच्या परिस्थितीचा विचार केल्यास क्रीडा स्पर्धा या वर्षी आयोजित करणे शक्य होईल असे वाटत नाही, अशी माहिती क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी आयोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ... Read More »

माशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध

सहकार खात्याने सहकार नियमांचे उल्लंघन प्रकरणी माशेल महिला को.-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. सहकार खात्याचे निबंधक विकास गावणेकर यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. सहकार खात्याच्या फोंडा येथील साहाय्यक निबंधकांनी या सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सहकार निबंधकांना सादर केला आहे. सोसायटीच्या कारभारात अनेक ठिकाणी नियमांचे पालन करण्यात आलेले नसल्याचे उघड झाले आहे. या ... Read More »