Daily Archives: May 29, 2020

दुसरे ‘पुलवामा’ फसले

काश्मीर खोर्‍यातील पुलवामा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा फार मोठा कार बॉम्बस्फोट घडवून सुरक्षा दलांच्या काफिल्यावर हल्ला चढवण्याचा बेत जवानांच्या जागरूकतेमुळे काल फसला. मात्र, आत्मघाती हल्ल्याच्या प्रयत्नात असलेले दहशतवादी नाकाबंदीच्या ठिकाणी सुरक्षा दलांनी गोळीबार करताच रात्रीच्या अंधारात पलायन करण्यात यशस्वी ठरले. सुरक्षादलांवर अशा प्रकारचा आत्मघाती हल्ला होणार आहे याची चाहुल काश्मीरमधील गुप्तचर यंत्रणांना आधीच लागलेली होती, त्यामुळे हा हल्ला यशस्वीपणे विफल करणे ... Read More »

मडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना

मडगाव रेल्वे स्टेशनवरून काल उत्तर भारतातील मजुरांना घेऊन दोन श्रमिक गाड्या रवाना झाल्या. दुपारी साडेबारा वाजता सोनभद्र-उत्तर प्रदेशात जाण्यासाठी सुमारे १ हजार मजुरांना घेऊन ट्रेन रवाना झाली. तर सायंकाळी ६ वाजता दिनापूर-नागालँडच्या मजुरांना घेऊन दुसरी गाडी सुटली. त्यात दिड हजारपेक्षा जास्ती मजूर होते. नेहमीप्रमाणे सकाळपासून रेल्वे स्टेशनवर उत्तर प्रदेशातील मजूरांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती. त्यामुळे अधिकार्‍यांची धावपळ झाली. पोलिसांना ... Read More »

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे

  राज्यात कोरोना विषाणूबाधित १ नवीन रुग्ण काल आढळून आला. तर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारा एक रुग्ण बरा झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३१ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत कोरोना बाधा झालेले ३८ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याने काल दिली. महाराष्ट्रातून रस्ता मार्गाने आलेल्या एका प्रवाशाची कोविड चाचणी पॉझिटीव आली आहे. त्याला उपचारार्थ मडगाव येथील कोविड ... Read More »

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीने कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील नियोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय काल घेतला. येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आयोजन समितीची बैठक घेऊन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनावर निर्णय घेतला जाणार आहे. आत्ताच्या परिस्थितीचा विचार केल्यास क्रीडा स्पर्धा या वर्षी आयोजित करणे शक्य होईल असे वाटत नाही, अशी माहिती क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी आयोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ... Read More »

माशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध

सहकार खात्याने सहकार नियमांचे उल्लंघन प्रकरणी माशेल महिला को.-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. सहकार खात्याचे निबंधक विकास गावणेकर यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. सहकार खात्याच्या फोंडा येथील साहाय्यक निबंधकांनी या सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सहकार निबंधकांना सादर केला आहे. सोसायटीच्या कारभारात अनेक ठिकाणी नियमांचे पालन करण्यात आलेले नसल्याचे उघड झाले आहे. या ... Read More »

‘पुलवामा’च्या पुनरावृत्तीचा कट यशस्वीपणे उधळला

  पुलवामा दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती घडविण्याचा दहशतवाद्यांचा डाव काल भारतीय सुरक्षा दलांनी यशस्वीपणे उधळून लावला. जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. जैश-ए-महंमद व हिज्बुल मुजाहिदीन यांच्या दहशतवाद्यांनी ४५ किलो स्फोटके असलेल्या एक कारमधून हा हल्ला घडविण्याचा कट रचला होता. मात्र भारतीय लष्कर, सीआरपीएफ व जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे हा कट उधळला गेला. बुधवारी रात्री ... Read More »

मॉन्सूनचे आगमन ५ जूनला शक्य

राज्यात मोसमी पावसाचे आगमन येत्या ५ जूनला होण्याची शक्यता येथील हवामान विभागाने काल व्यक्त केली आहे. हवामान खात्याने नवीन अंदाजानुसार केरळमध्ये येत्या १ जूनला मोसमी पावसाचे आगमन होण्याची शक्यता गुरूवारी व्यक्त केली आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असल्याने मोसमी पावसाचे आगमन वेळेवर होण्याची शक्यता गोवा हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तविली आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात काही भागात कमी दाबाचा पट्टा ... Read More »

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे वेळापत्रक जाहीर

>> पहिली कसोटी ३ डिसेंबरपासून ब्रिस्बेनवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याविषयी अजून निश्‍चित कळवलेले नसले तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी उन्हाळी मोसमाचे आपले वेळापत्रक काल गुरुवारी जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या २०२०-२१ च्या मोसमात भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यांसह भारत, न्यूझीलंड आणि झिंबाब्वे विरुद्धची टी-ट्वेंटी आणि भारत, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज विरुद्ध वनडे सामन्यांचा समावेश आहे. ... Read More »

लॉडर्‌‌स ‘नॉन ऑनर्स बोर्ड इलेव्हन’ संघ जाहीर

>> सचिन, सेहवाग, कोहलीचा समावेश क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉडर्‌‌स क्रिकेट मैदानाच्या मंडळाने आपली अकरा जणांची टीम निवडली आहे. जगातील विविध मैदानांवर आपले बॅटने मैदाने गाजवलेल्या तसेच गोलंदाजींत विविध मैदानांवर डावांत पाच किंवा अधिक बळी घेतलेल्या परंतु, लॉडर्‌‌सवर अपयशी ठरलेल्यांचा या संघात समानेश करण्यात आला आहे. ‘लॉडर्‌‌स नॉन ऑनर्स बोर्ड इलेव्हन’ असे नाव या संघाला दिले आहे. विशेष म्हणजे ... Read More »