Daily Archives: May 9, 2020

*एकवीस दिवसांचा चित्रकवितेचा प्रवास*

 योगेश प्रभुगावकर दुसर्‍या लॉकडाऊनच्या काळात सामाजिक माध्यमांवर अनेकजण एकमेकाला आव्हान करीत होते. दुसर्‍याला आव्हान देणं सोपं आहे, पण स्वतःच स्वतःला आव्हान देणारे नि ते पार पाडणारे विरळाच असतील. असं एक व्यक्तिमत्त्व पैंगीण येथील योगेश प्रभुगावकर ऊर्फ योगी. एकवीस दिवसात रोज एक याप्रमाणे रेखाचित्र काढण्याचं आव्हान त्यांनी स्वतःलाच दिलं. कुणाचं रेखाचित्र? ज्यांनी कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता कोविद-१९च्या काळात कोरोना पीडितांना ... Read More »

पवित्र महिना रमजानचा

 गौरी भालचंद्र समोर पाणी असताना.. अत्यंत तहान लागलेली असतानाही रोजेदार पाणी पीत नाही… राग येण्यासारख्या बाबी घडत असल्या तरी आपल्या रागावर संयम ठेवत असतो.. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हाच गरिबांच्या किंवा दुसर्‍याच्या भुकेची जाणीव होते… हे सांगणारा हा रमजानचा पवित्र महिना. रमजानचा महिना सर्वात पवित्र महिना मानला जातो.. या महिन्यात कुराणचे वाचन सर्वात पुण्यप्रद मानले जाते.. ज्यांना कुराण वाचता येत ... Read More »

वेळेचा सदुपयोग

 डॉ. रेखा पौडवाल (बांबोळी) संपूर्ण दिवस घराच्या चार भिंतीत दडून राहून करायचं तरी काय? आमच्या अवतीभवती दाटत असलेल्या या निराशामय व नकारात्मक वलयातून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक व बुद्धीला चालना देणारा उपाय शोधून काढला आहे तो म्हणजे ऑनलाईन बुद्धीबळाच्या सामन्यांचे आयोजन. ‘कोरोना’ हा केवळ शब्द जरी कानी पडला तरी आजच्या घटकेला माणूस भीतीने थरथर कापतो आहे. या संपूर्ण जगाला गिळंकृत करणार्‍या ... Read More »

‘एकमेका साह्य करू…

 सौ. शामल अ. कामत (मडगाव) खरंच, या कोरोनाने माणसांमधली माणुसकी जागवली. असेल तो वाईट पण तरीही ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’… ही भावना अजूनही माणसांमध्ये जिवंत आहे, असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्वप्नातही घडू शकणार नाही असा काळ पूर्ण जगभर आला. तो कसा आला… का आला… याला जबाबदार कोण… हे सगळे विषय आता महत्त्वाचे नाहीत. त्याहीपेक्षा खूप ... Read More »

दुसरा फटका

आपल्या गावी पायी निघालेल्या आणि रेल्वे रुळांवर विश्रांतीसाठी झोपलेल्या सोळा मजुरांच्या काल एका मालगाडीने चिंधड्या उडविल्या. कोरोनाच्या काळात स्थलांतरित मजुरांची जी अपरिमित परवड देशभरात चाललेली आहे ती अत्यंत विदारक आहे. कोरोनाला हरवण्याच्या नादात सरकारकडून आजवर या स्थलांतरित मजुरांची दारुण उपेक्षा झाली हे सत्य ढळढळीतपणे आतापर्यंत समोर आलेले आहे. आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशा परिस्थितीत लॉकडाऊनच्या काळामध्ये ... Read More »

गोव्यातून मजुरांना घेऊन रेल्वेचे मध्यप्रदेशात प्रस्थान

लॉकडाऊनमुळे गोव्यातील अडकून पडलेल्या मध्यप्रदेशातील ११९६ मजुरांना घेऊन कोकण रेल्वेची खास पहिली श्रमिक रेल्वेगाडी थिवी येथील रेल्वे स्थानकावरून ग्वाल्हेर – मध्यप्रदेशला काल शुक्रवारी रवाना झाली. तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आल्याने परराज्यातील कामगारांना मूळ गावी सोडण्यास मान्यता देण्यात आली आहे. परराज्यातील सुमारे ८० हजार मजुरांनी घरवापसीसाठी सरकार दरबारी नोंदणी केली आहे. राज्य सरकारने उत्तर भारतात जाणार्‍या मजुरांच्या सोयीसाठी ... Read More »

कर्णिका व आंग्रिया जहाजांवरील खलाशी लवकरच गोव्यात दाखल

मुंबई बंदरात गेल्या कित्येक दिवसांपासून असलेल्या कर्णिका आणि आंग्रिया दोन जहाजावरील गोमंतकीय खलाशी येत्या काही दिवसात गोव्यात दाखल होण्याची शक्यता राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. या दोन्ही जहाज कंपन्यांच्या व्यवस्थापनाने गोमंतकीय खलाशांना क्वारंटाईऩ करून ठेवण्यासाठी हॉटेलची निवड केली आहेत. त्यामुळे या दोन्ही जहाजावरील गोमंतकीय खलाशांना उतरवून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती समितीच्या बैठकीत देण्यात ... Read More »

जितेंद्र देशप्रभूंच्या मृत्यूची चौकशी निःपक्षपणे करा ः कॉंग्रेसची मागणी

कॉंग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते जितेंद्र देशप्रभू यांचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील काही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे निधन झालेले असून त्यांच्या मृत्यूची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांद्वारे निःपक्षपणे चौकशी केली जावी, अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. देशप्रभू यांच्या निधनावर प्रदेश कॉंग्रेसने त्याच दिवशी संशय व्यक्त केला होता असे चोडणकर यांनी म्हटले आहे. या मागणीकडे कुणी राजकीय नजरेने पाहू ... Read More »

गोवा डेअरीत १३ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप

गोवा डेअरीत मागच्या दोन संचालक मंडळांच्या कार्यकाळात साधारण २०१२ ते २०१७ या कालावधीत सुमारे तेरा ते चौदा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांनी केला आहे. हा १३ ते १४ कोटी रुपयांचा घोटाळा मागच्या दोन संचालक मंडळांच्या कार्यकाळात झाला असून त्यावेळेला गोवा डेअरीचे अध्यक्ष म्हणून बाबूराव फडते देसाई, विठोबा देसाई, माधव सहकारी तसेच राजेश फळदेसाई ... Read More »

औरंगाबादमध्ये रेल्वेखाली चिरडून १६ मजूर ठार

गावाकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळांवरून निघालेल्या स्थलांतरित मजुरांना एका मालगाडीने चिरडल्याने औरंगाबादमध्ये १६ मजूर जागीच ठार झाले. तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत तिघांचे प्राण वाचले आहेत. बदनापूर-करमाड दरम्यान काल शुक्रवारी सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. सर्व १९ मजूर हे जालन्यातील एसआरजे कंपनीत काम करणारे होते. लॉकडाऊनमुळे त्यांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. मध्येप्रदेशात जाण्यासाठी ... Read More »