Monthly Archives: May 2020

खाटांची संख्या २२० पर्यंत वाढवणार ः नीला मोहनन

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मडगाव येथील खास कोविड-१९ इस्पितळामधील खाटांची संख्या २२० पर्यत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रपरिषदेत काल दिली. कोविड इस्पितळामध्ये अतिदक्षता (आयसीयू) विभागात ४० खाटांची सोय आहे. अतिदक्षता विभागात आणखी २० खाटा वाढविण्याची सोय आहे. या इस्पितळामध्ये १६ व्हॅन्टिलेटर उपलब्ध असून जुलै २०२० पर्यंत २०० व्हॅन्टिलेटर उपलब्ध ... Read More »

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४३

राज्यातील कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या ४३ झाली आहे. कोरोना विषाणूची बाधा झालेले नवीन ४ रुग्ण आढळून आले असून कोरोना संशयित ५ रुग्णांना जीएमसीच्या खास विभागात दाखल करण्यात आले आहे. कोरोना आयझोलेेशन वॉर्डात कोरोना संशयित १० जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत २४ तास कोरोना विषाणूच्या नमुन्याची ... Read More »

…तर आयपीएल ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शक्य

>> गायकवाड यांनी दिले संकेत कोरोना महामारीमुळे संपूर्ण क्रीडा जगत स्तब्ध आहे. हळुहळू काही स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये सुरू व्हायला लागल्या आहेत. जर्मनीतील बुंडेस्लिगा फुटबॉल लीग सुरू झालेली आहे. परंतु क्रिकेटबाबत अजून काही स्पष्ट झालेले नाही आहे. ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषकही अनिश्‍चितच्या गर्तेत आहे. त्यामुळे जर हा विश्वचषक झाला नाही तर या दरम्यान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा होऊ शकते असे ... Read More »

आयपीएल २५ सप्टेंबर ते १ नोव्हे.पर्यंत!

  कोरोना महामारीमुळे आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाबाबत संभ्रम आहे. स्पर्धेचे आयोजन न झाल्यास होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी ही स्पर्धा याच वर्षाच्या शेवटाला खेळविता येईल काय याची तपासणीही बीसीसीआयकडून केली जात आहे. बीसीसीआय २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएलच्या तेराव्या पर्वाचे आयोजन करण्याचा विचार करीत असल्याचे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले. जरी बीसीसीआय वरील कालावधीत आयपीएलचे आयोजन करण्यासाठी उत्सुक असले तरी ... Read More »

वॉर्नची गोलंदाजी खेळायला कठीण जायचे

>> विराटने केले स्पष्ट टीम इंडियाचा आक्रमक कर्णधार विराट कोहली हा गोलंदाजांसाठी सध्याच्या काळातील सर्वांत धोकादायक फलंदाज मानला जातो. त्याची गणना वर्तमान काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जात आहे. बर्‍याच गोलंदाजांसाठी तो कर्दनकाळ ठरत असतो. परंतु विराटने मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेगस्पिनर असलेल्या शेन वॉर्नची गोलंदाजी खेळणे त्याला कठीण व्हायचे, असे सुनील छेत्रीबरोबर लाईव्ह चॅट करताना सांगितले. विराटने आयपीएलमध्ये वॉर्नसमोर खेळताना ... Read More »

एएफआयने जाहीर केली खेळाडूंना कडक नियमावली

भारतात कोरोना महामारीच्या रुग्णांची संख्या लाखाच्या वर गेलेली आहे. असे असले तरी केंद्र सरकारने गत रविवारी जाहीर केलेल्या चौथ्या टप्प्यात खेळाडूंसाठी काही ढिलाईही दिली आहे. त्यांना सरावासाठी क्रीडा संकुले आणि स्टेडियम्स खुली करण्याचा निर्णय सुनावला. अशात भारतीय ऍथलेटिक्स महासंघाने (एएफआय) आपल्या खेळाडूंसाठी कडक नियमावली सादर केली आहे. या लॉकडाऊनच्या काळात खेळाडूंना हस्तांदोलन करणे, गळाभेट घेणे, थुंकणे तसेच केशकर्तनालयात जाण्यास सक्त ... Read More »

रुग्ण रोखूया

देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांवर गेली असताना, गोव्यानेही त्यामध्ये आता आपले मोठे योगदान द्यायला प्रारंभ केलेला दिसतो. सोमवार संध्याकाळपर्यंत गोव्यातील सध्याच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ वर पोहोचली होती. काल तीत अधिक भर पडत गेली. यामध्ये सर्वाधिक वाटा आहे तो अर्थातच रेल्वेने गोव्यात आलेल्या मंडळींचा. रेल्वेने आलेले आठजण पहिल्या दिवशी कोरोनाबाधित आढळले. दुसर्‍या दिवशी त्यात आणखी बारा जणांची भर पडली. रेल्वेने ... Read More »

दहावीच्या परीक्षेबाबत आज महत्त्वाची सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेबाबत नव्याने याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर बुधवार २० मे रोजी सकाळी १० वाजता सुनावणी घेतली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला दहावीची परीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मान्यतेसंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश काल दिला आहे. बारावीचे उर्वरित पेपर आजपासून ... Read More »

इटलीहून खलाशांना घेऊन आज तीन विमाने गोव्यात

इटलीमधून ४४१ खलाशांना घेऊन येणारी खास तीन विमाने बुधवार २० मे २०२० रोजी दाबोळी विमानतळावर दाखल होणार आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी पी. एस. रेड्डी यांनी काल दिली. या तीन विमानांतून येणार्‍या खलाशांची कोविड तपासणी करून त्यांना हॉटेलमध्ये क्वांरटाईन केले जाणार आहे. खलाशांचे क्वारंटाईन शुल्क देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत अडकलेले ६८ गोमंतकीय येत्या २२ मे रोजी ... Read More »

क्वारंटाईन शुल्क आकारणीबाबत सीमॅन असोसिएशनची याचिका

येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गोवन सीमॅन असोसिएशन ऑफ इंडियाने एक याचिका दाखल करून सरकारच्या खलाशांकडून क्वारंटाईन शुल्क आकारण्याचा निर्णयाला आव्हान दिले आहे. न्यायालयाने सरकारला नोटीस जारी केली असून या याचिकेवर बुधवार २० मे रोजी सुनावणी होणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात परतणार्‍या गोमंतकीय खलाशांना क्वांरटाईन करण्यासाठी शुल्क आकारले जात आहे. गोमंतकीय खलाशांकडून थेट शुल्क आकारले जात नाही. तर, ... Read More »