Daily Archives: May 13, 2020

दक्षता, केवळ दक्षता!

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुन्हा एकदा देशाला संबोधित केले. यापुढील काळातील आपले जीवन कसे असेल आणि ते कसे असावे याचे दिशादिग्दर्शन पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून मुख्यत्वे केले आहे. देशापुढे आज कोरोनाने अनेक आव्हाने उभी केली आहेत. शेतीच्या आघाडीवर नव्या पिकाची लागवड नेहमीप्रमाणे झाली पाहिजे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत लवकरात लवकर पूर्वस्थिती प्राप्त केली गेली पाहिजे, सामाजिक जनजीवनही पूर्वपदावर आले पाहिजे. मुलांचे ... Read More »

‘स्वयंपूर्ण भारत’साठी २० लाख कोटींचे पॅकेज

>> नव्या नियमांसह लॉकडाऊन-४ चीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशाला संबोधित करताना आत्मनिर्भर भारत अभियानसाठी २० लाख कोटी रु. च्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज देशाच्या जीडीपीच्या १० टक्के एवढे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. देशातील लॉकडाऊनचा तिसरा टप्पा येत्या दि. १७ रोजी संपत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी ... Read More »

पार्सेकरांवर खटल्यास सरकारने मान्यता नाकारली

  राज्यातील दुसर्‍या टप्प्यातील ८८ खाण लीजांच्या नूतनीकरण गैरव्यवहार प्रकरणी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांविरोधात कारवाई, खटला दाखल करण्यास राज्य सरकारने मान्यता नाकारली आहे. लोकायुक्तांनी राज्यातील खाण लीज नूतनीकरण गैरव्यवहार प्रकरणी माजी मुख्यमंत्री पार्सेकर, खाण सचिव पवन कुमार सेन आणि खाण संचालक प्रसन्ना आचार्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून आवश्यक कारवाई करण्याची शिफारस केली होती. लोकायुक्तांनी नोव्हेंबर २०१४ ... Read More »

विदेशातून येणार्‍या गोमंतकीयांना ‘दाबोळी’वर उतरवण्याची तयारी

>> मुख्यमंत्री ः पहिले विमान पुढील आठवड्यात शक्य ाबोळी विमानतळावर विदेशातून येणार्‍या गोमंतकीयांना उतरवून घेण्याची तयारी ठेवली आहे. विदेश मंत्रालयाला दाबोळी विमानतळ खुला करण्याची विनंती करण्यात आलेली असून पुढील आठवड्यात विदेशातून गोमंतकीयांना घेऊन येणारे पहिले खास विमान दाबोळी दाखल होऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या फेसबुक पेजवरील प्रश्‍नोत्तरी कार्यक्रमात बोलताना काल दिली. गोव्यात कोरोनाचा रुग्ण आढळून येऊ ... Read More »

दिल्लीहून विशेष रेलगाड्यांचा शुभारंभ

  अखेर भारतीय रेल्वेने जाहीर केल्यानुसार काल विशेष प्रवासी रेलगाड्या येथून सोडण्यात आल्या. एकूण २२९९ प्रवाशांसह दिल्ली रेल स्थानकावरून त्या रवाना झाल्या. प्रथम संध्याकाळी एक रेलगाडी नवी दिल्लीहून दिब्रुगड येथे रवाना झाली व ४.४५ वा. नवी दिल्लीहून बंगळुरू येथे दुसरी ट्रेन सोडण्यात आली. नवी दिल्ली-विलासपूर विशेष ट्रेन १११७ प्रवाशांसह संध्या. ४ वा. सोडण्यात आली. तर ११२२ प्रवाशांसह दिल्ली-दिब्रुगड ट्रेन सोडण्यात ... Read More »

‘त्या’ ६० गोमंतकीय खलाशांची होम क्वॉरंटाईनसाठी पाठवणी

  मारेला डिस्कव्हरी या जहाजावरून विदेशातून गोव्यात आलेल्या ६० गोमंतकीय खलाशांचे १४ दिवसांचे सरकारी क्वारंटाईन पूर्ण झाल्याने त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मारेला या जहाजावरील ६० खलाशांना मुंबई बंदरात उतरवून त्यांची कोविड चाचणी केल्यानंतर गोव्यात प्रवेश देण्यात आला होता. पाटो – पणजी येथील एका हॉटेलमध्ये त्या खलाशांना सरकारी क्वारंटाईनखाली ठेवण्यात आले होते. सरकारी क्वारंटाईन पूर्ण झाल्यानंतर त्या ... Read More »

गोमेकॉत ४ नवीन संशयित कोरोना रुग्ण दाखल

  बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ४ रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहे. जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ४१३ चाचण्या नकारात्मक आहेत. गोमेकॉच्या खास कोरोना विभागात २ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये २ कोरोना संशयितावर उपचार सुरू आहे. आरोग्य खात्याने २९६ जणांना होम क्वारंटाईनखाली आणले आहेत. तर, ३०३ प्रवाशांना ... Read More »

कुंडईतील स्वयंअपघातात युवक जागीच ठार

कुंडई येथील सर्कलजवळील रस्त्यावर दुचाकीवरून पडून कुंडईतील युवक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. अपघात ठार झालेल्या युवकाचे नाव साईश प्रकाश कुंडईकर (वय २१) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साईश प्रकाश कुंडईकर हा जीए-०५ के-२३२७ या क्रमांकाच्या दुचाकीवरून फोंड्याहून कुंडईच्या दिशेने घरी परतत होता. रस्त्यावरील खड्‌ड्याचा अंदाज न आल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याचे डोके रस्त्यावर ... Read More »

झिंगन, बाला देवी यांना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन

बचावपटू संदेश झिंगन आणि महिला संघाची स्टार स्ट्रायकर बाला देवी यांना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन दिले आहे. संदेश आणि बाला यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांची अर्जुन पुरस्कारासाठी नावे पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे एआयएफएफचे सरचिटणीस कुशल दास यांनी काल माहिती देताना सांगितले. बालादेवीने या वर्षाच्या सुरुवातीस स्कॉटिश महिला प्रीमियर लीगच्या रेंजर्स एफसी संघासमवेत १८ महिन्यांचा करार करीत इतिहास ... Read More »

बंगालच्या कुंडूला ‘ब्लिट्‌झ’चे जेतेपद

>> गोमंतकीय खेळाडूंची प्रभावी कामगिरी अखिल भारतीय पहिल्या ऑनलाईन ब्लिट्‌झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पश्‍चिम बंगालच्या कस्तुव कुंडू याने पटकावले. बाणावली चेस क्लब व फातोर्डा पॅरेंट्‌स चेस क्लब यांनी सासष्टी तालुका बुद्धिबळ असोसिएशन व चेस. कॉम यांच्या संलग्नतेखाली ही स्पर्धा आयोजित केली होती. कुंडू याने ९ फेर्‍यांअंती ७.५ गुणांची कमाई केली. तामिळनाडूचा दिनेश राजन दुसर्‍या व प्रणेश एम. तिसर्‍या स्थानी राहिला. ... Read More »