Daily Archives: May 20, 2020

रुग्ण रोखूया

देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांवर गेली असताना, गोव्यानेही त्यामध्ये आता आपले मोठे योगदान द्यायला प्रारंभ केलेला दिसतो. सोमवार संध्याकाळपर्यंत गोव्यातील सध्याच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ वर पोहोचली होती. काल तीत अधिक भर पडत गेली. यामध्ये सर्वाधिक वाटा आहे तो अर्थातच रेल्वेने गोव्यात आलेल्या मंडळींचा. रेल्वेने आलेले आठजण पहिल्या दिवशी कोरोनाबाधित आढळले. दुसर्‍या दिवशी त्यात आणखी बारा जणांची भर पडली. रेल्वेने ... Read More »

दहावीच्या परीक्षेबाबत आज महत्त्वाची सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेबाबत नव्याने याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर बुधवार २० मे रोजी सकाळी १० वाजता सुनावणी घेतली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला दहावीची परीक्षा घेण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मान्यतेसंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश काल दिला आहे. बारावीचे उर्वरित पेपर आजपासून ... Read More »

इटलीहून खलाशांना घेऊन आज तीन विमाने गोव्यात

इटलीमधून ४४१ खलाशांना घेऊन येणारी खास तीन विमाने बुधवार २० मे २०२० रोजी दाबोळी विमानतळावर दाखल होणार आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी पी. एस. रेड्डी यांनी काल दिली. या तीन विमानांतून येणार्‍या खलाशांची कोविड तपासणी करून त्यांना हॉटेलमध्ये क्वांरटाईन केले जाणार आहे. खलाशांचे क्वारंटाईन शुल्क देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत अडकलेले ६८ गोमंतकीय येत्या २२ मे रोजी ... Read More »

क्वारंटाईन शुल्क आकारणीबाबत सीमॅन असोसिएशनची याचिका

येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गोवन सीमॅन असोसिएशन ऑफ इंडियाने एक याचिका दाखल करून सरकारच्या खलाशांकडून क्वारंटाईन शुल्क आकारण्याचा निर्णयाला आव्हान दिले आहे. न्यायालयाने सरकारला नोटीस जारी केली असून या याचिकेवर बुधवार २० मे रोजी सुनावणी होणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात परतणार्‍या गोमंतकीय खलाशांना क्वांरटाईन करण्यासाठी शुल्क आकारले जात आहे. गोमंतकीय खलाशांकडून थेट शुल्क आकारले जात नाही. तर, ... Read More »

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ३९

>> काल नवीन ८ संशयित राज्यातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या ३९ झाली असून नवीन ८ कोरोनाबाधित रुग्ण काल आढळून आले आहेत. इस्पितळातील आयझोलेशन विभागात कोरोना संशयित ६ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याने जारी केलेल्या दैनंदिन अहवालात दिली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड प्रयोगशाळेत ३३२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३१६ नमुने निगेटिव्ह आणि ८ नमुने पॉझिटीव ... Read More »

केरळच्या आरोग्यमंत्र्यांचे ‘ते’ वक्तव्य चुकीचे ः मुख्यमंत्री

  केरळच्या आरोग्यमंत्री श्रीमती के. के. शैलजा यांनी एका मुलाखतीमध्ये गोव्यातील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा केरळमध्ये झालेल्या मृत्यूबाबत केलेले वक्तव्य चुकीचे व दिशाभूल करणारे आहे, असा खुलासा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केला. केरळच्या आरोग्यमंत्री श्रीमती शैलजा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केरळमध्ये गोव्यातील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची माहिती देताना गोवा प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, ... Read More »

कामगारांकडून मडगावात पोलिसांवर दगडफेक

दीड लाख स्थलांतरीत कामगार अजूनही गोव्यात अडकून पडलेले असून नोकरी नाही, अन्न नाही आणि अशातच सामाजिक विलगीकरणात रहावे लागत असल्याने हे कामगार आता हिंसक बनू लागलेले असून कामगारांनी रागाच्या भरात रावणफोंड-मडगाव येथे पोलिसांवर दगडफेक करण्याची घटना घडली. या घटनेविषयी समाजमाध्यमावरून दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आतापर्यंत केवळ १० हजार स्थलांतरीत कामगारांनाच त्यांच्या गावात पाठवून देण्यास राज्य सरकारला यश ... Read More »

विराटने दिले रघूला श्रेय!

>> त्याच्या’मुळेच वेगवान गोलंदाजीविरुद्धची फलंदाजी सुधारली भारतीय खेळाडू जलदगती गोलंदाजांसमोर निर्धास्तपणे खेळण्याचे सारे श्रेय रघू याला जाते, असे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने सांगत पडद्यामागील कलाकाराचे नाव उघड केले. ‘थ्रो डाऊन स्पेशलिस्ट’ डी. राघवेंद्र हा ‘साईडआर्म’च्या साहाय्याने ताशी १५०-१५५ किलोमीटर वेगाने नेट्‌समध्ये चेंडू टाकत असल्याचा प्रचंड फायदा संघातील सर्व फलंदाजांना झाल्याचे कोहलीने सांगत रघू याचे तोंडभरून कौतुक केले. बांगलादेशचा ... Read More »

वेळेनुसार इंग्रजीही शिकेन ः बाबर

पाकिस्तानचा माजी खेळाडू तन्वीर अहमद याने पाकिस्तान वनडे व टी-ट्वेंटी संघाचा नवनियुक्त कर्णधार बाबर आझम याला काही दिवसांपूर्वीच इंग्रजी शिकण्याचा सल्ला दिला होता. तन्वीरच्या या सल्ल्यानंतर बाबरने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी एक क्रिकेटपटू आहे. माझे काम म्हणजे क्रिकेट खेळणे. मी इंग्रजी भाषा जाणणारा एक ‘गोरा’ नाही. होय, मी त्यावर काम करत आहे. परंतु, आपण अशा गोष्टी वेळेसह शिकतो. आपण ... Read More »

खोकला(कास)

–  डॉ. सुरज स. पाटलेकर (श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) खोकला येणे हे जरी स्वाभाविक असले तरीही काळजी मात्र नेहमीच घेतली गेली पाहिजे. खोकला हा एखाद्या आजाराचे लक्षण असू शकतो किंवा एक स्वतंत्रपणे व्याधीही असू शकतो. कोरोना/कोविड-१९ ह्या महामारीमध्येसुद्धा खोकला येणे हे त्यातील प्रमुख लक्षणांमधील एक आहे. खोकला हा शरीराच्या व्याधिप्रतिकारशक्तिमुळेही असू शकतो. जी गोष्ट शरीरासाठी हानीकारक आहे अशा गोष्टीचा शरीरामध्ये प्रवेश ... Read More »