Daily Archives: May 14, 2020

पहिले पॅकेज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ खाली जाहीर केलेल्या वीस लाख कोटींच्या आर्थिक महापॅकेजचा पहिला अध्याय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल जाहीर केला. त्यामध्ये विविध क्षेत्रांसाठी तब्बल पंधरा घोषणा त्यांनी केल्या. मुख्यतः देशातील एमएसएमई क्षेत्राला म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आणि पर्यायाने त्यांच्या कर्मचार्‍यांनाही डोळ्यांसमोर ठेवून यातील बहुतेक घोषणा करण्यात आलेल्या आहेत. अर्थातच, त्यामुळे जे फायदे या क्षेत्राला मिळतील ... Read More »

गोव्यात ७ कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांचा प्रवेश

>> परप्रांतीय सातही जणांचे प्राथमिक रॅपिड चाचणी अहवाल पॉजिटिव्ह देशपातळीवर कोरोना विषाणूच्याबाबतीत हरित विभागात असलेल्या गोवा राज्यात कोरोना विषाणूचे ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने काल खळबळ उडाली आहे. सातही जणांचा रॅपिड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या सातही जणांच्या चाचणीचा दुसरा अहवाल प्रतीक्षेत आहे. बेतोडा-फोंडा येथील एका कंपनीमध्ये गुजरातमधून ... Read More »

कामाचे तास ८ वरून १२ करण्यास मान्यता

मोप येथे कौशल्य विकास केंद्र मोप येथे एक कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. या केंद्रात मोप आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकर्‍या मिळण्यासाठी जे कौशल्य लागणार आहे त्याचे तेथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विविध उद्योग व कारखान्यात काम करण्याचे तास ८ वरुन १२ असे वाढवता यावेत यासाठी कामगार कायद्यात दुरुस्ती घडवून आणण्यास काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी ... Read More »

डिझेल, पाणी दरवाढ, मद्यावर शुल्कप्रकरणी सरकारवर हल्लाबोल

  कोविडच्या पार्श्‍वभूमीवरील लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता आर्थिक संकटात सापडलेली असून या आर्थिक संकटावर तोडग्याच्या प्रतीक्षेत असताना गोवा सरकारकडून नागरिकांना इंधन, वीज, पाणी बिल दरवाढीची बक्षिशी देण्यात आली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल केली. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई तसेच मगो नेते सुदिन ढवळीकर यांनीही या विषयावर सरकारवर हल्लाबोल केला. लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने इंधन, वीज, पाणी ... Read More »

कंपनी-कामगारांचा तीन महिन्यांचा पीएफ भरणार केंद्र सरकार

  >> प्राप्तिकर भरण्यास ३० नोव्हेंबरची मुदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्वयंपूर्ण भारत अभियानसाठी २० लाख कोटी रु. ची आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर काल केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी त्याविषयी तपशीलवार माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये १५ हजार रु. पेक्षा कमी पगार असलेल्यांचा पीपीएफ पुढील तीन महिने १२-१२ टक्के (कंपनी व कर्मचार्‍यांचा) भाग सरकारच ... Read More »

दिल्लीहून मडगावी रेल्वेने येणार्‍यांची मडगावातच होणार कोरोना चाचणी

  >> चाचणीसाठी परप्रांतीयांना २ हजार रु. ः गोमंतकीयांना निःशुल्क शुक्रवारपासून नवी दिल्लीतून गोव्यात येणारी ‘राजधानी एक्सप्रेस’ ही गाडी फक्त मडगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. या गाडीतून येणार्‍या प्रवाशांची मडगाव येथे कोरोना चाचणी घेण्यात येणार असून त्यानंतर त्यांना १४ दिवस सामाजिक विलगीकरणात रहावे लागणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. ‘राजधानी एक्सप्रेस’ रेल्वेगाडीतून गोव्यात येणार असलेल्या बिगर गोमंतकीयांना कोरोना ... Read More »

हॉटेल, व्यायामशाळा सुरू होणे शक्य ः लोबो

लॉकडाऊन ४ मध्ये राज्यातील लहान हॉटेल, रेस्टॉरंट, गेस्ट हाउस, व्यायामशाळा सुरू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनंतर मान्यता दिली जाऊ शकते, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. लॉकडाऊन ४ येत्या १८ मेपासून सुरू होणार आहे. राज्य हरित विभागात असल्याने लहान हॉटेल, रेस्टॉरंट, गेस्ट हाउस, व्यायाम शाळा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. रोजगार उपलब्ध ... Read More »

सर्फराजची ‘ब’ श्रेणीत अवनती

>> पीसीबीकडून केंद्रीय कराराची घोषणा >> हसन, आमिर, वहाबला वगळले पाकिस्तानचे जलदगती त्रिकुट हसन अली, वहाब रियाझ व मोहम्मद आमिर यांना पाकिस्तान क्रिकेट मंडळाने केंद्रीय करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. माजी कर्णधार सर्फराज अहमद याची ‘अ’ श्रेणीतून ‘ब’ श्रेणीत अवनती करण्यात आली आहे. डावखुरा जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी व कसोटी संघाचा कर्णधार अझर अली यांची ‘ब’ श्रेणीतून ... Read More »

पंचांनाही हवेत सराव सामने ः टॉफेल

  आपल्या सर्वोत्तम पंचगिरीसाठी ओळखले जाणारे आयसीसीच्या एलिट पॅनेलमधील माजी पंच सायमन टॉफेल यांनी आयसीसीकडे एक मागणी केली आहे. क्रिकेटचे नियमित सामने सुरू करण्यापूर्वी पंचांसाठी सराव सामन्यांचे आयोजन करण्याची विनंती त्यांनी एका मुलाखतीत केली आहे. या सामन्यांद्वारे पंचांना आपल्या निर्णयक्षमतेवर काम करण्याची संधी मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. खेळाडू सामन्यांपूर्वी ‘नेट सेशन’मध्ये भाग घेतात. ‘लॉकडाऊन’मधून बाहेर पडल्यानंतर पंचांना त्यांची निर्णय ... Read More »

रैनाला करायचेय पुनरागमन

  टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैना याने भारतीय संघात परतण्याची आशा अजून सोडलेली नाही. ‘इन्स्ट्राग्राम लाईव्ह चॅट’ दरम्यान रैनाने रोहित शर्माशी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. रैना म्हणाला की संघात परत येण्यासाठी मी मेहनत घेत आहे. मी स्वत:मध्ये सुधारणा केली. गुडघा दुखापतीनंतर मी तंदुरुस्तीवर काम करत होतो आणि या प्रक्रियेत मी ‘यो-यो’ चाचणी देखील उत्तीर्ण झालो. मी भारतीय संघात ... Read More »