Daily Archives: May 25, 2020

ऐच्छिक एसओपी घातक!

  राजधानी एक्स्प्रेसमधून आलेले तब्बल अकरा जण कोरोनाबाधित आढळल्याने गोव्याची सध्याची रुग्णसंख्या एका फटक्यात अर्धशतकाच्या दिशेने झेपावली. ‘राजधानी’ गोव्यात थांबणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले असूनही तिने मडगावात एकाच दिवशी तब्बल तीनशे प्रवासी उतरवले तेव्हाच आम्ही जी भीती व्यक्त केली होती, ती शब्दशः खरी ठरली आहे. एकाच दिवशी ११ रुग्ण सापडणे ही गोव्याच्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची नांदीच ... Read More »

शिथिल निर्बंधांमुळे गोव्यावर कोरोनाचे सावट

>> येणार्‍या प्रवाशांसाठी तीन पर्याय : तपासणीनंतर प्रवेशासाठी सरकारी यंत्रणा सज्ज : मुख्यमंत्री राज्यात विमान, रेल्वे, रस्ता आदी मार्गाने येणार्‍या प्रवाशांना आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र, सशुल्क कोविड चाचणीनंतर होम क्वारंटाईऩ किंवा वैयक्तिक घोषणापत्रासह १४ दिवस होम क्वारंटाईनची सक्ती असे तीन पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहेत. राज्यात विविध मार्गातून सुमारे ४ हजार प्रवासी सोमवारी दाखल होण्याची शक्यता आहे. या ... Read More »

राज्यात नवीन ११ कोरोना रुग्णांची भर

  राज्यात काल कोरोना विषाणूबाधित नवीन ११ रुग्ण आढळून आले असून ३ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना (ऍक्टीव्ह) रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. अशी माहिती आरोग्य खात्याने काल दिली. शनिवारी नवी दिल्लीहून राजधानी एक्सप्रेसमधून आलेल्या ११ प्रवाशांना कोरोना बाधा झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. ११ प्रवाशांमध्ये ७ महिला, ४ पुरुषांचा समावेश असून त्यात एका ५ वर्षाच्या ... Read More »

देशी विमानसेवा आजपासून

  सुमारे दोन महिन्यांच्या खंडानंतर देशातील विमान सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. मात्र विविध राज्यांच्या स्वत:च्या या संदर्भातील नियम-अटींमुळे या संदर्भात काही प्रमाणात गोंधळयुक्त वातावरण आहे. विशेषत: मोठ्या प्रमाणातील कोरोना रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्र, प. बंगाल व तामिळनाडू या राज्यांनी तूर्त विमानसेवा सुरू करण्यास विरोध जाहीर केल्याने गोंधळ असल्याची चर्चा आहे. विमान सेवा सुरू करण्यास काही राज्यांनी विरोध दर्शविल्याने विमान ... Read More »

परप्रांतीय प्रवाशांसाठी एसओपीत शिथिलता आणण्याचे कारण काय?

  >> पर्यटकांना पायघड्या, गोमंतकीयांना शुल्क : सरदेसाई परराज्यातून गोव्यात येणार्‍या प्रवाशांमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळू लागलेले असताना ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ आणखी कडक करायचे सोडून त्यात शिथिलता आणल्याबद्दल काल गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई यानी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच सोमवारपर्यंत (आज) ही शिथीलता जर मागे घेण्यात आली नाही तर आम्ही गप्प बसणार नाहीत असा ... Read More »

प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाला आला राजकीय रंग!

  गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेतील एक प्रश्‍न वादाचा विषय बनला आहे. इंग्रजीच्या प्रश्‍नपत्रिकेतील वादाचा विषय बनलेला हा प्रश्‍न दोन मुलांमधील संवादावर आधारित आहे. तू भविष्यासाठी कोणते नियोजन केले आहे, असा प्रश्‍न युवक आपल्या मित्राला करतो. गोव्यात नोकरीच्या कमी संधी उपलब्ध असल्याने आपण पोर्तुगीज पासपोर्टसाठी अर्ज केला आहे, असे उत्तर मित्राकडून दिले जाते. ... Read More »

मुंबई कसोटी, कोची वनडे होती फिक्स!

>> बुकी संजीव चावलावर नवीन आरोपपत्र दाखल क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणारा बुकी संजीव चावला याच्यावर दिल्ली पोलिसांनी नवीन आरोपपत्र दाखल केले आहे. तपासणी दरम्यान नोंदविलेल्या साक्षीदारांच्या विधानांच्या आधारे, जप्त केलेल्या ध्वनिचित्रफित व चित्रफितींद्वारे प्राप्त आरोपींमधील संभाषण, सीएफएसएल अहवाल आणि इतर माहितीपट व तोंडी पुराव्यांच्या आधारे २००० साली मुंबईत झालेला द. आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना तसेच कोची येथे झालेला पहिला एकदिवसीय सामना ‘फिक्स’ ... Read More »

शार्दुलचा सराव;बीसीसीआय नाराज

भारताचा मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूर याने लॉकडाऊन ४.० मध्ये थोडीशी सूट मिळाल्यानंतर मैदानावर जात गोलंदाजीचा सराव केला खरा परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याच कारणास्तव त्याच्यावर नाराज झाले आहे. परवानगी न घेता शार्दुलने शनिवारी पालघर डहाणू तालुका जिल्हा क्रीडा संघटनेच्या मैदानावर सराव केला. भारतात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनमध्ये आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर आणि कठोर मार्गदर्शक ... Read More »

प्रतिभासंपन्न साहित्यिक ः रत्नाकर मतकरी

डॉ. सोमनाथ कोमरपंत मराठी नाट्यक्षेत्राला विविध स्वरूपाची आशयसूत्रे देणारा प्रथितयश नाटककार म्हणून मतकरी यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र मुद्रा निर्माण केली होती. मराठी रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांचा नवा मनू निर्माण करण्यात त्यांचा लक्षणीय वाटा होता. विपुल नाटके लिहूनही गुणवत्ता टिकविणे हा त्यांचा गुणविशेष होता. ते खर्‍या अर्थाने नाट्यधर्मी होते. लोकप्रियतेच्या दिंडीत न शिरता, परंपरेचे अंधानुकरण न करता, वास्तवाभिमुख बैठक कायम ठेवून व ... Read More »

कोरोना विषाणूवर लस तयार केली तरच!

–  दत्ता भि. नाईक कोरोनाची हद्दपारी करण्यासाठी सध्यातरी एकच उपाय समोर दिसतो, तो म्हणजे, या विषाणूवर लस शोधून काढणे. देवी, कांजण्या, गोवर व आता पोलिओ यांची जशी हद्दपारी केली तशीच कोरोनाची हद्दपारी करण्यासाठी लस शोधून काढणे हाच एकमेव उपाय सध्यातरी दिसतो. संपूर्ण जगाची ससेहोलपट घडवून आणणारे कोरोना व्हायरसचे महासंकट जवळच्या भविष्यकाळात आटोक्यात येईल असे वाटत नाही. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र ... Read More »