Daily Archives: May 12, 2020

कोरोनासोबतचे जीवन

देशातील कोरोना रुग्णांची संख्या एका बाजूने दिवसागणिक साडे तीन ते चार हजारांनी वाढत असताना, दुसरीकडे सरकारने आपली कोरोनाविषयक रणनीती बदलण्याचा विचार चालवल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पाचव्यांदा विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, त्या चर्चेचा मुख्य भर अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर होता, परंतु त्या आधीच केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेले विलगीकरणाबाबतचे नवे शिथील दिशानिर्देश, आरोग्य खात्याने कोरोना रुग्णांच्या चाचण्यांसंदर्भात ... Read More »

अर्थव्यवस्थेला उभारीसाठी पंतप्रधानांना विनंती

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गोव्यातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी खनिज उद्योग आणि पर्यटन व्यवसायाला चालना देण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीनंतर बोलताना काल दिली. लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यताही सावंत यांनी व्यक्त केली. या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या वेळी आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे, मुख्य सचिव परिमल राय, ... Read More »

संजीवनी कारखाना सुरू करावा : सुदिन ढवळीकर

  गोवा सरकारने २०२०-२१ या वर्षी ५ कोटी रु. खर्चून संजीवनी साखर कारखाना चालू करावा अशी मागणी मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल एका पत्रकाद्वारे केली आहे. संजीवनी साखर कारखाना बंद करण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोवा बागायतदारचे चेअरमन ऍड. नरेंद्र सावईकर व भाजपच्या गाभा समितीच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन कारखान्याबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याबद्दल ढवळीकर यांनी ... Read More »

स्थलांतरीत कामगारांसाठी रोज धावणार १०० श्रमिक रेलगाड्या

>> रेल मंत्रालयाने अधिकार्‍यांबरोबर घेतला आढावा लॉकडाऊनमुळे विविध राज्यांत अडकून पडलेल्या व विनाविलंब आपल्या घरी जाण्यास इच्छुक असलेल्या स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या गावी नेऊन सोडण्यासाठी देशभरात रोज १०० विशेष श्रमिक रेल्वेगाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वेमधील सूत्रांनी काल दिली. केंद्रीय गृह व्यवहार मंत्री व रेल्वे मंत्रालयाने काल गोव्यातील नोडल अधिकार्‍यांसह विविध राज्यांतील नोडल अधिकार्‍यांबरोबर या प्रश्‍नी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी विशेष ... Read More »

उद्या व शुक्रवारपासून गोव्यातून विशेष ट्रेन्स

भारतीय रेल्वेमार्फत १२ मेपासून सुरू करणात येणार्‍या खास रेल्वे गाड्यांपैकी दोन रेल्वे गाड्या गोव्यातून वाहतूक करणार आहेत. त्यातील एक रेल्वेगाडी नवी दिल्ली ते मडगाव दरम्यान धावणार आहे. तर, दुसरी रेल्वेगाडी नवी दिल्ली ते तिरूअनंतपुरम दरम्यान धावणार आहे. या गाडीला मडगाव रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. नवी दिल्ली ते तिरूअनंतपुरम ही रेल्वेगाडी १३ मेपासून धावणार आहे. ही रेल्वेगाडी मंगळवार, बुधवार ... Read More »

कामगार कायद्यांमध्ये दुरुस्ती करणे धोकादायक : राहूल

देशातील कोरोना महामारीनिमित संकटाचे कारण पुढे करून कामगारांची पिळवणूक करून, त्यांचा आवाज दडपण्यासाठी त्यांचे मानवी हक्क तुडवले जाताकामा नयेत अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाविरोधी लढ्याचे निमित्त करून अनेक राज्यांनी कामगार कायद्यांमध्ये दुरुस्ती केल्याच्या अनुषंगाने त्यांनी आपले मतप्रदर्शन केले आहे. काम करण्यासाठी असुरक्षित ठिकाणांना मान्यता देऊन कामगारविषयक मूलभूत तत्वांचे उल्लंघन केले जाऊ नये. आम्हीही कोरोनाविरोधी ... Read More »

कूकच्या आवडत्या खेळाडूंमध्ये कोहली

इंग्लंडचा विश्‍वविक्रमी कर्णधार ‘सर’ ऍलिस्टर कूक यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या आवडत्या खेळाडूंपैकी एक असल्याचे म्हटले आहे. कूक यांनी कोहलीची तुलना विंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याच्याशी केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम दृष्टिपथात असताना कूक यांनी २०१८ साली निवृत्ती स्वीकारली होती. कूक यांनी सांगितले की मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या वेस्ट इंडिज दौर्‍यारम्यान ... Read More »

पॅरा ऍथलिट दीपा मलिक निवृत्त

भारतीय पॅरा ऍथलिट दीपा मलिक हिने सोमवारी निवृत्ती जाहीर केली. राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तिने ही निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय पॅरालिंपिक समितीचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी दीपाने निवृत्ती स्वीकारली. खेळाने मला खूप काही दिले आता खेळासाठी योगदान देण्याची वेळ आली असल्याचे ४९ वर्षीय दीपाने सांगितले. २०२२ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्याची इच्छा असून त्यावेळची परिस्थिती पाहून पुढील पावले उचलेन, ... Read More »

कठीण काळात संघसाथींकडून दुर्लक्ष

>> श्रीशांतने केला आरोप भारताचा माजी तेज गोलंदाज एस. श्रीशांतने भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे. त्याच्या कठीण काळात त्याचे संघसाथी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते. ते त्याच्याकडे पाहत देखील नव्हते, असा आरोप त्याने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. श्रीशांतला पाहिल्यावर काही खेळाडू दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. केवळ विरेंद्र सेहवाग व व्हीव्हीएस लक्ष्मणसह एक-दोन खेळाडू असे आहेत जे श्रीशांतबरोबर संपर्कात ... Read More »

उन्हाळ्यातील दिनचर्या कशी असावी?

–  डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) आत्ताचे तप्त वातावरण पाहता किंवा उन्हाळ्याचा ताप पाहता, आत्ताच्या ऋतुचर्येप्रमाणेच सगळ्यांनी दिनचर्येचे पालन करणे गरजेचे आहे. आता क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींनी तसेच कोरोना व्हायरस बाधित रुग्णांनी तसेच इतर जनसमुदायानी या उन्हाळ्यात आहार-विहाराचे खालीलप्रमाणे आचरण करावे… जगभरात कोरोना व्हायरसने थैमान माजवले असले तरी भारतात इतर देशांच्या अपेक्षेने या कोरोनावर बर्‍यापैकी मात केली आहे. सरकारने या कोरोना ... Read More »