Daily Archives: May 26, 2020

कारवाई व्हावीच!

  पोर्तुगीज गोवा सोडून निघून गेले त्याला जवळजवळ सहा दशके लोटली, तरी देखील अजूनही त्यांच्या नावाने गळा काढणारी प्रवृत्ती गोव्यामध्ये आहे. अधूनमधून संधी मिळाली की जमिनीत स्वतःला पुरून घेतलेल्या गांडुळाने काढावे तशी ती डोके वर काढीत असते. कधी गोव्यात आलेले सांग्रीस जहाज, कधी लुसोफोनिया स्पर्धा, कधी विश्वचषक फुटबॉल, कधी फौंतेइन्यश महोत्सव असे एखादे निमित्त साधून ही मंडळी हळूच डोके वर ... Read More »

विदेशातून येणार्‍यांच्या क्वॉरंटाईन कालावधीत घट

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार (एसओपी) विदेशातून येणारे खलाशी आणि अडकलेल्या प्रवाशांच्या क्वारंटाईऩ नियमांमध्ये बदल करण्यात आला असून सरकारी क्वारंटाईऩ आणि होम क्वारंटाईनचा कालावधी प्रत्येकी १४ दिवसांवरून प्रत्येकी ७ दिवसांवर आणण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. राज्यात रस्ता मार्गाने प्रवेश करणार्‍या प्रवाशांसाठी नवीन नियमावलीची अंमलबजावणी मंगळवारपासून केली जाणार आहे. नवीन नियमावलीची ... Read More »

एका नवीन रुग्णामुळे गोव्यातील कोरोना रुग्णसंख्या ४८ वर

राज्यात कोरोना विषाणू बाधित आणखी १ रुग्ण काल आढळून आला. राज्यातील कोरोना बाधित (ऍक्टीव्ह) रुग्णांची संख्या ४८ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान काल विमानाने गोव्यात आलेल्या २६ जणांनी कोविड चाचणी केली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. राज्यात रस्ता मार्गाने आलेल्या एकाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे चाचणीत आढळून आले आहे. नव्याने ... Read More »

दाबोळीवर उतरले ९९ प्रवासी

>> १५ पैकी १३ विमाने झाली रद्द दाबोळी विमानतळ सेवा कालपासून तीन विमानानी सुरुवात झाली. मुंबई, हैदराबाद, म्हैसूर विमानतळ सेवा सुरू न झाल्याने काल यावयाची १५ पैकी १३ विमाने रद्द करण्यात आली. काल बेंगलोर – दिल्ली – बंगलोर येथून तीन विमानातून एकूण ९९ प्रवासी आले तर त्याच प्रत्येक विमानातून १०० हून अधिक प्रवासी गोव्यातून रवाना झाले. दुपारी १.३० वाजता बेंगलोर, ... Read More »

‘त्या’ प्रश्‍नी लवकरच कारवाई शक्य

>> शालांत मंडळाध्यक्ष सामंत यांची स्पष्टोक्ती दहावी इयत्तेच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेतील वादग्रस्त ठरलेल्या प्रश्‍नासंबंधी सखोल चौकशी केली जाणार असल्याचे काल गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी स्पष्ट केेले. कुणावरही एका दिवसात कारवाई होऊ शकत नाही. आम्हाला चौकशी करण्यास वेळ हवा आहे. शालांत मंडळाच्या अधिकार्‍यांशी मी सध्या याप्रकरणी चर्चा सुरु केलेली आहे. त्यांचे यासंबंधी काय म्हणणे आहे ते मी ... Read More »

देशांतर्गत विमान सेवेस प्रारंभ; मात्र अनेक उड्डाणे झाली रद्द

तब्बल दोन महिन्यांच्या खंडानंतर देशांतर्गत प्रवासी विमानसेवेस काल प्रारंभ झाला. मात्र देशाच्या विविध भागातील विमानांची उड्डाणे रद्द झाल्याने संबंधित विमानसेवेसाठी तिकिटांचे आरक्षण केलेल्या शेकडो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विमानतळ अधिकार्‍यांच्या माहितीनुसार दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ८० विमानांची उड्डाणे रद्द झाली त्याआधी प. बंगाल, महाराष्ट्र व चेन्नईसह सर्व विमानतळांवरील उड्डाणांचे वेळापत्रक प्रसिध्द झाले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक उड्डाणे रद्द करण्यात ... Read More »

यूएईहून पहिले आंतरराष्ट्रीय

विमान ‘दाबोळी’वर १ जूनला१ जूनपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत असून या दिवशी संयुक्त अरब अमिरातहून (युएई) पहिले आंतरराष्ट्रीय विमान दाबोळी विमानतळावर उतरणार असल्याचे अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. ज्या देशांत लॉकडाऊनमुळे गोमंतकीय नागरिक अडकून पडलेले आहेत त्यांना राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वीच दर्यावर्दींसह विविध देशांत काम करणार्‍या कित्येक गोमंतकीयांना सुखरुप राज्यात परत ... Read More »

प्रश्‍नपत्रिकेत असे प्रश्‍न विचारणे गैर : नाडकर्णी

  शालांत परीक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे प्रश्‍न विचारले जावेत याचे काही संकेत आहेत. धार्मिक, वांशिक, जातीय किंवा राजकीय स्वरुपाचे प्रश्‍न विचारले जाऊ नयेत असे दंडक सर्वसाधारणपणे पाळले जातात. त्यामुळे दहावीच्या प्रश्‍नपत्रिकेत ज्या प्रकारे यंदा प्रश्‍न विचारला गेला ते गैर असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व गोवा बोर्डाचे माजी अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी यांनी ‘नवप्रभा’ला दिली. अशा प्रकारचे आक्षेपार्ह प्रश्‍न विचारल्याबद्दल शालांत परीक्षा ... Read More »

राय येथे मजुराचा खून

वैयक्तिक वैमनस्यातून कोल्यांडोंगर- राय येथे रविवारी रात्रौ झारखंड येथील मुकेश गजेंस सिंग याचा विवेक देवसिंग याने कुर्‍हाडीने डोक्यावर प्रहार करून खून केला. मायणा कुडतरी पोलिसांनी विवेक देवसिंग याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबूली दिली. मुकेश व विवेक हे झारखंडमधील असून गेल्या दीड महिन्यांपासून राय येथील एका घरांत भाड्याने खोली घेवून रहात होते. मुकेश विवेकला नेहमी बसून खातो, काम करीत नाही ... Read More »

कोविड-१९ भाग – १

–  डॉ. स्वाती हे. अणवेकर, (म्हापसा) अन्य देशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तीने अथवा अशा व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या स्थानिक व्यक्तीने देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून आरोग्य खात्याला ही माहिती नीट पुरवल्यास त्या व्यक्ती अन्य कोणकोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आल्या होत्या हे कळले व त्यांना विलगीकरणात ठेवले तर त्याचा पुढे होणारा प्रसार नक्कीच टाळता येऊ शकतो. ह्यापूर्वी आपण कोरोना संदर्भात एक लेख आधीच पाहिला ... Read More »