Daily Archives: May 27, 2020

उद्या जनतेवर खापर?

  कालच्यासारख्या एखाद-दुसर्‍या प्रासंगिक विषयाचा अपवाद वगळल्यास गेल्या मार्च अखेरपासून आम्ही गेले दोन महिने ‘कोरोना’ या एकमेव विषयावर सातत्याने रोज अग्रलेखाद्वारे वेगवेगळ्या अंगांनी भाष्य करीत आलो आहोत. या समस्येचे वेगवेगळे पैलू, त्याच्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडून उचलली गेलेली बारीकसारीक पावले, त्यातील बर्‍यावाईट बाबी, सरकारचे श्रेय आणि अपश्रेय, त्रुटी आणि चुका, यश आणि अपयश, स्थलांतरित मजूर, गोरगरीब, मध्यमवर्ग, कामगार, उद्योगपती, ... Read More »

महाराष्ट्रातून येणार्‍यांसाठी एसओपीत बदलाचा विचार

>> मुख्यमंत्री ः गोव्याकडून रेल्वे, विमान वाहतूक मंत्रालयाला माहिती गोव्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण महाराष्ट्रातून आलेले असून त्यामुळे गोव्याला महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाशांची जास्त भीती आहे. म्हणूनच गोवा सरकारने केंद्रीय रेल्वे तसेच विमान वाहतूक मंत्रालयाला गोव्याला महाराष्ट्राकडून कोरोनाची जास्त भीती असल्याची जाणीव करून दिलेली आहे. गोव्यात येण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रक्रियेत (एसओपी) महाराष्ट्रासाठी काही नियमात बदल करण्याचा विचार असल्याची माहिती ... Read More »

मडकई-कुंडई बगल रस्त्यावर भीषण अपघात ः २ युवक ठार

मडकई-कुंडई बगल रस्त्यावर काल दुपारी मालवाहू ट्रक व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन दोघेजण जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेले दोघेही युवक जुने गोवे येथील आहेत. आकाश महादेव होसमणी (वय १९) व रितेश चंद्रकांत कुडीनूर (वय २०) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातात ठार झालेले दोघेही युवक मडकई येथील एका औद्योगिक आस्थापनात नोकरीसाठी मुलाखत द्यायला आले होते, अशी माहिती ... Read More »

एसओपीसंबंधी विरोधकांनी अज्ञान प्रकट करू नये ः आरोग्यमंत्री राणे

परराज्यातून येणार्‍या प्रवाशांसाठीच्या ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरच्या (एसओपी) प्रश्‍नावरून राज्य सरकारवर टीका व आरोप करणार्‍या विरोधकांचा काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. ‘एसओपी’ हे तज्ज्ञ लोक तयार करीत असतात व आम्हीही या ‘एनओपी’संबंधी वेळोवेळी सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करूनच योग्य निर्णय घेत असतो. त्यामुळे एसओपीसंबंधी विरोधकांनी वायफळ बडबड करून आपले अज्ञान प्रकट करू नये, असा सल्ला राणे ... Read More »

आर्थिक व्यवहारांना गती देणार ः सावंत

>> आर्थिक पुनरुज्जीवन समितीचा अहवाल स्वीकृत कर्नाटक सरकारने म्हादई नदीवरील कळसा, भांडुरा प्रकल्पासाठी नवीन डीपीआर तयार केलेला आहे. म्हादईचा प्रश्‍नाकडे गंभीरपणे लक्ष दिले जात आहे. केंद्र सरकारकडे म्हादईच्या रक्षणाबाबत पाठपुरावा सुरूच ठेवला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी म्हादईबाबतच्या एका प्रश्‍नावर बोलताना दिली. राज्यातील आर्थिक पुनरुज्जीवनाला पुन्हा बळकटी देण्यासाठी नियुक्त केलेल्या आर्थिक पुनरुज्जीवन समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला असून या ... Read More »

गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या आली ३९ वर

राज्यात कोरोनाचे आणखी ९ रुग्ण बरे झाले असून त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या ३९ वर आली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने काल दिली. राज्यातील कोरोना रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ६७ एवढी झाली आहे. त्यापैकी २८ कोरोना रुग्ण बरे झाले. त्यामुळे सध्या कोरोना रुग्णांची संख्या ३९ एवढी झाली आहे. राज्यात सुरुवातीला कोरोना विषाणूची बाधा झालेले ७ रुग्ण बरे झाले. त्यानंतर ४० दिवस ... Read More »

तर क्रिकेट होणार कंटाळवाणे

>> थुंकीचा वापर न करण्यावर मिचेल स्टार्कचे वक्तव्य थुंकी किंवा लाळेचा वापर चेंडूला लकाकी आणण्यासाठी करण्यावर घातलेल्या बंदीमुळे क्रिकेट ‘कंटाळवाणे’ होईल, अशी भिती ऑस्ट्रेलियाचा डावखुरा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याने काल मंगळवारी व्यक्त केली. या बंदीमुळे युवा खेळाडू वेगवान गोलंदाज होण्यास धजावणार नाहीत, असे स्टार्कला वाटते. बंदीमुळे क्रिकेट या खेळाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. चेंडूद्वारे स्विंग प्राप्त करण्यासाठी थुंकीचा वापर ... Read More »

अतिरिक्त रिव्ह्यूची शिफारस

  स्थानिक पंचांच्या अनुभव कमतरतेमुळे अतिरिक्त रिव्ह्यूची शिफारस आयसीसीच्या क्रिकेट समितीने केल्याचे या समितीचा अध्यक्ष असलेला भारताचा माजी कसोटीपटू अनिल कुंबळे याने काल मंगळवारी सांगितले. कोरोना विषाणूंचा धोका कमी झाल्यानंतर सुरु होणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आयसीसीने कडक नियमावली घालून दिली आहे. देशांतर्गत व आंतरदेशीय प्रवासावरील मर्यादेमुळे स्थानिक पंचांचा अधिकाधिक वापर करावा, असेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पंचगिरीचा दर्जा खालावण्याची शक्यता ... Read More »

रोहित टी-२०त द्विशतक नोंदवू शकतो ः ब्राव्हो

  भारताचा विस्फोटक सलामीवर रोहित शर्मा टी-२०मध्ये द्विशतक नोंदवू शकतो अशी शक्यता वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्‌वेन ब्राव्होने व्यक्त केली. टी-२०मध्ये आत्तापर्यंत एकाही खेळाडूला शतकी कामगिरी करता आलेली नाही आहे. परंतु अशी कामगिरी होऊ शकते आणि ती करण्याची क्षमता भारताच्या रोहितकडे असल्याचे ब्राव्होने ईएसपीएन क्रिकइन्फोच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. खरे पहिल्यास टीम इंडियाचा विस्फोटक सलामीवर असलेला रोहित शर्मा हा मर्यादित ... Read More »

सकारात्मकतेने योगसाधना करा

– डॉ. सिताकांत घाणेकर वरचेवर वाचणे, ऐकणे, बघणे नाही तर त्यातील वक्तव्ये लक्षपूर्वक ऐकली पाहिजेत. आणि गीता कशी विसरू शकू? ते गीत तर जीवनाचे तत्त्वज्ञानच आहे. मानवी जीवनाचे सर्व पैलूंनी यथार्थ दर्शन तिथे आहे. गरज आहे ती अभ्यास करण्याची इच्छा, श्रद्धा, निष्ठा…. जवळजवळ दोन महिने झाले, कोरोनाचा धुमाकूळ विश्‍वांत चालूच आहे. काही ठिकाणी रोगी कमी झाले तर काही ठिकाणी वाढले. ... Read More »