Daily Archives: May 28, 2020

चूक सुधारली

‘होम क्वारंटाईन’चा घातक पर्याय जनतेच्या दबावापुढे झुकत अखेर राज्य सरकारने मुकाट्याने मागे घेतला. गोव्यात येणार्‍या कोणत्याही व्यक्तीने एक तर तत्पूर्वी ४८ तासांत कोविड चाचणी करून घ्यावी व तिचा अहवाल नकारात्मक आल्याचे प्रमाणपत्र दाखवावे किंवा गोव्यात आल्यावर कोविड चाचणीला सामोरे जावे असे दोनच सर्वांसाठी समान आणि सुटसुटीत पर्याय सरकारने आता समोर ठेवले आहेत. म्हणजेच गोव्यात येणार्‍या प्रत्येकासाठी आता कोविड चाचणी सक्तीची ... Read More »

बाहेरुन येणार्‍यांसाठीचा होम क्वारंटाईन पर्याय रद्द

>> कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे; अन्यथा गोव्यात कोरोना चाचणीची सक्ती ः मुख्यमंत्री हवाई, रेल्वे व रस्तामार्गाने गोव्यात येणार्‍या सर्व प्रवाशांना यापुढे कोविड-१९ संसर्गापासून आपण मुक्त (निगेटिव्ह) असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊनच राज्यात यावे लागेल. अन्यथा त्यांना राज्यात आल्यानंतर कोविड-१९ साठीची चाचणी करुन घेणे सक्तीचे असेल. मात्र, स्वतःच्या घरात विलगीकरणात (क्वारंटाईन ) राहण्याचा पर्याय यापुढे त्यांना देण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ... Read More »

लॉकडाऊन कार्यवाहीवर श्‍वेतपत्रिकेची कॉंग्रेस विधिमंडळ गटाची मागणी

  कोरोना महामारीच्या काळात गोवा सरकारने लॉकडाऊनची अंमलबजावणी कशा तर्‍हेने हाताळली, त्यासाठी किती पैसे आले व किती पैसे खर्च झाले, सुरवातीपासून कितीजणांची तपासणी केली व किती कोरोना रुग्ण सापडले यावर सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्ष विधिमंडळ गटाने काल सरकारकडे केली असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले. काल सायंकाळी मडगाव येथील विश्राम धामात कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. ... Read More »

पाचव्या लॉकडाऊनची रविवारी घोषणा शक्य

  देशातील चौथा लॉकडाऊन दि. ३१ मे रोजी संपणार असून त्याच दिवशी पाचव्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवर मन की बात ही कार्यक्रम होणार असून त्यावेळी ते देशवासियांशी संवादादरम्यान या संदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे. देशभरातील सध्या कार्यवाहीत असलेल्या निर्बंधांमध्ये कशा प्रकारे शिथिलता आणली जाणार आहे व अन्य माहिती ते देणार ... Read More »

गोव्यात कोरोनाचे ३१ रुग्ण

>> बुधवारी एक नवीन सापडला; ९ झाले बरे कोरोनाची लागण झालेला आणखी एक रुग्ण काल राज्यात सापडला असल्याचे माहिती काल आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर व्यक्ती ही आपल्या कुटुंबियांना गोव्यात आणण्यासाठी मुंबईला गेली होती. त्याच्या कुटुंबियांपैकी अन्य कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे चाचणीत आढळून आल्याचे मोहनन म्हणाल्या. कोरोनाचा संसर्ग झालेले एकूण ३९ रुग्ण राज्यात होते. त्यापैकी ... Read More »

शंभर रुपयांत मिळणार १० भाज्या

>> शेतकर्‍यांच्या गटाच्या उपक्रमाचा कृषी मंत्र्यांहस्ते शुभारंभ राज्यातील १३ शेतकर्‍यांच्या एका गटाने लोकांना केवळ १०० रुपयात दहा भाज्या देण्याचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असून काल पर्वरी येथील मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यानी या उपक्रमाचा शुभारंभ केला. या उपक्रमाखाली १०० रुपयांत ग्राहकांना एक किलो कांदा, अर्धा किलो बटाटे, एक किलो टॉमेटो, गोमंतकीय तांबडी भाजीची एक ... Read More »

तर टी-ट्वेंटी वर्ल्डकप अन्यत्र हलवणार

>> आयसीसीची बीसीसीआयला धमकी केंद्र सरकारकडून करात सूट मिळविण्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अपयशी ठरल्यानंतर क्रिकेटचे संचालन करणारी सर्वोच्च संस्था असलेल्या आयसीसीने भारताकडून टी-ट्वेंटी विश्‍वचषक (२०२१) स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्याची धमकी काल मंगळवारी दिली. २०१६च्या भारतात झालेल्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेपासून बीसीसीआय व आयसीसी यांच्यात करावरून युद्ध सुरू आहे. करातून सूट न मिळाल्यामुळे ‘त्या’ स्पर्धेत आयसीसीला २० ते ३० मिलियन डॉलर्सचा ... Read More »

शोएबला सचिन घाबरायचा

>> मोहम्मद आसिफचा हास्यास्पद दावा शोएब अख्तरचा बाऊन्सर चेंडू खेळताना सचिन तेंडुलकर आपले डोळे बंद करायचा, असा दावा सामना निकाल निश्‍चिती प्रकरणात अडकल्यामुळे कारकीर्द संपलेला पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आसिफने केला आहे. कराची कसोटीच्या दुसर्‍या डावात शोएब जबरदस्त गोलंदाजी करत होता. मी स्क्वेअर लेगला उभा होतो, शोएबचे एक-दोन बाऊन्सर खेळताना सचिनला डोळे बंद करुन घेताना मी पाहिले आहे. सचिन शोएबला ... Read More »