Daily Archives: May 15, 2020

आता रामभरोसे!

गोव्याने आपली दारे जराशी किलकिली करताच पहिल्याच दिवशी कोरोनाचे सात रुग्ण सापडले. त्यात एका खलाशाचीही भर पडली. गोव्यावर येऊ घातलेल्या महासंकटाची ही जणू नांदी आहे. गोव्यात बाहेरून शेकडो वाहने रोज येऊ लागली आहेत. रेल्वे सुरू झाली आहे. विमानेही सुरू होतील. गोव्यात येऊ पाहणार्‍यांमध्ये केवळ मूळ गोमंतकीयच आहेत असे नाही. गोव्यात नातेवाईक असलेले, सेकंड होम असलेले, लाल विभागांतल्या महानगरांतले धनदांडगे देखील ... Read More »

गोव्यात कोरोनाचे ८ रुग्ण

गोव्यातील कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या काल ८ एवढी झाली आहे. सर्व कोरोनाबाधित रुग्ण परराज्यातून आलेले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा सामाजिक फैलाव तूर्त होऊ शकत नाही. बुधवारी ७ नवीन कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आल्यानंतर गुरूवारी मुंबईतून आलेल्या एका खलाशाची कोविड रॅपीड चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली. असून या खलाशाच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, ... Read More »

पाणी बिल दरवाढ अंमलबजावणी तूर्त स्थगित ठेवणार ः पाऊसकर

सार्वजनिक बांधकाम खात्याने नव्याने जारी केलेल्या पाणी बिल दरवाढीची अंमलबजावणी तूर्त स्थगित ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याने पाणी बिलात दरवाढ जाहीर केल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केल्यानंतर पाणी बिल दरवाढ तूर्त स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी सार्वजनिक बांधकाम खात्यातील विविध कामांबाबत ... Read More »

देशात कोरोनामुळे अडीच हजारांचा मृत्यू

भारतात कोरोनामुळे मरण पावणार्‍यांची संख्या काल २५४९ वर गेली. तर गेल्या २४ तासात नवीन ३७२२ कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ७८ हजार झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. एकूण ७८ हजार कोरोना बाधितांपैकी २६,२३५ जण बरे झाले असून ४९,२१९ जणांवर उपचार चालू आहेत. महाराष्ट्रातील कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या २५ हजारवर गेली असून त्यापैकी ५५४७ जण बरे ... Read More »

दहावी, बारावी परीक्षा ठरल्यानुसारच

>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची स्पष्टोक्ती गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केलेली दहावी आणि बारावीची परीक्षा जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. देशाच्या विविध भागांतून सुमारे ६२०० गोमंतकीयांनी गोव्यात परत येण्यासाठी नोंदणी केली आहे. जहाजांवरील ८२११ गोमंतकीय खलाशी, इतर देशातून ३८४२ गोमंतकीयांनी येण्यासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री ... Read More »

आणखी दोन महिन्यांसाठी स्थलांतरीत मजुरांना सरकारकडून मोफत धान्य

>> ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनाही लवकरच देशातील स्थलांतरित मजुरांना आणखी दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा करण्याची घोषणा काल केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत केली. ज्यांच्याजवळ रेशनकार्ड नाही त्यांनाही धान्य मिळणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. मासिक ५ किलो धान्य त्यांना दिले जाणार आहे. याचा लाभ ८ कोटी स्थलांतरीत मजुरांना होणार असल्याचे सांगण्यात आले. या योजनेवर ३५०० ... Read More »

महाराष्ट्र विधान परिषदेवर उद्धव ठाकरे बिनविरोध

  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य ८ जणांची महाराष्ट्र परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याचे काल जाहीर करण्यात आले. ठाकरे यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे व भाजपचे राजसिंह मोहिते पाटील, गोपिचंद पडळकर, प्रवीण दटके व रमेश कराड यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. काल गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे ५९ वर्षीय ठाकरे आता ... Read More »

आय लीगमधील विदेशींसाठी नवीन नियम

>> ‘एआयएफएफ’च्या कार्यकारी समिती बैठकीत झाला निर्णय अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीने ३ (विदेशी) + १ (आशियाई) हा नियम आयलीग स्पर्धेच्या २०२०-२१ मोसमासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील फुटबॉलचे संचालन करणारी सर्वोच्च संस्था असलेल्या एआयएफएफने सांगितले की, इंडियन सुपर लीगचे आयोजक ‘एफएसडीएल’ हे महासंघासोबत काम करून येत्या दोन महिन्यांत विदेशी खेळाडूंबाबतची अंतिम रुपरेषा निश्‍चित करणार आहे. एएफसी चॅम्पियन्स ... Read More »

धेंपो स्पोटर्‌‌स क्लबची नवीन जर्सी ‘गोवा कोव्हिड वॉरियर्स’ना समर्पित

धेंपो स्पोटर्‌‌स क्लबच्या नवीन जर्सीचे गुरुवारी संध्याकाळी अनावरण करताना धेंपो उद्योगसमुहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो, पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग (आयपीएस), मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे व मुख्य सचिव परिमल राय Read More »

बीसीसीआय करणार बुमराह, धवनची अर्जुन पुरस्कारांसाठी शिफारस

  भारताचा अव्वल तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि डावखुरा सलामीवीर शिखर धवन यांची बीसीसीआय यावर्षीच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. बुमराहने गोल्या ४ वर्षात टीम इंडियासाठी आकर्षक कामगिरी केलेली आहे. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्याने टीम इंडियाला अनेक सामन्यांत विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचललेले आहे. त्यामुळे अर्जुन पुरस्कारासाठी तो एक सर्वांत सक्षम उमेदवार आहे. गेल्या ... Read More »