Daily Archives: May 17, 2020

शेतीतून स्थैर्याकडे!

डॉ. गौरिष करंजाळकर (सहाय्यक प्राध्यापक, डॉन बॉस्को कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर, सुलकोणी) अलीकडे प्रक्रिया उद्योगांना फार अग्रक्रम दिला जात असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना याची ओळख व्हावी असा शिक्षणसंस्थेचा मानस आहे. हा उपक्रम म्हणजे विद्यार्थिदशेकडून उद्योगजगताच्या पायथ्याकडे जाणारा साकव ठरू शकतो. अशा प्रक्रिया उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढीस लागावा म्हणून हा लेखनप्रपंच…   ‘कृषिपदवी’ हा अभ्यासक्रम आठ सत्रांत विभागून, चार वर्षे असे भारतभर समीकरण ... Read More »

-ः इतिहासाच्या पाऊलखुणा ः- किम जोंग उन यांचे अनुपस्थिती नाट्य

दत्ता भि. नाईक ‘किम जोंग उन बोेले आणि उत्तर कोरिया डोले’ अशी परिस्थिती असताना प्रसिद्धीच्या झोतात असलेले व्यक्तिमत्त्व अचानकपणे दृष्टीआड होणे ही साधी गोष्ट नव्हे, म्हणूनच ते कुठे असावे यासंबंधाने चर्चा सुरू झाली. दि. २२ एप्रिलच्या राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व वर्तमानपत्रांच्या आंतरराष्ट्रीय बातम्या देणार्‍या पानावर एक महत्त्वपूर्ण व लक्ष वेधून घेणारी बातमी छापून आली, ती म्हणजे, उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग ... Read More »

-ः अर्थवेध ः- सामाजिक सुरक्षेच्या तीन अव्वल योजना

शशांक मो. गुळगुळे सरकारने सामाजिक सुरक्षेच्या तीन अव्वल योजना अमलात आणल्या. हातावर पोट भरणारे, असंघटित क्षेत्रात काम करणारे, छोटे-छोटे स्वयंरोजगार करणारे, फिरते विक्रेते, स्थानिक विक्रेते तसेच सर्व प्रकारची मजुरी करणारे, घरकाम करणार्‍या महिला व पुरुष अशांसाठी या तीनही योजना अव्वल आहेत.   केंद्र सरकारतर्फे नुकतेच उद्योगांना चालना देणारे मोठे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले. असे पॅकेज जाहीर होणे गरजेचेच होते, ... Read More »

सानेगुरुजींची खडतर जीवनसाधना

डॉ. सोमनाथ कोमरपंत ही त्यांची व्यापक दृष्टी कुठे आणि आत्मकोशात गुरफटून राहण्याची आजची दृष्टी कुठे? अंतःकरणाची कवाडे सदैव खुली ठेवणार्‍या साने गुरुजींचे स्मरण म्हणूनच प्रेरणादायी वाटते. त्यांनी आपल्या जीवनदृष्टीने आसमंत शुचिष्मंत केला.   भारतीय प्रबोधनयुगातील खडतर कालखंडात तेजस्वी स्त्री-पुरुषांंची मालिका आढळते, त्यांत साने गुरुजींची गणना अग्रक्रमाने केली जाते. महाराष्ट्राच्या ज्ञानपरंपरेतील थोर प्रज्ञावंतांमध्ये समाजमनस्क आणि समर्पणशील वृत्तीचे शिक्षक म्हणून ते ओळखले ... Read More »

माणसांचं जग- ५२ मातीवर प्रेम करणारा चंदूकाका

डॉ. जयंती नायक मायभूमीशी तुटून परगावात उपरं जीवन वाट्याला आल्यामुळं त्यांच्या मनाची झालेली तगमग अतिशय वास्तव रूपात उभी झाली आहे. कविता लिहिण्यासाठी त्यांनी लेखणी जीवनाच्या सांजसमयी हातात घेतली, म्हणूनच त्यांच्या एकुलत्या एक कवितासंग्रहाचं नाव ‘मनसांज’ ठेवण्यात आलं.   चंदूकाकानं या जगाचा निरोप घेतला त्याला आता चार वर्षे होऊन गेली. परंतु मला त्यांची सदैव आठवण येते. आमच्या गावची खूप माणसे-कुटुंबे मुंबईला ... Read More »

-ः बंध रेशमाचे ः- ग्रीष्म-सृष्टीचे वरदान

मीना समुद्र तरीही निसर्ग पुन्हा शुद्ध, निरामय स्वरूपात लाभण्यासाठी; ईश्‍वराने मानवाला दिलेला हा शापकाळ संपुष्टात आणण्यासाठी संयम, स्वच्छता आणि शुद्धाचरण या अग्निसाधनातूनच आपणाला जायला हवे. त्यासाठी या ओजस, तेजस, झळाळत्या ऋतूचे सहाय्य हवेच हवे.   ‘कोरोना’च्या काळात फोन हे एक वरदानच वाटते. घरात बसून चैन पडत नाही, वेळ जात नाही अशांसाठीही आणि कामात असलेल्यांना घडीभर विरंगुळा म्हणूनही. खरं तर एप्रिल-मे ... Read More »

‘गैर’समज

  दत्ताराम प्रभू-साळगावकर शब्द मागे घेता येत नाहीत, ते बाणाप्रमाणे असतात व थेट भिडतात. आवाजाशी असो नाहीतर माणसांशी असो, तुलना ही झालीच झाली. शेवटी त्यानं तिची सर्वांसमक्ष माफी मागितली. वाद संपला पण गैर बोलण्याचं वैर मात्र उरलंच!   अगदी रोजच्या रोज कोणाच्या ना कोणाच्या कसल्यातरी गोष्टी आपल्या कानावर पडत असतात. सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला रस असतोच असं नाही. काही गोष्टी आपण ... Read More »

भारतीय कसोटी क्रिकेटचे नरशार्दुल

   सुधाकर रामचंद्र नाईक १९३२ पासून भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय कसोटी खेळण्यास प्रारंभ केला. उण्यापुर्‍या शतकभराच्या या कालखंडात भारतीय क्रिकेटने हळूहळू जागतिक क्रिकेटमध्ये आपला जम बसविण्यास प्रारंभ केला आणि सध्या भारतीय संघ जागतिक संघांच्या तोडीस तोड, तूल्यबळ बनला आहे.   भारतात क्रिकेट हा धर्म आणि क्रिकेटपटूंना देव मानले जाते. १९३२ पासून भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय कसोटी खेळण्यास प्रारंभ केला. उण्यापुर्‍या ... Read More »