Daily Archives: May 8, 2020

पुढच्यास ठेच…

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणमजवळच्या व्यंकटपुरम गावी काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास झालेल्या वायूदुर्घटनेने भोपाळमधील युनियन कार्बाईड वायुदुर्घटनेच्या कटु आठवणी ताज्या केल्या आहेत. व्यंकटपुरमच्या एल जी पॉलिमर लि. या कारखान्यातून ही वायूगळती झाली, तेव्हा आजूबाजूच्या निवासी वसाहतींमधील लोक गाढ निद्रेत होते. काय झाले हे कळायच्या आतच त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. गुदरमलेले लोक घराबाहेर पडले. बायका, मुले, वृद्ध सैरावैरा पळू लागले. कित्येक ... Read More »

मजुरांसाठी आज थिवीहून रेल्वे सुटणार

>> मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शक्यता राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत पोचविण्यासाठी खास रेल्वेगाडी थिवी रेल्वे स्टेशनवरून शुक्रवारी सोडली जाण्याची दाट शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाकडून खास रेल्वेगाडीच्या वेळापत्रकाबाबत माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. या रेल्वेगाडीबाबत गुरूवारी उशिरापर्यंत माहिती मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाकडून परराज्यात जाण्यासाठी ... Read More »

दहावी परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी

>> वेळापत्रकामध्ये किंचित बदल गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने कोविडच्या पार्श्‍वभूमीवर जारी केलेल्या दिशानिर्देशाचे पालन करण्यासाठी मंडळाने शैक्षणिक संस्था प्रमुख, परीक्षा नियंत्रकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दहावी, बारावीच्या मुलांना परीक्षा केंद्र, उपकेद्रांपर्यत सोडणे आणि परत आणण्याची जबाबदारी मुख्याध्यापक, प्राचार्यावर सोपविण्यात आली आहे. या प्रक्रियेत सामाजिक अंतर, ... Read More »

गोमेकॉत ७ कोरोना संशयित दाखल

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना खास विभागात कोरोना संशयित ७ रुग्णांना काल दाखल करण्यात आले. तर, गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आलेले ३८६ नमुने नकारात्मक आहेत. गोमेकॉच्या कोरोना खास विभागात ५ कोरोना संशयितांवर उपचार सुरू आहेत. उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये १ रुग्ण आणि उपजिल्हा इस्पितळामध्ये २ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य खात्याने २२९ जणांना सरकारी क्वारंटाईऩ सुविधेखाली आणले आहेत. ... Read More »

पणजी मार्केट अखेर ४३ दिवसांनंतर खुले

येथील पणजी महानगरपालिकेच्या मुख्य मार्केटमधील दुकाने ४३ दिवसांनंतर काल खुली करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मार्केटमधील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर किराणा सामानाची विक्री करणारी काही दुकाने खुली करण्यात आली होती. तथापि, मार्केटमधील मोठ्या प्रमाणात दुकाने बंद होती. महानगरपालिकेचे मार्केटमधील दुकाने सुरू करण्यापूर्वी साफसफाई करण्यात ... Read More »

विशाखापट्टणमजवळ रासायनिक वायू गळती

काल गुरूवारी पहाटे एलजी पॉलिमर या कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्यामुळे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला. या वायू गळतीमुळे हजारो आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून या घटनेबाबत बचावकार्य सुरू आहे. वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांमध्ये जळजळ व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल ... Read More »

भारतच मॅच फिक्सिंग माफियांचे आश्रयस्थान

>> आकिबने केले खळबळजनक आरोप मॅच फिक्सिंगमुळे गेल्या काही वर्षात पाकिस्तानी क्रिकेटचे नाव बदनाम झालेले आहे. नुकताच त्यांचा आक्रमक सलामीवीर फलंदाज उमर अकमल हा दोषी आदळून आलेला आहे. असे असूनही पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आकिब जावेदने मात्र खळबळजनक आरोप केले आहेत. भारत हेच मॅच फिक्सिंग माफियांचे आश्रयस्थान असल्याचा आरोप त्याने केला आहे. आकिब जावेदने १९९०च्या दशकात मॅच फिक्सिंगबद्दल आवाज उठवला होता. ... Read More »

टी-टेनला ऑलिंपिकमध्ये स्थान हवे ः ऑईन मॉर्गन

टी-टेन या क्रिकेटच्य सर्वांत वेगाने लोकप्रिय होत असलेल्या प्रकाराचा ऑलिंपिकमध्ये समावेश करावा, अशी मागणी इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार ऑईन मॉर्गन याने केली आहे. तो पुढे म्हणाला की, ऑलिंपिकमध्ये टी-टेन क्रिकेट व्हायला हवे. क्रिकेटचे हे स्वरुप खूप छोटे असते. त्यामुळे १० दिवसांमध्ये ही टी-टेन स्पर्धा संपून जाईल आणि ऑलिंपिकच्या दृष्टीने हे योग्यही ठरेल. यापूर्वी १९०० साली ऑलिंपिकमध्ये क्रिकेट खेळले ... Read More »

भारताचे सलग दोन पराभव

नेशन्स कप ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसर्‍या व चौथ्या फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. युरोप व चीन संघाविरुद्ध भारताचा २.५-१.५ अशा समान फरकाने पराभव झाला. चीनविरुद्धच्या लढतीत भारताच्या विश्‍वनाथन आनंद याने आपल्यापेक्षा सरस प्रतिस्पर्धी असलेल्या डिंग लिरेन याच्याविरुद्धचा पहिला डाव ५४ चालींत बरोबरीत सोडवला. पी. हरिकृष्णा यानेदेखील आपल्यापेक्षा वरचढ यू यांग यी याला गुण विभागून घेण्यास भाग पाडले. कोनेरू हंपी ... Read More »

पावलो डायबाला कोरोनामुक्त

युवेंट्‌सचा स्टार फुटबॉलपटू पावलो डायबाला याने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. युवेंट्‌स पत्रक जारी करताना डायबाला याच्या नव्याने करण्यात आलेल्या दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह आल्या असल्याचे सांगितले. इटलीतील चॅम्पियन क्लब असलेल्या युवेंट्‌सने पुढे सांगितले की डायबाला याला होम क्वॉरंटाईन केले जाणार नाही. मागील जवळपास दोन महिन्यांपासून कोरोनाशी लढल्यानंतर डायबाला यातून मुक्त झाला आहे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर मार्च महिन्यात डायबालाची पहिली ... Read More »