Daily Archives: May 16, 2020

दिल्ली-मडगाव विशेष ट्रेन आज पोचणार

नवी दिल्ली ते मडगाव ही खास रेल्वेगाडी सुमारे ७०० पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन नवी दिल्ली स्थानकावरून शुक्रवारी दुपारी रवाना झाली असून आज शनिवारी मडगावात दाखल होणार आहे. राज्यात मागील दोन दिवसात कोरोनाची बाधा झालेले ८ रुग्ण आढळून आल्याने रेल्वेगाडीतून येणार्‍या प्रवाशांबाबत चिंतेचे वातावरण पसरले आहे. या रेल्वे गाडीतून येणारे ५० टक्के प्रवासी बिगर गोमंतकीय असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी गुरूवारी ... Read More »

‘अम्फान’ चक्रीवादळाचा काही राज्यांना वेधशाळेचा इशारा

  कोरोना महामारीच्या संकटाचा धोका कायम असतानाच आता देशातील काही राज्यांसमोर ‘अम्फान’ या चक्रीवादळाचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. प. बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तशा संकटाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. देशातील आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज दि. १६ रोजी अंदमान-निकोबारसह लक्षद्वीपमध्ये चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. Read More »

काम १२ तास, मात्र पगार ८ तासांचा ः मंत्र्यांकडे तक्रारी

  राज्यातील औद्योगिक कंपनीमध्ये वाढविलेल्या ४ तासांच्या कामाचा कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना दुप्पट पगार दिला पाहिजे, असे स्पष्टीकरण कारखाना व बाष्पक मंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी काल दिली. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांकडून १२ तास काम करून घेतले जात आहे. कामगाराला पगार आठ तासांचा दिला जात आहे, अशा तोंडी तक्रारी आपल्याकडे येत आहेत. याबाबत अजूनपर्यंत लेखी स्वरूपात तक्रार आलेली नाही, असेही मंत्री कवळेकर ... Read More »

कर्नाटकी स्थलांतरितांची नोंदणी सेवा सिंधू ऍपवर सुरू

लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकून पडलेल्या कर्नाटकमधील स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी परत जाणे शक्य व्हावे व त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी गोवा सरकारने त्यांची कर्नाटक सरकारच्या सेवा सिंधू ऍपवर नोंदणी करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामगारांची कर्नाटक सरकारच्या सेवा सिंधू ऍपवर नोंदणी न झाल्याने व हे लोक मूळ कर्नाटकातील असल्याचे गोवा सरकार सिद्ध करू न शकल्याने कर्नाटक सरकारने या कामगारांना ... Read More »

जेमिसन, कॉनवे, पटेलचा समावेश

>> न्यूझीलंडकडून करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर न्यूझीलंड क्रिकेटने २०२०-२१ मोसमासाठी करारबद्ध खेळाडूंची घोषणा काल शुक्रवारी केली. भारताविरुद्धच्या कसोटी व वनडे मालिकेत शानदार प्रदर्शन केलेला अष्टपैलू काईल जेमिसन याला करारबद्ध खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला परंतु, न्यूझीलंडकडून खेळण्यास अजूनपर्यंत पात्र न झालेल्या २८ वर्षीय डेव्होन कॉनवे व डावखुरा फिरकीपटू ऐजाझ पटेल यांचादेखील करारबद्ध खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. ... Read More »

धोनीला पुनरागमन अवघड ः प्रसाद

  भारताचा माजी द्रुतगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने अनुभवी क्रिकेटपटू तथा आपल्या कल्पक नेतृत्वाखाली दोन विश्वचषके जिंकून देणार्‍या महेंद्रसिंह धोनीला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे अत्यंत अवघड जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धोनी सध्या ३८ वर्षांचा झालेला आहे आणि त्याने २०१९च्या विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आहे. या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्याच्या सुमार कामगिरीमुळे बरीच टीका झाली होती. ... Read More »

विराटपेक्षा बाबर सरस ः रशीद

वर्तमान फॉर्मचा विचार केल्यास मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम हा भारताच्या विराट कोहलीपेक्षा नक्कीच सरस आहे, असे इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीद याने काल शुक्रवारी ‘क्रीझ टीव्ही’ शी संवाद साधताना सांगितले. रशीदने आपल्या आवडत्या वर्ल्ड इलेव्हनची घोषणा करताना मात्र बाबर व विराट या दोघांना संघात स्थान दिले आहे. विराट व बाबर यांची तुलना करणे कठीण असून केवळ फॉर्मच्या आधारेच ... Read More »

कार्लसन चेस टूर १९ मे पासून

नॉर्वेचा विश्‍वविजेता खेळाडू मॅग्नस कार्लसन याने २५०,००० मॅग्नस कार्लसन निमंत्रितांच्या ऑनलाईन स्पर्धेच्या घवघवीत यशानंतर ‘मॅग्नस कार्लसन टूर’चा भाग म्हणून अजून चार ऑनलाईन स्पर्धांची घोषणा केली आहे. लिंडोरेस एबे रॅपिड चॅलेंज (१९ मे ते ३ जून, १५०,००० युएस डॉलर्स), ऑनलाईन चेस मास्टर्स (२० जून ते ५ जुलै, १५०,०००), लिजंड्‌स ऑफ चेस (२१ जुलै ते ५ ऑगस्ट, १५०,०००) व टूर फायनल (९ ... Read More »