Daily Archives: May 9, 2020

बाबरी मशीदप्रकरणी न्यायालयाने खटल्याची कालमर्यादा वाढवली

बाबरी मशीद विद्ध्वंसाचे षडयंत्र रचल्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने खटला पूर्ण करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदत दिली आहे. लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ऑगस्टच्या अखेरीस हा खटला पूर्ण करून निर्णय द्यावा, असे कोर्टाने म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, एम. एम. जोशी, उमा भारती, कल्याणसिंग आणि इतरांवर हा खटला चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यास मुदतवाढ दिली आहे. Read More »

स्मिथचे ऑनलाईन क्रिकेट प्रशिक्षण

आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओद्वारे त्याने नवोदितांना क्रिकेटमधील काही फटके खेळण्याची पद्धत दाखवली आहे. स्मिथने त्याच्या पहिल्या ऑनलाईन क्लासमध्ये क्रिकेट शिकणार्‍या खेळाडूंना ड्राईव्ह करण्याची योग्य पद्धत सांगितली. त्याचबरोबर चेंडूचा स्विंग कसा ओळखायचा आणि त्यावेळी कशा प्रकारे ड्राईव्ह करावे हेही त्याने सांगितले. ३० वर्षांच्या स्मिथने ३ मिनिटाचा ... Read More »

आफ्रिदीच्या संघात नाही इम्रान

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी याने आपला सर्वोत्तम सर्वकालीन विश्‍वचषक खेळाडूंचा संघ नुकताच जाहीर केला असून यात भारताच्या विराट कोहली याला स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संघात ५ खेळाडू पाकिस्तानचे आहेत. विश्‍वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर, पाकिस्तानला विश्‍वचषक जिंकून देणार्‍या इम्रान खान याचा संघात समावेश नाही. आफ्रिदीने सलामीवीर म्हणून पाकिस्तानचा सईद अन्वर आणि ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ... Read More »

अझरची त्रिशतकी बॅट भारताकडे

पुणेस्थित क्रिकेट संग्रहालय ‘ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी’ यांनी ‘डे नाईट’ कसोटीतील पहिला त्रिशतकवीर असलेल्या पाकिस्तानच्या अझर अली याची ‘ती’ ऐतिहासिक बॅट ऑनलाईन लिलावात खरेदी केली आहे. अझरने कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी २०१८ साली वेस्ट इंडीजविरुद्ध संयुक्त अरब अमिरातीमध्ये तिहेरी शतक झळकावलेली बॅट तसेच २०१७ साली भारताविरुद्धच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत परिधान केलेली जर्सी लिलावासाठी ठेवली होती. अझरने सोशल मीडियावर बॅट आणि ... Read More »

आनंदचा नेपोमनियाच्चीला शॉक

आपल्या बचावात्मक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या भारताच्या विश्‍वनाथन आनंद याने ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत सनसनाटी निकालाची नोंद करताना रशियाच्या अव्वल मानांकित इयान नेपोमनियाच्ची याचा केवळ १७ चालींत फडशा पाडला. रशियाविरुद्धची ही लढत भारताला २-२ अशी बरोबरीत सोडवावी लागली असली तरी आनंदचा हा सनसनाटी विजय स्पर्धेतील आत्तापर्यंतचा सर्वांत धक्कादायक ठरला. अव्वल मानांकित चीनने काल अजून दोन विजय प्राप्त करत अंतिम फेरीत ... Read More »