Daily Archives: May 18, 2020

विकतचे श्राद्ध

गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता लंका जाळायला गेलेल्या मारुतीच्या शेपटीप्रमाणे बघता बघता वाढू लागली आहे. विशेष म्हणजे हे नव्याने आढळणारे सर्वच्या सर्व रुग्ण गोव्याबाहेरून आलेले आहेत. यातील कोणी रस्तामार्गे आले, कोणी मालवाहतुकीच्या गाड्या घेऊन आले, कोणी सरकारने दर्यावर्दींसाठी पाठवलेल्या बसगाडीतून आले, कोणी केंद्र सरकारने सुरू केलेल्या रेल्वेने आले, परंतु हे सगळे म्हणजे गोव्यासाठी ‘विकतचे श्राद्ध’ आहे. सरकार आणखी शेकडो गोमंतकीय ... Read More »

कोरोनाचे आणखी ९ रुग्ण, लॉकडाऊन ३१ पर्यंत

>> मुख्यमंत्र्यांची माहिती, एकूण रुग्ण संख्या २९ >> परीक्षा निश्‍चित वेळापत्रकानुसार राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी ९ रुग्ण रविवारी आढळून आले असून कोरोना बाधित ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या २२ झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २९ झाली असून त्यातील ७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्यात कोरोना विषाणूचा सामाजिक फैलाव झालेला ... Read More »

रोज दोन हजारांची चाचणी शक्य

>> चाचणी सुविधांत वाढ : आरोग्यमंत्री राज्याच्या सील केलेल्या सीमा खुल्या करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर परराज्यांतून गोव्यात येणार्‍या कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा गेल्या दोन-तीन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य खात्याने कोरोना चाचणीसाठीच्या सुविधांतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रॅपिड चाचणीसाठी आणखी पाच नवी ट्रुनेट मशिन राज्यभरात बनवण्यात येणार असून म्हापसा व मडगाव येथील जिल्हा इस्पितळात प्रत्येकी एक तसेच ... Read More »

राज्यामध्ये प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची कोविड तपासणी

राज्य कार्यकारी समितीने राज्यातील वाढत्या कोरोना विषाणू बांधीत रुग्णांच्या संख्येमुळे राज्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येक व्यक्तीची कोविड तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बैठक मुख्य सचिव परिमल राय यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत कोविड १९ चाचणीसाठी २ हजार रूपये शुल्क आकारण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. रेल्वे व इतर अधिकारिणींना प्रवाशांच्या कोविड तपासणीसाठी २ हजार रुपये शुल्क आकारणी करण्यात येण्याबाबत ... Read More »

कालापूर चार खांबांजवळ अपघात, एक ठार २ जखमी

मळा पणजी येथून कालापूरला जाणार्‍या मार्गावरील चार खांबांजवळ एका भरधाव कारगाडीने संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिल्याने चार चाकी वाहनातील अमर मायानाथ (२४) मेरशी येथील व्यक्तीचे जागीच निधन झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचार्थ बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहेत. Read More »

मनरेगाखाली ४० हजार कोटींची तरतूद

>> केंद्रीय अर्थमंत्री, ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेतील आर्थिक घोषणा ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल प्रोत्साहन पॅकेजच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील आर्थिक घोषणा केल्या. यात मनरेगा, आरोग्य, शिक्षण, उद्योग, केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम या प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजबद्दलची माहिती केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी ... Read More »

देशात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढला

देशातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज सोमवारपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होईल. काल दि. १७ रोजी लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच देशाला संबोधित करताना लॉकडाऊन वाढवणार असून त्या संबंधी १७ मे रोजी माहिती दिली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार काल घोषणा करण्यात आली असून देशात ३१ मेपर्यंत लॉकडाउन ... Read More »

पाक मागतोय काश्मीररुपी भीक

>> गौतम गंभीरने आफ्रिदीला सुनावले ‘आफ्रिदी, इम्रान, बाजवा यांच्यासारखे जोकर्स फक्त भारत व पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात गरळ ओकून पाकिस्तानच्या जनतेला मूर्ख बनवू शकतात. पण त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत काश्मीर मिळणार नाही. बांगलादेश लक्षात आहे का?’ असे विचारत टीम इंडियाचा माजी सलामीवीर व भाजपचा खासदार गौतम गंभीर याने शाहिद आफ्रिदीची खिल्ली उडवली आहे. आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध व्हिडिओ जारी करत अपशब्द ... Read More »

‘अर्जुन’साठी अंकिता, दिविजची शिफारस

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेती अंकिता रैना व दिविज शरण यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी सुचविण्याची किंवा शिफारस करण्याची तयारी अखिल भारतीय टेनिस महासंघाने केली आहे. २७ वर्षीय अंकिताने २०१८ साली आशियाड स्पर्धेत महिला एकेरीचे कांस्यपदक पटकावले होते. तसेच यंदाच्या फेड कप स्पर्धेतही तिने प्रभावी कामगिरी केली होती. तिच्या प्रदर्शनाच्या जोरामुळेच भारताला प्रथमच ‘वर्ल्ड ग्रुप प्ले ऑफ’ साठी पात्रता मिळवणे शक्य झाले ... Read More »

व्हिन्सी प्रीमियर लीग २२ पासून

कॅरेबियन बेटांवरील सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडाईन्स या इवल्याशा देशात २२ ते ३१ मे या कालावधीत व्हिन्सी प्रीमियर लीग टी-टेन फ्रेंचायझी लीग स्पर्धा खेळविली जाणार आहे. ७२ खेळाडूंसह एकूण ६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत दररोज ३ आणि एकूण ३० सामने खेळले जातील. हे सर्व सामने सेंट व्हिन्सेंटमधील आर्नोस वेल स्पोर्टिंग संकुलामध्ये होतील. या स्पर्धेमध्ये नवीन नियमही लागू ... Read More »