Daily Archives: May 19, 2020

चुका सुधारण्याची वेळ

तिसर्‍या टप्प्यातील प्रदीर्घ लॉकडाऊनअंती देशाचे दळणवळण पुन्हा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न पूर्णतः अंगलट आला आहे. आजवर केवळ महानगरांमध्येच मोठ्या संख्येने दिसणारे कोरोना रुग्ण आता देशाच्या अन्य प्रांतांत आणि ग्रामीण भागांमध्येही वाढू लागले आहेत. स्थलांतरित मजुरांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘श्रमिक एक्सप्रेस’ रेलगाड्या, प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या पंचवीस ‘राजधानी’ व इतर रेलगाड्या यातून झुंडीच्या झुंडी देशाच्या विविध भागांत विखुरल्या गेल्याने ... Read More »

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३५ वर

 >> मुख्यमंत्री ः दहावीची परीक्षा वेळापत्रकानुसारच >> राजधानी एक्स्प्रेस या आठवड्यात स्थगित राज्यातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या ३५ वर पोहोचली असून काल १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधितांमध्ये ३१ गोमंतकीय आणि ४ परराज्यातील नागरिकांचा समावेश आहे. नवी दिल्लीतून आलेल्या दोन राजधानी एक्सप्रेसमधून आत्तापर्यंत २० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे राजधानी एक्सप्रेस चालू आठवड्यासाठी स्थगित ठेवण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री ... Read More »

परीक्षेचा धोका पत्करू नका ः कामत

राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने दहावीची परीक्षा घेऊन धोका पत्करू नये. तर, दहावीची परीक्षा रद्द करून शिक्षण तज्ज्ञांच्या सल्ल्याने परीक्षेला योग्य पर्याय शोधून काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत काल केली. यावेळी मगोपचे ज्येष्ठ नेते, आमदार सुदिन ढवळीकर, कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांची उपस्थिती होती. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये विद्यालये सुरू करण्यास बंदी घालण्यात ... Read More »

बंगाल, ओरिसातील कामगारांना दोन रेल्वेंची गरज ः लोबो

लॉकडाऊनमुळे राज्यातील किनारी भागात अडकून पडलेल्या पश्‍चिम बंगाल, ओरिसामधील कामगारांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी दोन खास रेल्वेगाड्यांची गरज असून हॉटेल व्यावसायिकांकडून रेल्वे तिकिटांच्या रक्कमेचा भरणा केला जाणार आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ई मेलद्वारे पत्र पाठवून रेल्वेतून येणार्‍या कामगारांना प्रवेश देण्याची विनंती केली जाणार आहे, अशी माहिती बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. उत्तर गोव्यातील ... Read More »

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी (८१) यांचे रविवार दि. १७ मे रोजी रात्री निधन झाले. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात तपासणीसाठी ते दाखल झाले होते. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती सकारात्मक आली. त्यामुळे तेथून त्यांना उपचारांसाठी सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच ... Read More »

मोर्तझाच्या निवृत्तीची हीच योग्य वेळ ः गिब्सन

  बांगलादेश क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी मश्रफी मोर्तझाने निवृत्ती स्वीकारण्याची ही योग्य वेळ असल्याचे काल सोमवारी म्हटले. ३६ वर्षीय मोर्तझाला २०२३ साली होणार्‍या संघात कोणतीही भूमिका नसल्याचे संकेत त्यांनी आपल्या वक्तव्याद्वारे दिले. मागील वर्षी झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेत मोर्तझा याला ८ सामने खेळून केवळ एक बळी घेता आला होता. वेळोवेळी त्याला निवृत्तीबद्दलचे प्रश्‍न विचारण्यात आले. परंतु, प्रत्येकवेळी त्याने ... Read More »

गावसकरांच्या संघात पाकिस्तानीच अधिक

  भारतीय संघाचे माजी सलामीवीर सुनील गावसकर यांनी भारत व पाकिस्तानी खेळाडूंचा संयुक्त संघ निवडला आहे. या संघात त्यांनी सध्या सक्रीय असलेल्या एकाही खेळाडूचा समावेश केलेला नाही. गावसकर यांच्या संघात भारताच्या पाच व पाकिस्तानच्या सहा खेळाडूंचा समावेश आहे. निवडलेला संघ हा कसोटी, वनडे किंवा टी-ट्वेंटीचा आहे हे गावसकर यांनी स्पष्ट केलेले नाही. गावसकरांच्या संघात अनेक आश्‍चर्यकारक नावांचा समावेश आहे. गावसकर ... Read More »