Daily Archives: May 11, 2020

जरा कठोर व्हा!

कोरोनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाचव्यांदा विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. तिसर्‍या टप्प्यातील देशव्यापी लॉकडाऊन उठवायचे की त्याची मुदत काही राज्यांत आणखी वाढवायची यासंदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीने पंतप्रधान आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांदरम्यानचा हा संवाद महत्त्वाचा असणार आहे. देशातील बहुतेक महानगरे अजूनही लाल विभागात आहेत. दिवसागणिक देशात तीन हजारांवर नव्या रुग्णांची भर पडते आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठविण्याच्या मनःस्थितीत ... Read More »

निवडक १५ मार्गांवर उद्यापासून विशेष ट्रेन्स

>> मडगाव स्थानकाचाही समावेश भारतीय रेल्वे येत्या दि. १२ मेपासून टप्प्याटप्प्याने देशातील निवडक अशा १५ मार्गांवरील रेलसेवा सुरू करणार आहे. या अंतर्गतच्या ट्रेन्स विशेष ट्रेन्स स्वरुपात नवी दिल्ली येथून धावणार आहेत. गोव्यातील मडगाव रेल स्थानकावरूनही ही विशेष ट्रेन जोडली जाणार असल्याचे वृत्त आहे. नवी दिल्लीहून या विशेष ट्रेन्स दि ब्रुगड, अगरताळा, हावडा, पाटणा, विलासपूर, रांची, भुवनेश्‍वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतपूरम, ... Read More »

पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्यात आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

देशाला टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनच्या स्थितीतून बाहेर आणत असतानाच देशाची अर्थ व्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी विविध मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. देशात कोरोनाची आपत्ती कोसळल्यापासून अशा पध्दतीने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची पंतप्रधानांची ही पाचवी वेळ आहे. देशात दि. २५ मार्चपासून लॉकडाऊन आहे. त्यावरही यावेळी चर्चा होईल. केंद्रातील सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत प्रामुख्याने अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर भर ... Read More »

पत्रादेवी नाक्यावर साधनसुविधा वाढविण्याची बैठकीत सूचना

  पत्रादेवी येथील मुख्य वाहन तपासणी नाक्यावर वाहनांच्या तपासणीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधन सुविधा उभारण्याची सूचना राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत काल करण्यात आली. मुख्य सचिव परिमल राय यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी अतिरिक्त काउंटरची सोय करून बांधकाम व इतर सामान घेऊन राज्यात येणार्‍या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू करावे. पत्रादेवी वाहन तपासणी नाक्यावर वाहनांच्या वाढत्या ... Read More »

राज्यातील बाजारपेठांत लॉकडाऊन नियमभंगाचे वाढते प्रकार

लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात सामाजिक अंतर व इतर नियमांचा राज्यभरात फज्जा उडत आहे. राज्यभरातील विविध बाजारपेठांत सामाजिक अंतर नियमांचे पालन करण्यात येत नाही. गोव्याच्या शेजारील सिंधुदुर्ग, बेळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत अचानक झालेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात नियम पालनाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गोवा राज्याचा हरित विभागात समावेश झाल्यानंतर उद्योग, व्यापार सुरू करण्यासाठी नियमांमध्ये जास्त शिथिलता देण्यात ... Read More »

गोमेकॉत १०२ दिवसांत २४० कोरोना संशयितांना डिस्चार्ज

  कोरोना खास वॉर्डात मागील १०२ दिवसांत संशयित २४० जणांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. गोमेकॉमध्ये ताप, श्वास घेण्यास त्रास, खोकला आदी तक्रारी घेऊन येणार्‍यांची कोविड-१९ अंतर्गत नमुन्यांची तपासणी केली जात आहे. गोमेकॉमध्ये कोविड-१९ च्या संदर्भात तक्रारी घेऊन येणार्‍या रुग्णांना कोरोना वॉर्डात दाखल करून घेतले जाते. त्यानंतर रुग्णांची कोविड चाचणी केली जाते. या चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर उपचार करून ... Read More »

डॉ. मनमोहन सिंग एम्स इस्पितळात दाखल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना काल संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने एम्स इस्पितळात दाखल केले आहे. ८७ वर्षीय सिंग यांना डॉक्टरांनी हृदयरोगविषयक विभागात निरीक्षणाखाली ठेवल्याची माहिती देण्यात आली. डॉ. नितिश नाईक यांनी त्यांना इस्पितळात दाखल केले. Read More »

विशेष ‘श्रमिक’ ३६६ रेलगाड्यांनी पोचविले ४ लाख श्रमिकांना घरी !

भारतीय रेल्वेने दि. १ मे पासून देशभरातून ३६६ खास श्रमिक रेलगाड्यांमार्फत विविध राज्यांमध्ये अडकलेल्या सुमारे ४ लाख स्थलांतरीतांना त्यांच्या गावांमध्ये पोचविले आहे. या खास रेलगाड्यांपैकी २८७ गाड्या याआधीच त्या-त्या राज्यांमध्ये दाखल झाल्या असून ७९ गाड्यांचा प्रवास सुरू असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत संबंधित राज्यांमध्ये पोचलेल्या २८७ रेलगाड्यांपैकी १२७ उत्तर प्रदेशमध्ये, ८७ बिहारात, २४ मध्य प्रदेशमध्ये, २० ओडिसा येथे, १६ झारखंडमध्ये, राजस्थानात ... Read More »

डॉक्टर निलंबन प्रकरणाचा आयएमएकडून निषेध

भारतीय वैद्यकीय संघटनेच्या गोवा शाखेने (आयएमए) गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टराच्या निलंबनप्रकरणाचा निषेध केला असून या प्रकरणी जलद गतीने चौकशी करून सत्य उघड करावे, असे आवाहन गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. एस. सॅम्युएल यांनी केले आहे. पेडणेचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू मृत्युप्रकरणाच्या चौकशीसाठी गोमेकॉतील एका ज्येष्ठ निवासी डॉक्टराला निलंबित करण्यात आले आहे. गोमेकॉच्या निवासी डॉक्टर संघटनेने या निलंबनाबाबत नाराजी व्यक्त करून ... Read More »