Daily Archives: May 10, 2020

गोवा ‘ग्रीन झोन’मध्ये कसं आलं?

बबन विनायक भगत   महाराष्ट्र व कर्नाटकमधील पर्यटकांची वाहने मोठ्या संख्येने गोव्यात येत असून काही दिवसांसाठी ती वाहने बंद करायला हवीत व त्यासाठी राज्याच्या सीमा सील करण्याचा विचार असल्याचे राणे यांनी १७ मार्च रोजी स्पष्ट केले होते आणि त्यानुसार गोव्याने आपल्या सर्व सीमा २५ मार्चपासून बंद केल्या. परिणामी परराज्यांतून येणारी वाहने बंद झाली आणि गोव्यात कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका टळला! ... Read More »

-ः इतिहासाच्या पाऊलखुणा ः- भारतीय इतिहासाला वसाहतवाद्यांनी दिलेले विकृत वळण

दत्ता भि. नाईक   स्वतःचाच इतिहास नष्ट करणार्‍यांनी आपल्या इतिहासाचे काय केले याची चर्चा तरी करून काय उपयोग? आता आपल्या इतिहासाला संपूर्णपणे आधुनिक प्रमेयांचा वापर करून स्पष्टपणे मांडण्याची आवश्यकता आहे. भारतीय इतिहासाला वसाहतवाद्यांनी दिलेले विकृत वळण आता सरळ करण्याची वेळ आलेली आहे.   भारतीयांना दैनंदिनी लिहिण्याची सवय नाही. त्यामुळे रामायण व महाभारत या महाकाव्यांची कालनिश्‍चिती करणे अतिशय अवघड बनलेले आहे. ... Read More »

सरकारी योजनांतच गुंतवणूक करा!

  शशांक मो. गुळगुळे एखाद्या गुंतवणुकीबाबत संशय वाटत असेल तर अशा गुंतवणुकीतील परताव्याचा विचार सोडून देऊन या गुंतवणुकीतून आपली मुद्दल घेऊन बाहेर पडावे. प्रत्येकाने आपल्या गुंतवणुकीबाबत सदैव दक्ष राहायला हवे.   आपल्या देशाची अर्थव्यवस्था अगोदरच अंथरुण धरून होती, त्यात आता या प्रदीर्घ ‘कोरोना’ची भर पडली. त्यामुळे माणसांप्रमाणे अर्थव्यवस्थाही ‘क्वारंटाईन’मध्ये गेली आहे. जगातले बरेच प्रगत देश- ज्यांच्याशी आपले आर्थिक व्यवहार होत ... Read More »

आदर्श कर्मयोगी ः बाबा आमटे

डॉ. सोमनाथ कोमरपंत अहर्निश कृतिशीलतेचा मंत्र जपून सर्वंकष रचनात्मक कार्याचा महान प्रयोग भारतवर्षात केला. राष्ट्राच्या सीमा उल्लंघून मानवतावादाकडे त्यांनी आपल्या आचार-विचारांची वाटचाल केली. या दृष्टीने ते आधुनिक कालखंडातील ऋषी होते.   महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा वैचारिक वारसा, सेवाभावी वृत्ती आणि समाजमनस्कता स्वातंत्र्योत्तर काळात समाजमानसात रुजविण्याचे महान कार्य बाबा आमटे यांनी समर्पित भावनेने केले. कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांच्यातील ... Read More »

-ः सरळवाट ः- म्हापशातील सहकारी बँका व पतसंस्था

प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट   संजीवनी सहकारी साखर कारखाना, मच्छीमार सहकारी संस्था यांसारख्या सहकार क्षेत्रातील संस्था कार्यरत असतानाच गोमंतकाच्या विविध भागांत सहकारी बँका व सहकारी पतपेढ्या सुरू झाल्या. याला म्हापसानगरीही अपवाद नव्हती.   मुक्तीनंतरच्या कालखंडात गोमंतकात सहकार कायदा अस्तित्वात आला. ग्राहक सहकारी संस्थांमार्फत नागरिकांना स्वस्त दरात धान्यपुरवठा केला जाऊ लागला. ‘गोवा राज्य सहकारी बँक मर्यादित’ ही सहकार क्षेत्रातील शिखर बँक ... Read More »

अहेर

दत्ताराम प्रभू-साळगावकर लग्न करणार्‍या व्यक्तींचा आपल्याशी असलेला नातेसंबंध, ऋणानुबंध किंवा मैत्रीसंबंध म्हणा त्याची पैशात किंवा दागिन्यांत मोजदाद करता येते का, हाच मूलभूत प्रश्‍न आहे. जर येत असेल तर असला अहेर हा आपल्या संबंधांची लांबी-रुंदी-उंची मोजणारं गणितशास्त्रातलं उपकरणच असतं.   ‘अहेर’ हा शब्द कानी पडला की आपल्यासमोर कोणाचं तरी लग्न, मुंज, घरप्रवेश असे प्रसंग उभे राहतात. खरं म्हणजे अहेर हे एकप्रकारचं ... Read More »

माणसांचं जग- ५१ दुःखातही हसणारी मारिना

  डॉ. जयंती नायक तिच्या मनाची अन् भावनांची कुचंबणा होऊ लागली. घरात आता भावजया आल्या होत्या. तिला जगणं कठीण होऊ लागलं. तेव्हा आपला भार कुणावर नको म्हणून ती इथंतिथं कामाला जाऊ लागली.   ती माझ्या वडिलांकडे खूपदा आपल्या मुलासाठी कपडे शिवायला यायची. माझ्या वडिलांना ती दादा म्हणून हाक मारायची. वडिलांशी अदबीनं, एखाद्या बहिणीनं भावाशी बोलावं त्या स्नेहानं बोलायची. आईलाही वहिनी ... Read More »

सप्तपदी

  मीना समुद्र विवाह म्हणजे दोन व्यक्तींना, दोन कुटुंबांना आणि त्या अनुषंगाने येणार्‍या समाजातील नात्याला जोडणारा मंगलविधी असतो. त्यामुळे सप्तपदी ही हे नाते जीवनभर निष्ठापूर्वक निभावण्याचे जणू प्रतिज्ञापत्र असते. कर्तव्याचे भान आणि सर्वांच्या साक्षीने केलेले ते पवित्र उच्चारण असते.   प्रत्येक आकड्याचे आणि संख्येचे वेगवेगळे महत्त्व आढळून येते. ‘सात’ हा आकडा तसा पाहिला तर विषम आहे; माणसाच्या दैनंदिन जीवनात आणि ... Read More »

-ः खुले मैदान ः- अष्टपैलू क्रीडापटू चुन्नी गोस्वामी काळाच्या पडद्याआड

सुधाकर नाईक ‘कौशल्य, कर्तृत्व आणि प्रावीण्य’ या गुणत्रयीवर भारतीय क्रीडाक्षितिजावर आधिपत्य प्रस्थापिलेले माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तथा प्रथमश्रेणी क्रिकेटपटू सुबिमल ऊर्फ चुन्नी गोस्वामी यांचे नुकतेच कोलकात्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्याविषयी…   ‘कौशल्य, कर्तृत्व आणि प्रावीण्य’ या गुणत्रयीवर भारतीय क्रीडाक्षितिजावर आधिपत्य प्रस्थापिलेले माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तथा प्रथमश्रेणी क्रिकेटपटू सुबिमल ऊर्फ चुन्नी गोस्वामी (८२) यांचे नुकतेच (३० एप्रिल रोजी) कोलकात्यात हृदयविकाराच्या झटक्याने ... Read More »