Daily Archives: May 21, 2020

अवास्तव मागण्या

गोमंतकीय दर्यावर्दींच्या ताफ्याचे इटलीहून काल गोव्यात आगमन झाले. आधी गोव्यात येण्यासाठी तरसणारी आणि काहीही करा, पण आम्हाला आमच्या गोव्याला घेऊन चला असे म्हणणारी ही दर्यावर्दी मंडळी आता मात्र आपल्या संघटनेच्या माध्यमातून गोवा सरकारलाच बेटकुळ्या दाखवू लागलेली दिसते. आम्ही विलगीकरणासाठीचे शुल्क भरणार नाही, आमच्यासाठी विलगीकरणाचा काळही कमी करावा असे ते म्हणू लागले आहेत आणि त्यासाठी न्यायालयातही गेले आहेत. दयाभाव ठेवून आपल्यासाठी ... Read More »

इटलीहून खास विमानांनी खलाशी गोव्यात

इटलीमध्ये अडकलेल्या ४१४ गोमंतकीय खलाशांना घेऊन येणार्‍या तीन विशेष चार्टर विमानांपैकी पहिले विशेष चार्टर विमान १६८ जणांना घेऊन काल बुधवारी सकाळी १०.३० वा. तर दुसरे विमान संध्याकाळी पाचच्या दरम्यान १६७ जणांना घेऊन दाखल झाले. एकूण ३३५ गोमंतकीय खलाशी काल गोव्यात दाखल झाले. या खलाशांना गोव्यात आणण्यासाठी मे. कॉस्ता क्रूज कंपनीने विदेशी व्यवहार मंत्रालयामार्फत गृहमंत्रालयाकडे विनंती केली होती. ती विनंती मान्य ... Read More »

उच्च न्यायालयाची दहावीच्या परीक्षेस मान्यता

>> २९ केंद्रे, १७३ उपकेंद्रांवर आजपासून परीक्षेस प्रारंभ मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा शालान्त आणि माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्यातील दहावीच्या गुरुवार २१ मेपासून सुरू होणार्‍या परीक्षेला काल मान्यता दिली आहे. राज्य सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्रालयाने दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यास मान्यता देणार्‍या आदेशाची प्रत गोवा खंडपीठात सादर केल्यानंतर न्यायालयाने दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. केंद्रीय गृह ... Read More »

बारावीचा मराठी पेपर सुरळीत

कोरोना आपत्तीमुळे अंतिम टप्प्यात बंद ठेवण्यात आलेली बारावीची परीक्षा काल पुन्हा सुरू करण्यात आली असता ३ हजार वर विद्यार्थ्यांनी तोंडावर मास्क घालून तसेच सामाजिक अंतर राखीत परीक्षा दिली. अशा प्रकारे सगळ्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करीत ही परीक्षा देणे ही त्यांच्यासाठी एक वेगळीच परीक्षा ठरली. परीक्षागृहात आत प्रवेश करण्यापूर्वी या विद्यार्थ्यांनी सॅनिटायझर्सचा वापर केला. त्यांना तोंडावर मास्कही चढवावे लागले. त्यानंतर सामाजिक ... Read More »

मडगाव कोविड इस्पितळात १७० खाटा

  कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खास आरक्षित करण्यात आलेल्या मडगांव येथील ईएस्‌आय् इस्पितळातील खाटांची संख्या ६० वरून १७० एवढी वाढवण्यात आली असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल सांगितले. रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने खाटांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे राणे म्हणाले. १७० खाटांबरोबरच आणखी ३० खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी वापरता याव्यात यासाठी या अतिरिक्त ३० खाटा आरक्षित ठेवण्यात येणार ... Read More »

खाटांची संख्या २२० पर्यंत वाढवणार ः नीला मोहनन

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मडगाव येथील खास कोविड-१९ इस्पितळामधील खाटांची संख्या २२० पर्यत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रपरिषदेत काल दिली. कोविड इस्पितळामध्ये अतिदक्षता (आयसीयू) विभागात ४० खाटांची सोय आहे. अतिदक्षता विभागात आणखी २० खाटा वाढविण्याची सोय आहे. या इस्पितळामध्ये १६ व्हॅन्टिलेटर उपलब्ध असून जुलै २०२० पर्यंत २०० व्हॅन्टिलेटर उपलब्ध ... Read More »

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४३

राज्यातील कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या ४३ झाली आहे. कोरोना विषाणूची बाधा झालेले नवीन ४ रुग्ण आढळून आले असून कोरोना संशयित ५ रुग्णांना जीएमसीच्या खास विभागात दाखल करण्यात आले आहे. कोरोना आयझोलेेशन वॉर्डात कोरोना संशयित १० जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत २४ तास कोरोना विषाणूच्या नमुन्याची ... Read More »

…तर आयपीएल ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शक्य

>> गायकवाड यांनी दिले संकेत कोरोना महामारीमुळे संपूर्ण क्रीडा जगत स्तब्ध आहे. हळुहळू काही स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये सुरू व्हायला लागल्या आहेत. जर्मनीतील बुंडेस्लिगा फुटबॉल लीग सुरू झालेली आहे. परंतु क्रिकेटबाबत अजून काही स्पष्ट झालेले नाही आहे. ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषकही अनिश्‍चितच्या गर्तेत आहे. त्यामुळे जर हा विश्वचषक झाला नाही तर या दरम्यान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा होऊ शकते असे ... Read More »

आयपीएल २५ सप्टेंबर ते १ नोव्हे.पर्यंत!

  कोरोना महामारीमुळे आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाबाबत संभ्रम आहे. स्पर्धेचे आयोजन न झाल्यास होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी ही स्पर्धा याच वर्षाच्या शेवटाला खेळविता येईल काय याची तपासणीही बीसीसीआयकडून केली जात आहे. बीसीसीआय २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएलच्या तेराव्या पर्वाचे आयोजन करण्याचा विचार करीत असल्याचे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले. जरी बीसीसीआय वरील कालावधीत आयपीएलचे आयोजन करण्यासाठी उत्सुक असले तरी ... Read More »

वॉर्नची गोलंदाजी खेळायला कठीण जायचे

>> विराटने केले स्पष्ट टीम इंडियाचा आक्रमक कर्णधार विराट कोहली हा गोलंदाजांसाठी सध्याच्या काळातील सर्वांत धोकादायक फलंदाज मानला जातो. त्याची गणना वर्तमान काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जात आहे. बर्‍याच गोलंदाजांसाठी तो कर्दनकाळ ठरत असतो. परंतु विराटने मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेगस्पिनर असलेल्या शेन वॉर्नची गोलंदाजी खेळणे त्याला कठीण व्हायचे, असे सुनील छेत्रीबरोबर लाईव्ह चॅट करताना सांगितले. विराटने आयपीएलमध्ये वॉर्नसमोर खेळताना ... Read More »